Sharad Pawar NCP Manifesto: पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? पवार गटाचा 'शपथनामा' प्रसिद्ध होताच भाजपची टीका

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar NCP Manifesto: '1977 मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले.'
Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule, Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar NCP Manifesto: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचा शपथनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. या शपथनाम्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर नियंत्रण, दर पाच वर्षांनी जातनिहाय जनगणना यासह समाजातील विविध प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. तर पवारांनी आपल्या जाहिरनाम्याला 'शपथनामा' (Shapathnama) असं नाव दिलं आहे. याच नावावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर टीका केली आहे. बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी पवारांनी आतापर्यंत बदललेल्या राजकीय भूमिकांचा संदर्भ देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रसिद्ध केलेल्या 'शपथनामा'वर टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) पोस्टमध्ये लिहिलं, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने "शपथनामा" नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. 26 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली. आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे!

1977 मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस (Congress) पक्ष फुटला. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले.

1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले.

1980 मध्ये 40 आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

1988 मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले.

1999 मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली.

2019 मध्ये अजितदादांना (Ajit Pawar) शब्द दिला.. आणि फिरवला!

2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित करत पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून या टीकेवर काय प्रत्युत्तर दिलं जातंय हे पाहणं महत्वाचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा शपथनाम्यातील घोषणा

- गॅसच्या किमती 500 रुपयांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार असून यासाठी सबसिडी देण्यात येणार आहेत.

- पेट्रोल-डिझेलचे दर मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करणार.

- दर पाच वर्षांनी जातनिहाय जनगणना करणार.

- शासकीय नोकऱ्यांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी प्रयत्न करणार.

- शासकीय नोकरीमध्ये महिलांचं आरक्षण 50% ठेवण्याचा प्रयत्न करणार.

Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar
Baramati Lok Sabha: 3 आणि 32 क्रमांकावर तुतारीच राहणार..., सुळेंचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला

शेतीमालावरील जीएसटी रद्द करणार. वन नेशन वन इलेक्शन , चीनकडून करण्यात येणारे घुसकरी याबाबत पक्षाचे खासदार संसदेत आवाज उठवणार. सक्षम न्यायव्यवस्था करण्यासाठी आवश्यक बजेट पुरवणार. कामगारांचं वेतन हे चारशे रुपये प्रतिदिन असलं पाहिजे याबाबत सरकारमध्ये आल्यास नियोजन करणार. सरकार आल्यास कंत्राटी भरती रद्द करण्यात येणार .गरिबांसाठी रेशन कार्डाच्या मर्यादित सुधारणा करणार इत्यादी घोषणा या शपतनाम्यातून करण्यात आलेल्या आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com