Legislative Council Election : 'एकाचा बळी निश्चित, हमारे पास मुख्यमंत्री शिंदे साहब है', शिंदेंच्या आमदाराला विजयाचा काॅन्फिडन्स

Legislative Council Election 2024 Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांनी महायुती कशी विजय होईल, यावर भाष्य केले. महाविकास आघाडीमधील तीन उमेदवारांपैकी एकाचा बळी निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay GaikwadSarkarnama

Sanjay Gaikwad : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज (शुक्रवारी) शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. तत्पूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे फायरब्रँड आमदार संजय गायकवाड यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

'महाविकास आघाडीतील तिघा उमेदवारांपैकी एकाचा बळी निश्चित आहे आणि तो बळी त्यांचे आमदार घेतील', असा दावा केला गायकवाड यांनी केला. तसेच महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी 'हमारे नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काफी है', असा डायलॉग देखील गायकवाड यांनी लगावला.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापाचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या निवडणुकीत काँग्रेसची मते निर्णय असतील. महाविकास आघाडीने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. तशी सत्ताधारी पक्षांकडे विनंती देखील केली आहे. याबाबतचे चित्र दुपारी 3 वाजेपर्यंत स्पष्ट होईल.

MLA Sanjay Gaikwad
Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघात 35 लाखांचा घोटाळा करणाऱ्याला अभय कोणाचे?

या सर्व घडामोडींवर महाविकास आघाडी MVA आणि महायुतीकडून आपलेच उमेदवार विजयी होतील, असा दावा केला जात आहे. परंतु शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे फायरब्रँड आमदार संजय गायकवाड यांनी वेगळाच विश्वास व्यक्त केलाय.

गायकवाड म्हणाले, 'हमारे पास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है. वो है तो सबकुछ मुमकीन है. महाविकास आघाडीतील तीन उमेदवारांपैकी एकाचा बळी निश्चित आहे. तो कोणाचा आहे हे निवडणुकीत स्पष्ट होईल.'

गेल्या वेळेस निवडणुकीत काय झाले होते हे सर्वांना माहीत आहे. काँग्रेस कशी फुटली होती हे देखील सर्वांना माहीत आहे. यावेळी काय होईल हे तुम्हा सर्वांनाच दिसेल. कारण हमारे पास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब है, असा विश्वास संजय गायकवाड यांनी व्यक्त केला.

विरोधकांची नौटंकी...

आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महागाई विरोधात केलेल्या आंदोलनावर देखील टीका केली. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक नाव नौटंकी करत असल्याचा घाणाघात आमदार गायकवाड यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वसमावेश निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे. विरोधकांच्या नौटंकीला महाराष्ट्रातील जनता नक्कीच उत्तर देईल, असा विश्वास आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला.

MLA Sanjay Gaikwad
UK Election Results 2024 LIVE : अब की बार 400 पार! जे मोदींना जमलं नाही, ते ‘या’ नेत्यानं करुन दाखवलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com