सिंधुदुर्ग बॅंकेत १५ नव्या चेहऱ्यांची एन्ट्री : दोन्ही पॅनेलप्रमुखांसह दहा संचालकांचा पराभव

विद्यमान चार संचालकांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे
Sindhudurg District Bank election

Sindhudurg District Bank election

sarkarnama

Published on
Updated on

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Bank election) मतमोजणीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही पॅनेलचे प्रमुख राजन तेली आणि सतीश सावंत यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. निवडणुकीला विद्यमान 14 संचालक पुन्हा निवडणूक रिंगणात होते. त्यातील तब्बल दहा संचालकांचा पराभव झाला आहे. चार जणांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे, यामुळे 15 नवीन चेहरे संचालक म्हणून निवडून आले आहेत. (Sindhudurg District Bank Defeat ten directors in election)

मतमोजणीला सुरुवात होताच मतदार व दोन्ही गटाच्या पदाधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील व्यक्तींना धक्का देणारे निकाल पुढे येऊ लागले. यात सर्वात मोठा धक्कादायक निकाल म्हणजे शिवरामभाऊ जाधव यांच्यानंतर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सहकार महर्षी म्हणून नाव घेतलेले महाविकास आघाडीच्या पॅनेलचे प्रमुख सतीश सावंत यांनी चिठ्ठीद्वारे काढलेल्या निकालात पराभव स्वीकारावा लागला. दुसरा धक्कादायक निकाल म्हणजे भाजप (bjp) पुरस्कृत पॅनेलचे प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा झालेला पराभव.

Sindhudurg District Bank election

आमच्या नेत्यांना केसेसमध्ये अडकवले नसते, तर आम्ही १५ जागा जिंकल्या असत्या : राजन तेली

काँग्रेसचे विकास सावंत, विलास गावडे, राष्ट्रवादीचे सुरेश दळवी यांचा पराभवसुद्धा डोळे विस्फारणारा ठरला. या निवडणुकीत सतीश सावंत, अविनाश माणगांवकर, व्हिक्टर डांटस, विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, विलास गावडे, गुरुनाथ पेडणेकर, प्रकाश गवस, सुरेश दळवी, अतुल काळसेकर, विकास सावंत, नीता राणे, आत्माराम ओटवणेकर, गुलाबराव चव्हाण असे 14 विद्यमान संचालक रिंगणात होते. यातील व्हिक्टर डांटस, नीता राणे, अतुल काळसेकर, आत्माराम ओटवणेकर यांनी विजय मिळविला असून उर्वरित दहा संचालकांना पराभव चाखावा लागला आहे.

Sindhudurg District Bank election

बारामतीला यापुढे कर्ज देणार नाही, असे नारायण राणे का म्हणाले?

हे तरुण चेहरे पोचले बॅंकेत

मतदारांनी या वेळी उमेदवार निवडून देताना जुने व नवीन याच बरोबर तरुण चेहरेसुद्धा जिल्हा बँकेमध्ये पाठविले आहेत. यातील सावंतवाडी तालुका मतदार संघातून निवडून आलेले विद्याधर परब, मनीष दळवी, सुशांत नाईक, महेश सारंग, संदीप परब, समीर सावंत या तरुण रक्ताला संधी दिली आहे.

Sindhudurg District Bank election

राणेंच्या साथीला भाजपने असा नेता पाठवला की त्याने पडद्यामागून खेळी केल्या!

पहिल्या दहा मिनिटांत पहिला निकाल

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक निवड मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने तब्बल अकरा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवताच भाजपमध्ये जोरदार जल्लोष सुरू झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात्र जिल्हा बँकेवर आठ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे या गटात सन्नाटा पसरला होता. मतमोजणीला 9 वाजून 36 मिनिटांनी सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्या दहा मिनिटांत पहिला निकाल आला. हा निकाल शिवसेनेच्या बाजूने होता. दोडामार्ग तालुक्यातून सेनेचे गणपत देसाई हे विजयी झाले. त्यामुळे महाविकास आघाडी गटातून जल्लोष करण्यात आला. यानंतर वैभववाडी मतदार संघातून भाजपचे दिलीप रावराणे विजयी झाले. त्यामुळे भाजपने जल्लोष केला. त्यानंतर काही थोड्या थोड्या वेळाने एकएक निकाल जाहीर होत गेला.

Sindhudurg District Bank election

शरद पवारांच्या दौऱ्यामुळे अशोक पवारांच्या जिल्हा बॅंकेच्या मार्गातील अडथळे दूर!

रवींद्र चव्हाण विजयाचे सूत्रधार

भाजपाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर मिळविलेला हा विजय केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या मेहनतीचा आहेच पण या विजयाचा अजून एक खरा सूत्रधार आहे. तो म्हणजे आमदार रवींद्र चव्हाण, असेही या वेळी काहींनी बोलताना आवर्जून सांगितले.

Sindhudurg District Bank election

इथून दिल्लीपर्यंत आमचीच सत्ता, राजनची वर्णी कुठेही लावू! राणेंनी दिला जाहीर शब्द

पराभूत होऊनही दोन्ही पॅनेलप्रमुख शेवटपर्यंत मतमोजणी कक्षात

महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे प्रमुख सतीश सावंत हे सकाळी नऊ वाजता मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दाखल झाले, तर भाजपचे राजन तेली आणि इतर उमेदवार त्या ठिकाणी लगोलगाच दाखल झाले. दोन्ही पक्षांचे उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सतीश सावंत आणि राजन तेली हे कक्षात शेवटपर्यंत उपस्थित होते. पूर्ण मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर हे सर्व बाहेर आले. दोघांचाही पराभव झालेला असतानाही ते शेवटपर्यंत होते, हे विशेष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com