स्टरलाईन कंपनी कोकणात आली तेव्हा नवे उद्योगपर्व सुरू होईल, अशी अपेक्षा होती. स्थानिकांना नोकऱ्या अस स्वप्न सर्वांनी पाहिलं होतं. पण दुर्देवानं प्रदूषणाच्या मुद्द्यावरून कंपनी सुरू होण्यापूर्वीच बंद पडली. त्यामुळे त्यामुळे कंपनीच्या ताब्यातील शेकडो एकर जमिनीचा प्रश्न कायम होता.
हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. आता कोर्टाच्या आदेशानुसारच ही जागा उद्योग खात्याकडे वर्ग करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न फळास आले आहेत. एकूण 500 एकर जागेपैकी 200 एकर जागा संरक्षण दलाला दिली जाणार आहे.
तीस वर्षांपूर्वी स्टरलाईट कंपनी (Sterlite Industries India Ltd) बंद पडली आणि कंपनीची 500 एकर जागा पडून होती. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) खटला सुरू असल्यामुळे जागेचा कुणालाच उपयोग होत नव्हता. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही जागा उद्योग खात्याकडे वर्ग झाली आहे.
यातील 300 एकर जागा उद्योग खात्याकडे राहणार असून उर्वरित 200 एकर जागा संरक्षण दलाकडे वर्ग केली जाणार आहे. या 200 एकर जागेवर हत्यारे, रणगाडे, बोटी निर्माण करणारा प्रकल्प उभारण्यात जाणार आहे. त्यासाठी 15 दिवसांत संरक्षण दल (defence department) आणि राज्य सरकारचा उद्योग विभाग यांच्यामध्ये रत्नागिरीत करार होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.
स्टरलाईट इंडस्ट्रीचा प्रकल्प 700 कोटींचा होता आणि दरवर्षी 60 हजार टन तांब्याची निर्मिती केली जाणार होती. त्यासाठी स्थानिकांनी कंपनीला अल्पदरात जागा दिली होती. कंपनीची निम्मी उभारणी झाल्यानंतर प्रदूषणाचा मुद्दा चव्हाट्यावर आला. त्यानंतर रत्नागिरीकरांनी (Ratnagiri) कंपनीला विरोध केला. शेती आणि फळबागांवर या प्रकल्पाच्या प्रदूषणाचा विपरित परिणाम होणार होता.
अखेर जनसंघर्ष समितीने कंपनीवर विराट मोर्चा काढला आणि मोर्चेकऱ्यांनी कंपनी पेटवून दिली होती. त्यानंतर कंपनी बंद झाली ती कायमचीच. अनेक वर्षे जागा पडून राहिल्यामुळे एमआयडीसीने कंपनीला नोटीस पाठवून जागा परत करण्याची सूचना दिली होती. त्या विरोधात कंपनीने हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अंतिम निर्णय देताना कोर्टाने ही जागा उद्योग विभागाला पुन्हा दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुमारे 40 वर्षांपूर्वी एकरी 500 रुपये प्रमाणे स्थानिकांनी कंपनीला जागा दिली होती. त्या बदल्यात त्यांना कंपनीत नोकरीची संधी देण्यात येणार होती. परंतु कंपनी बंद पडल्यानंतर जागेसह नोकरीची संधी गेल्यामुळे स्थानिकांनी जागा परत करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्थानिकांनी आंदोलनेही केली होती. जागा परत न देताना आताच्या बाजारभावाप्रमाणे जागेचा मोबदला देण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिल्यानंतर स्थानिकांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.
आता जागा उद्योग खात्याच्या ताब्यात आली असून त्यातील 200 एकरवर संरक्षण दलाचा हत्यारे बनवण्याचा प्रकल्प उभा राहणार आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे स्थानिक प्रकल्पासाठी आग्रही राहिले तरच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. विरोधाची ओळख पुसून काढण्यासाठी रत्नागिरीकरांनी प्रकल्प समर्थनासाठी रस्त्यावर येण्याची आवश्यकता असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.