Mahapalica Nivadnuk: उद्या होणाऱ्या महापालिकेच्या मतदानासाठी ज्येष्ठांसाठीची निवडणूक आयोगाची 'ही' सुविधा नाही...

Senior Citizens Cannot Vote from Home: ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा नसली तरी त्यांना त्या ठिकाणी गेल्यावर निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही वेगळी रांग नसेल.
Senior Citizens Cannot Vote from Home
Senior Citizens Cannot Vote from HomeSarkarnama
Published on
Updated on

PMC Nivadnuk: महाराष्ट्रातील २९ महापालिकांतील २८६९ जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. उद्या (गुरुवारी) मतदान होत आहे. या महापालिका निवडणुकीत नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली घरबसल्या मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने काढून घेतली आहे. त्यामुळे त्यांना मतदार करण्यासाठी मतदान केंद्रावरच जाव लागणार आहे. यामुळे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा, लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे घरोघरी जाऊन मतदान घेण्यात आले होते. पण उद्या होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने याबाबतचे कोणतेही आदेश अद्याप काढलेले नाही. त्यामुळे सर्वच ज्येष्ठ नागरिकांना उद्या (गुरुवारी) मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवरच जावे लागणार आहे.

ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा नसली तरी त्यांना त्या ठिकाणी गेल्यावर निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीह वेगळी रांग नसेल, त्यांना गेल्याबरोबर मतदान करता येणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Senior Citizens Cannot Vote from Home
Ajit Pawar: अजितदादांची डोकेदुखी वाढली! भाजप-शिवसेनेची खेळी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीचा तिढा कधी सुटणार?

निवडणूक कर्मचाऱ्यांच्या अभावी ही सुविधा देण्यात येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ तसेच दिव्यांगांना आता मतदान केंद्रावर येऊनच मतदान करता येणार आहे.

ज्येष्ठांसाठी घरबसल्या मतदान सुविधेत मतदारांसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन ‘१२ ड’ अर्ज भरून घेण्यात येत असत. मात्र, नगर परिषद आणि नगरपंचायत, महापालिका निवडणुकांपूर्वी अशी कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आली नाही, त्यामुळे निवडणूक आयोगाबाबत ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणूक आयोगाने ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांचे लोकसभा-विधानसभा निवडणुकीत घरी जाऊन मतदान घेतले होते. महापालिका निवडणुकीसाठी ही सुविधा मिळणार नाही. प्रशासनाकडून वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर महिलांसाठी तळघरातच मतदान केंद्रांची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com