Maharashtra NOTA News : राज्यात 'नोटा' ला सुमारे सव्वा चार लाख मतं !

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत रायगडात सर्वाधिक 'नोटा' चा वापर; बीडला सर्वांत कमी
Lok Sabha Election NOTA
Lok Sabha Election NOTASarkarnama

Maharashtra News : देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी 'नोटा' ला पसंती दिली आहे. नुकताच निकाल जाहीर झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण 4 लाख 15 हजार 580 मतदारांनी 'नोटा'ला पसंती दर्शवली. रायगडात सर्वाधिक म्हणजे 27 हजार 270 जणांनी नोटाचं बटण दाबलं तर बीडमध्ये सर्वांत कमी म्हणजे 2087 जणांनी 'नोटा'ला मतदान केलं.

लोकसभा 2024 च्या निडणुकीत रायगडमधून पुन्हा एकदा खासदार झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चा फटका बसला होता. त्यावेळी त्यांचा शिवसेनेच्या अनंत गीते यांच्याकडून अवघ्या 2 हजार 110 मतांनी पराभव झाला होता. त्या निवडणुकीत 'नोटा'ला 20 हजार 362 मतं मिळाली होती. या निवडणुकीत देखील रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 'नोटा'चा वापर झाला असला तरी यावेळी तटकरेंनी अनंत गीते यांचा 82 हजार 784 इतक्या मताधिक्यानं पराभव केला.

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना लोकसभेसाठी संधी दिली होती. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीमध्ये 'नोटा'ला सर्वाधिक कमी म्हणजे 2 हजार 87 इतकी मतं पडली. यावेळी बीडमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा 6553 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये बीडमध्ये अडीच हजार जणांनी नोटाचं बटण दाबलं होतं.

Lok Sabha Election NOTA
Manoj Jarange Vs Dhananjay Munde : मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा; आता कसा निवडून येतो तेच बघतो...

महाराष्ट्रात मतदारसंघनिहाय 'नोटा'ला पडलेली मतं (उतरता क्रम)

1. रायगड - 27270

2. पालघर - 23385

3. ठाणे - 17901

4. मावळ - 16760

5. गडचिरोली - चिमुर - 16577

6. मुंबई उत्तर पश्चिम - 15161

7. नंदुरबार - 14123

8. जळगाव - 13919

9. मुंबई दक्षिण मध्य - 13423

10. दक्षिण मुंबई - 13411

11. मुंबई उत्तर - 13346

12. कल्याण - 11686

13. रत्नागिरी - सिंधुदुर्ग - 11643

14. चंद्रपूर - 10843

15. भंडारा - गोंदिया - 10268

16. मुंबई उत्तर पूर्व - 10173

17. मुंबई उत्तर मध्य - 9749

18. शिरूर - 9661

19. यवतमाळ - वाशिम - 9391

20. भिवंडी - 9347

21. बारामती - 9151

22. दिंडोरी - 8246

23. रामटेक - 7827

24. पुणे - 7460

25. सांगली - 6565

26. नाशिक - 6185

27. कोल्हापूर - 5983

28. अकोला - 5783

29. छ. संभाजीनगर - 5773

30. सातारा - 5522

31. नागपूर - 5474

32. शिर्डी - 5380

33. हातकणंगले - 5103

34. धुळे - 4693

35. वर्धा - 4634

36. धाराशिव - 4298

37. रावेर - 4100

38. बुलडाणा - 3786

39. माढा - 3702

40. नांदेड - 3628

41. लातूर - 3567

42. जालना - 3537

43. परभणी - 3385

44. नगर - 3282

45. हिंगोली - 3123

46. अमरावती - 2544

47. सोलापूर - 2725

48. बीड - 2087

एकूणच काय तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त तर बीडमध्ये सर्वांत कमी नोटाचा वापर झाला. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 4 लाख 15 हजार 580 मतदारांनी 'नोटा'ला पसंती दर्शवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 4 लाख 88 हजार 766 जणांनी 'नोटा'चं बटण दाबलं होतं. त्यामुळं मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 'नोटा'चा वापर कमी झाला. थोडक्यात, 'नोटा'ला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 73 हजार 186 मतं कमी पडली, असंच म्हणावं लागेल.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com