Loksabha Election 2024 : ठाकरेंच्या सरकारमध्ये होतो, मग शिंदे सरकारमध्ये आल्याने गुन्हा कसा? तटकरेंचा ठाकरे-पवारांना सवाल

Sunil Tatkare Vs Anant Gite : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जाहीर सभेत महायुतीचे संभाव्य उमेदवार सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांना टीकेचे लक्ष्य केले.
Sunil Tatkare, Anant Gite
Sunil Tatkare, Anant GiteSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News :

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार आणि महायुतीचे संभाव्य उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एकत्रित जाहीर सभा घेतली. यात तटकरेंनी नाव न घेता अनंत गिते यांच्यावर घणाघाती टीका केली. अनेकदा काही गोष्टी या नशिबातच असाव्या लागतात, साऱ्याच गोष्टी समाजाच्या नावावर राजकारण करता येत नाही. अनेकांना निवडणुका आल्यानंतरच समाज आठवतो, या शब्दांत सुनील तटकरे यांनी गिते यांना सुनावले. त्याचवेळी या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या '45 प्लस' जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

Sunil Tatkare, Anant Gite
Kadam vs Jadhav : भास्कर जाधव सारखा नमक हराम माणूस अख्ख्या जगात कुठे मिळणार नाही; रामदास कदम यांचा घणाघात

मुंबईतील भांडुप परिसरात उभी राहिलेली कुणबी समाजाच्या वास्तूत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहयोग दिले. शिवाय मोठे सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आज उभी राहिलेली ही मोठी वास्तू आपण सगळे अनुभवत आहोत. आता काहींना निवडणूक आल्यावर समाज आठवतो, असा टोला सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी अनंत गिते (Anant Gite) यांचे नाव न घेता लगावला. महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि सारे घटक पक्ष एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. तिकीट वाटपाचा योग्य तो निर्णय नेतेमंडळी घेतील, असं सांगत लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Election) जागावाटपाबद्दल बोलणे खासदार सुनील तटकरे यांनी टाळले.

...विजयाचे शिलेदार तुम्हीच

2014 च्या मतमोजणीत दापोली मतदारसंघाने मला पाडले. हा मतदारसंघ रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा. म्हणजे भाई तुम्हीच माझ्या पराभवाचे शिलेदार! आता तुम्ही आणि महायुतीने ठरवले तर माझ्या विजयाचे शिलेदारसुद्धा तुम्हीच राहणार आहात, असे तटकरे म्हणाले आणि सर्वांनी खळखळून हसून दाद दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी खेडचा जावई

मी खेडचा जावई आहे. त्यामुळे या जावयाला सुरक्षित स्थळी ठेवण्याचे काम सासुरवाडी 100 टक्के करेल, असा विश्वास तटकरे यांनी या वेळी व्यक्त केला. महायुतीने ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मला उमेदवारी दिलीत तर केंद्राच्या सर्व योजना राज्यात आणण्यात पूर्ण योगदान देईन, अशी ग्वाही तटकरेंनी दिली.

पवार-ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना सरकारमध्ये आम्ही होतो, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो हा गुन्हा असू शकत नाही, असा युक्तिवाद करत तटकरेंनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

(Edited by Avinash Chandane)

R

Sunil Tatkare, Anant Gite
Ramdas Kadam News : "वडिलांच्या विचारांशी बेइमानी, गद्दारी करणारी औXXX उद्धव ठाकरेंची", कदमांची टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com