BMC Mumbai : 'बीएमसी'त घोटाळा; ठाकरेंनी डागली शिंदे-फडणवीसांवर तोफ

Uddhav Thackeray on Eknath Shinde and Devendra Fadnavis : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका...
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raigad Poladpur News :

मुंबई महानगरपालिकेचे कामकाज गेले दोन वर्ष कसे सुरू आहे? असा सवाल उपस्थित करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. मुंबई महापालिकेत प्रशासकीय घोटाळा सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेचे बजेट कोण मंजूर करणार? तर ते स्वतःच बजेट मांडणार आणि स्वतःच मंजूर करणार. यांचे हे घोटाळे जसे मुंबईत सुरू आहेत. तसेच बाहेरच्या राज्यातही हेच घोटाळे सुरू आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. चंदीगडमध्ये काय झाले, यावरून त्यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला. रायगड पोलादपूर येथील सभेत ते बोलत होते.

मी मुख्यमंत्री असताना आपण काम केलं. तुम्हाला चौकशी करायची असेल ना तर, मुंबई महानगरपालिकेची नका करू. पीएम केअर फंडात लाखो करोडो रुपये गोळा केलेत. त्याचा पहिला हिशेब द्या. मग माझ्या मुंबई महानगरपालिकेला हात लावा. भ्रष्टाचाराचे आरोप करत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. त्यावेळेच्या आयुक्तांनीही सही केली आहे. मग त्यांची चौकशी का नाही लावत? तो तुमच्या पदरी आला म्हणून पवित्र झाला का? असा सवालही Uddhav Thackeray यांनी उपस्थित केला आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : 'शूरवीर-निष्ठावंतांच्या रायगडावर गद्दारांसाठी टकमक टोक'; ठाकरेंनी घेतला समाचार!

आपण इंग्रजांच्या काळातील एपिडेमिक अॅक्ट या साथ निवारण कायद्यानुसार टेंडर लागत नाही. पण तरीही आपण टेंडर काढून खरेदी केली होती. आता किशोरी पेडणेकर यांच्या मागे चौकशी लावली आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

दोन वेळेला आपणही त्यांच्या प्रचारासाठी होतोच. असं काही नाही की ते एकट्याचे जीवावरती पंतप्रधान झाले. जर तुमच्या अडचणीच्या काळात शिवसेना प्रमुख तुमच्या पाठीमागे तुमच्यासोबत उभे राहिले नसते तर, वाजपेयीजी तुमचं काय करत होते, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनाप्रमुखांचे आणि शिवसेनेचे हे ऋण विसरू नका, असेही त्यांनी सुनावले.

मेरी गॅरंटी है मोदी गॅरंटी है. मोदी गॅरंटी म्हणजे कोणती गॅरंटी? भ्रष्टाचार करा आणि भाजपत या आपको कुछ नही होगा. अभी मोदी गॅरेंटी है, असं म्हणत ठाकरे मोदींवर बरसले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना तुम्ही घाबरवलं. ईडी सोडली, इन्कम टॅक्स सोडले. तुम्ही आज आमच्या माणसांना त्रास देत आहात. रवींद्र वायकर यांच्या घरी माणसे पठवलीत. किशोरी पेडणेकर यांना त्रास दिला. अनिल परब यांच्या मागे चौकशी लावली. साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरामध्ये अगदी काही प्रसंगी मुंबईतल्या झोपडीमध्येही यांची पथकं गेली होती. ज्यांच्यावर आरोप झाले होते ते तुमच्या पक्षामध्ये आले आहेत. त्यातल्या किती जणांची चौकशी सुरू आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन ज्यांच्यावर धाडी टाकल्या, आता तेच सांगतात की हे जवान माझ्या अवतीभोवती असतात. हीच का मोदी गॅरेंटी ? अशीही टीका ठाकरेंनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या दहा वर्षांत किती योजना आल्या? आणि किती पूर्ण झाल्या? उज्ज्वला गॅस योजना, पीकविमा योजना या सगळ्यांचा किती फायदा झाला? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांनी इकबाल मिरची बरोबर गैरव्यवहार केल्याचे तुम्ही ईडी चौकशीतून सिद्ध केले, कारवाई केलीत. प्रफुल पटेल यांनी देशद्रोह्यांबरोबर व्यवहार केला आहे. हे सिद्ध केलं असताना आता प्रफुल पटेल तुमच्याबरोबर आल्याबरोबर कुठे गेली चौकशी? असा सवाल त्यांनी केला

शेतकऱ्यांना अवकाळीची मदत मिळत नाही. त्याच्या डोक्यावरती कर्ज आहे. कर्ज फेडत मरण्यासाठी शेतकऱ्याचा जन्म झाला आहे का? असे म्हणत शेतकऱ्यांच्या मदतीवरूनही ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Kokan Politics: ना ग्रामपंचायत सुद्धा जिंकण्याची वॉरंटी, म्हणून हवी जनतेला मोदीजींची गॅरंटी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com