Ladki Bahin Yojana: सरकारी बोगस बहिणींकडून होणार वसुली! 15 कोटी रुपयांची केली जाणार वसुली

Ladki Bahin Yojana: महिला व बालकल्याण विभागाने या महिला कर्मचारी ज्या विभागांमध्ये कार्यरत आहेत.
Ladki Bahin Yojana e-KYC Update
Ladki Bahin Yojana e-KYC UpdateSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून जवळपास १५ कोटी रुपयांची वसुली केली जाणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने या महिला कर्मचारी ज्या विभागांमध्ये कार्यरत आहेत त्या विभागांनी त्यांच्यावर सरकारच्या फसवणुकीचा ठपका ठेवून या योजनेतंर्गत जमा झालेले पैसे वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या वेतनातून हे पैसे वळते करणे किंवा त्यांच्याकडून एकरकमी ते पैसे वसूल करणे या पर्यायावर विचार केला जात आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागासोबत याबाबत चर्चा केली जात असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र सिव्हिल नियम १९७९ (आचरण, शिस्त आणि अपील) यानुसार सरकारची फसवणूक केलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा गंभीरपणे विचार केला जात आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC Update
Top 10 News: जावयाला जामीन मिळताच एकनाथ खडसेंनी केला मोठा दावा ते नेत्यांचा दौरा, घोषणांचा पाऊस... पण मदत कधी?

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना घेता येणार नसल्याची पूर्व अट आहे. मात्र या अटीकडे कानाडोळा करुन ८ हजार सरकारी महिला कर्मचारी आणि पेन्शनचा लाभ घेत असलेल्या १५०० पेक्षा अधिक निवृत्त महिला कर्मचाऱ्यांनी सरकारची फसवणूक करुन या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर कारवाई केली नाही तर चुकीचा पायंडा पडेल अशी भिती विभागाला वाटते आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जावी असे पत्र या ८ हजार महिला ज्या विभागांमध्ये सध्या कार्यरत आहेत त्यांना महिला व बालकल्याण विभागाने पत्र लिहिले आहे.

तसेच अशा प्रकारचे पत्र पेन्शन विभागाला देखील दिले जाणार आहे. आयटी विभागाकडून या महिला कार्यरत असलेल्या विभागाची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या नावानिशी माहिती संबंधित विभागांकडे पाठवण्यात येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या महिला कर्मचाऱ्यांवर नियमानुसार सरकारची फसवणूक करण्याचा ठपका ठेवला जावा. त्यांना नोटीस बजावली जावी. तसेच त्यांना आतापर्यंत या योजनेतंर्गत मिळालेले पैसे त्यांनी सरकारला परत करावेत किंवा त्यांच्या वेतनातून ते वळते केले जावे असा पर्याय देण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC Update
Murlidhar Mohol: केंद्रीय मंत्रीपदानंतर मोहोळ यांच्यावर आणखी एक महत्वाची जबाबदारी! आता थेट तमिळनाडू गाठावं लागणार

या योजनेतर्गंत जवळपास १५ कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा लाभ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तो वसूल केलाच जावा यावर प्रशासन ठाम आहे. ही वसूली करतानाच या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील करता येईल का याची देखील पडताळणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com