
महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेची मागील काही महिन्यांपासून प्रचंड क्रेझ आहे. लाडक्या बहिणी आता आठवा हफ्ता येण्याची वाट बघत असतानाच. या योजनेतून नुकतेच पाच लाखापेक्षा जास्त बहिणींना वगळण्यात आले आहे.
राज्याच्या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी वित्त विभागाने सरकारी खर्चात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अपात्र बहिणांना या योजनेतून वगळण्याचे काम सुरुच आहे. आता यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवण्याऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शाहनिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी E-KYC करण्यात येणार आहे. गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत ते पाहूयात...
लाभार्थी महिलांना आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य केले आहे.
तसेच राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
'लाडकी'वर आता आयटीची नजर आहे. लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार आहे.
लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी होणार आहे.
अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही
जिल्हास्तरावरून फेरतपासणी करुन निकषात न बसलेल्यांना अपात्र करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.