MNS-Eknath Shinde: ठाकरेंचा मोठा नेता करणार शिंदे गटात प्रवेश?

पक्ष वाढीसाठी रायगडमध्ये पाटील यांनी अनेक महत्त्वाची कामे केली.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

MNS-Eknath Shinde: रायगड जिल्ह्यातील मनसेचे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रायगडमध्ये मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. याचं कारणही तसंच आहे. रुपेश पाटील गेल्या १५ वर्षाांपासून मनसेत सक्रिय आहेत.

पक्ष वाढीसाठी रायगडमध्ये पाटील यांनी अनेक महत्त्वाची कामे केली. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रुपेश पाटील यांनी अनेक कामे केली. पण रुपेश पाटील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रायगडमध्ये सुरु आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Raj Thackeray
Amit Shaha : रक्ताचे पाट वाहतील, असे सांगत होते; आता साधा दगड उचलण्याचीही कुणाची हिंमत नाही !

गेल्या काही वर्षांपासून मनसेत पक्षांतर्गत गटबाजी वाढल्यामुळे अनेक आमदार, नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आता रुपेश पाटील हेदेखील याच कारणामुळे पक्ष बदलणार असल्याची माहिती आहे. मध्य-रायगड जिल्ह्यात रुपेश पाटील यांचा मोठा जनसंपर्क आहे. पण त्यांनी पक्षांतर केल्यास अंतर्गत वाद हे पुन्हा चव्हाट्यावर येऊ शकतात.

दोन-तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुपेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिलेल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com