Local Body Elections : राज्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुकांबाबत मोठी अपडेट..

Local Body Elections : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत आहेत.
Local Body Elections :
Local Body Elections :Sarkarnama

Local Body Elections In Maharashtra : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील ४ मे रोजी सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली असून, ४ मे रोजी यावर सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Big update regarding municipal elections in the Maharashtra )

Local Body Elections :
Manchar Bazar Samiti Result : मंचर बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात !

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे प्रशांत जगताप यांची याचिका विरूद्ध महाराष्ट्र शासन या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच भवितव्य काय? यासाठी 4 तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा प्रशासकांच्या हाती आहे. राज्यातील 92 नगरपालिका आरक्षण तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भातील सुनावणी लवकरच सकारात्मक निर्णय व्हावा, अशी लोकांची अपेक्षा आहे .

Local Body Elections :
Bazar Samiti Result : रमेश थोरातांनी राऊतांना बोलावले; पण अर्धी सत्ता गमावली

याचिकाकर्ते प्रशांत जगताप यांची प्रतिक्रीया :

"भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजपची निवडणुका हरण्यची मालिका सुरू आहे. भाजपा दोन दोन महिन्याला एक सर्व्हे केला जातो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, अशी भाजपची योजना दिसत आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी आता चिंतन करावं," असा सल्ला प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com