राणेंच्या गावातील सोसायटीची निवडणूक; शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसला उमेदवारही मिळाला नाही!

भारतीय जनता पक्ष आणि राणे यांचे कार्यकर्ते हे दोन पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवित आहेत.
narayan rane
narayan ranesarkarnama
Published on
Updated on

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांचे गाव असलेल्या वरवडे येथे उद्या (ता. १६ जानेवारी) वरवडे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विरोधी पक्षाचा एकही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात नाही. भारतीय जनता पक्ष (bjp) आणि राणे यांचे कार्यकर्ते हे दोन पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवित आहेत. कोकणात वर्चस्व राखून असलेल्या शिवसेनेला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवारही मिळालेला नाही.

narayan rane
ठाकरेंनी आदेश दिल्यास कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्याच मालकीचे असल्याचे दाखवून देऊ!

कणकवली तालुक्‍यातील वरवडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीसाठी रविवारी (ता. १६ जानेवारी) सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी साडेचारपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांचे गाव असलेल्या या सोसायटीच्या निवडणुकीत एक वेगळीच रंगत पाहायला मिळणार आहे. जिंकून कुणीही येऊ दे, या निवडणुकीत विजय मात्र राणेंचाच होणार आहे. त्याला कारणही तसेच आहे.

narayan rane
ईश्वर सातत्याने भाजपच्या बाजूने

या निवडणुकीत भैरवनाथ सहकार पॅनेल विरुद्ध भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. विरोधी पक्षाला उमेदवारही उभा करता आलेला नाही. या संस्थेचे ४६० मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यामुळे मतदार नेमक्या कुठल्या गटाला कौल देणार, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. संस्थेच्या वरवडे-फणसवाडी येथील कार्यालयात रविवारी दुपारी साडेचारपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सोसायटीच्या १३ पैकी १२ जागांवर दुरंगी लढत होत आहे. तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठी अर्ज न आल्‍याने एक जागा रिक्‍त राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com