Barsu Refinery Protest | रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीचे आंदोलनातून मोठी बातमी समोर आली आहे. बारसुच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे हे आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी पत्रकारांनाही प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखलं आहे. (Vinayak Raut, Police Suppression of Journalists; Barsu refinery conflict on the verge of intensification)
बारसूमधील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिक गावकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. गावकऱ्यांचे हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करत आहेत, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला होता. तसेच पोलिसांचा फौजफाटा मागे घेण्याचीही त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर ते या आंदोलनातही सहभागी झाले. पण आज त्यांना अटक करण्यात आली आहे.
गावकऱ्यांच्या आक्रमकते मुळे आधीच बारसुमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहेत. त्याच आज विनायक राऊत बारसुच्या प्रकल्पाकडे निघालेले असताना रत्नागिरी पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखलं. नंतर पोलिस अधीक्षकांशी बोलणं झाल्यावर विनायक राऊतांच्या ताफ्यातील केवळ चार गाड्या पोलिसांनी आंदोन स्थळी सोडल्या. पण त्याचवेळी पोलिसांनी प्रकल्पाच्या ठिकाणी निघालेल्या पत्रकारांनाही बारसू आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखलं. (Kokan Politics)
दरम्यान, रत्नागिरीतील नाणार गावात हा प्रकल्प आधी होणार होता. पण तिथेही ग्रामस्थांनी विरोध केल्याने प्रकल्पाची जागा बदलण्यात आली. नंतर हा तेल शुद्धीकरण प्रकल्प बारसू-सोलगावात प्रस्तावित करण्यात आला. पण इथेही स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला. माती परिक्षणाच्या वेळीच शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने सुमारे गावात दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करत आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.