Vinayak Raut: राणे कुटुंबियांना जशास तसे उत्तर देण्यासाठी विनायक राऊतांचे राजकीय पुनर्वसन; विधानपरिषदेसाठी नाव चर्चेत

Maharashtra Legislative Council Thackeray Group Leader Vinayak Raut: 2014, 2019 च्या निवडणुकीत विनायक राऊत विजयी झाले होते. त्यामुळं ते येथून पुन्हा हॅट्ट्रिक करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.
Vinayak Raut
Vinayak RautSarkarnama

Maharashtra Politics :लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आपल्या नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी पक्षाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. ठाकरे गटातून महत्त्वाची बातमी समोर येत असून माजी खासदार विनायक राऊत यांचे नाव विधानपरिषदेसाठी चर्चेत आहे.

लोकसभेला रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर विनायक राऊत (Vinayak Raut) यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोकणात पक्षाची पुन्हा ताकद वाढविण्यासाठी आणि राणे कुटुंबियांना जशास तसे उत्तर देण्यासाठी विनायक राऊत यांना संधी दिली जाणार असल्याचे ठाकरे गटातील सुत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विनायक राऊतांच्या राजकीय पुनर्वसनासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. 2014 तसंच 2019 च्या निवडणुकीत विनायक राऊत विजयी झाले होते. त्यामुळं ते येथून पुन्हा हॅट्ट्रिक करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. दुसरीकडं त्यांना रोखण्यासाठी भाजपानं नारायण राणेंना मैदानात उतरवलं होतं. यात राऊतांचा पराभव झाला आहे.

Vinayak Raut
Jayant Awad: भाजप नेते जयंत आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत; महिलेला शिवीगाळ

2009 मध्ये नारायण राणे यांचे मोठे चिंरजीव निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपा-शिवसेनाचे संयुक्त उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता.

नुकत्याच झालेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते नारायण राणे यांना 4लाख 48 हजार 514 मते मिळाली. विनायक राऊत यांना 4 लाख 656 मते मिळाली आहेत. नारायण राणें यांचा 47 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे. राणे पिता-पुत्रांना शह देण्यासाठी विनायक राऊत यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार असल्याचे बोलले जाते.

महायुतीने षडयंत्र आखून कोकणातील लोकसभेच्या जागा जिंकल्या. यंदाच्या लोकसभेत धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. प्रशासनाला त्याच्यामध्ये वापरले गेले. अन्यथा विनायक राऊत यांचा पराभव होण्याचे कारणच नव्हते, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com