Uddhav Thackeray : 'एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी!; ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : आता मात्र त्यांची छातीतून हवा गेली आहे. मोदींचा आत्मविश्वास पहिल्यासारखा दिसत नाही. 2014 मध्ये फसलो होतो. त्यावेळी संपूर्ण शिवसेना त्यांच्यासोबत असल्याने त्याचा विश्वास मोठा होता.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Konkan Political News : विरोधातील नेत्यांवर आधी भ्रष्टाचारांचे आरोप करायचे. त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा. त्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना सोबत घ्यायचे, असेच काही दिवसांपासून राज्यात दिसत असल्याची टीका विरोधाकांनी केली आहे. हाच धागा पकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. ते रत्नागिरीत ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारसभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदी Narendra Modi हे 56 इंचाची छाती असल्याचे सांगत होते. 'एक अकेला सब पे भारी' असे ते विरोधकांना उद्देशून म्हणत होते. यापूर्वी त्यांचा काय रुबाब होता. आता मात्र त्यांची छातीतून हवा गेली आहे. मोदींचा आत्मविश्वास पहिल्यासारखा दिसत नाही. 2014 मध्ये फसलो होतो. त्यावेळी संपूर्ण शिवसेना त्यांच्यासोबत असल्याने त्याचा विश्वास मोठा होता. आता मात्र तसे राहिले नाही. 'एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी,' अशी पंतप्रधान मोदींची खिल्ली ठाकरेंनी उडवली.

सध्या कोणता नेता कुणीकडे आहे, हे समजत नसल्याचेही सांगत ठाकरेंनी राज्यात आपीएल म्हणजेच 'इंडियन पॉलिटिकल लिग' सुरू असल्याचे म्हटले. काल एका पक्षात असलेला नेता आज दुसऱ्या पक्षात असल्याने लोक संभ्रामात आहेत. भाजपने राज्यातील राजकारणाचा स्तर खालावला आहे. अखंड शिवसेना फोडून शिंदेंच्या हातात धनुष्यबाण दिला. आता त्यांचे उमेदवार दिल्लीतून कापले जात आहेत. यंदा कोकणातून धनुष्यबाण गायब करण्याचा डाव टाकला. दिल्लीतील हा डाव मुख्यमंत्री शिंदेंच्या Eknath Shinde लक्षातच येत नाही, असेही ठाकरेंनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Ajit Pawar Baramati : इकडं-तिकडं पदाधिकाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम; म्हणाले...

सध्या पंतप्रधान मोदी आणि केंद्रिय मंत्री अमित शाह Amit Shah यांच्या राज्यातील सभा वाढल्या आहेत. याकडे लक्ष वेधत ठाकरे म्हणाले, शिवसेना त्यांच्यासोबत होती त्यावेळी त्यांना राज्यात किती वेळा यावे लागत होते. आता त्यांना राज्यात तळ ठोकून बसावे लागत आहे. का त्यांना अवदसा सूचली. विनाशकाली विपरीत बुद्धी. त्यांचा आता ऱ्हास होत आहे. कांदा राहुद्या आता साता समुद्रापलिकडे भाजपचीच निर्यात करा, असे म्हणत ठाकरेंनी अब की बार भाजप तडीपार अशी घोषणाही दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Thackeray Vs Shinde : आदित्यला CM करण्यासाठी ठाकरेंचा शिंदेंना संपवण्याचा प्लॅन; राजू वाघमारे नेमके काय म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com