

खोपोली येथे शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या हत्येने रायगड जिल्ह्यात तीव्र राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी सुधाकर घारे फरार असून ते गुजरातमधील एका देवस्थान परिसरात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कैलास म्हामले
Raigad News : खोपोलीमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) घडली. यानंतर राज्यभर आता संताप व्यक्त केला जात आहे. शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली असून रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्यासह आमदार महेंद्र थोरवे यांनी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह प्रदेशाध्य सुनील तटकरे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. या प्रकरणात सुधाकर घारे अद्याप फरार असून नुकताच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. पण तो कोठून करण्यात आला हे कोणाला माहित नव्हते. पण आता घारे यांच्या ठिकाणाचा पत्ता लागला असून ते महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातील एका देवस्थानच्या ठिकणी असल्याचे समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. ते आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी परतत असताना त्यांची तलवार, कोयता, कुऱ्हाड आणि धारधार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. यानंतर आरोपी फरार झालेत.
यानंतर आता ही हत्या राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. तर अशाच पद्धतीने हत्या झाल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आपण कोणलाच सोडणार नाही. दोषींवर मकोका लावू ही केस फास्ट ट्रॅकवर चालवू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर यांची दोन मुले दर्शन आणि धनेश व त्यांचे अंगरक्षक तसेच खुनाच्या कटासाठी सहकार्य केल्याचा आरोप केल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ता भरत भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणात आतापर्यंत हत्येतील मुख्य संशयित आरोपी रविंद्र देवकर आणि दर्शन देवकर यांच्यासह अन्य 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सुधाकर घारे अद्याप फरार आहेत.
दरम्यान त्यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत असून ते एका देवस्थानावर असल्याचे ते बोलत असल्याचे समोर येत आहे. यावेळी माहिती समोर आल्या प्रमाणे सुधाकर घारे हे गुजरातमध्ये असल्याचे बोलले जात आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत घारे यांनी, आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यांनी आपण एका धार्मिक ठिकाणी असून आपण येथे खोटं बोलणार नाही. शपथ घेवून सांगतो की या घटनेत आपला कोणताच संबंध नाही. ज्याची हत्या झाली ते आपल्या नात्यातील होते. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवावा तितका कमी असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी घारे यांनी, ही घटना घडल्यानंतर मी एक बातमी वाचली ज्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट आपले नाव घेतले. जे फक्त राजकीय स्वार्था पोटी आपलं नाव घेतलं जात असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच आपल्यासह भगत याचे नाव या प्रकरणात घेण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातोय. यासाठी थोरवेंच्या भावाने आंदोलन केले. पण माझा पोलिस प्रशासन आणि न्याय देवतेवर विश्वास आहे. आपण मी असं घाणेरडं काम करणार नाही. तरीही पोलिस प्रशासनाने योग्य चौकशी करावी.
या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जेव्हा पोलिस प्रशासनाला आपली गरज असेल त्यावेळी स्व: हजर राहून तपासात मदत करू असेही त्यांनी म्हटलं आहे. तर ज्या काळोखे कुटूंबावर हा दु:खद प्रसंग ओढावला त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
1. मंगेश काळोखे यांची हत्या कधी आणि कुठे झाली?
👉 शुक्रवारी (26 डिसेंबर) खोपोली शहरात निर्घृण हत्या करण्यात आली.
2. या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे?
👉 राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव पुढे आले आहे.
3. सुधाकर घारे सध्या कुठे असल्याचा दावा आहे?
👉 ते महाराष्ट्राबाहेर गुजरातमधील एका देवस्थान परिसरात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
4. या हत्येवर शिवसेनेची भूमिका काय आहे?
👉 शिवसेना आक्रमक झाली असून सर्व आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
5. या प्रकरणामुळे रायगडमध्ये काय परिस्थिती आहे?
👉 रायगड जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.