
- 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सामाजिक पद यात्रा काढण्यात येणार, दीक्षा भूमी ते सेवाग्राम पद यात्रा काढण्यात येणार
- मुख्य पदयात्रा देशभरातील 75 लोक करणार, इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना निमंत्रित केलं जाणार.
- 2 ऑक्टोबरला दसरा आहे, संघ यावर्षी मोठ्या प्रमाणात तो साजरा करणार आहे. संविधान आणि लोकतंत्र वाचविण्यासाठी आणि नफरत कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे..
- यात शेतकऱ्यांचे मुद्दे असेल देशभरातील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहे.
- जनतेचे मुद्दे यात असणार, व्होट चोरी, बिहार मध्ये गाजत असलेले मुद्दे असतील.
सरकार जनतेला सुरक्षित ठेवू शकत नसेल. आमच्या महिलांना हे सरकार संरक्षण देऊ शकत नसेल तर सरकार आणि पोलिस यंत्रणा काय करते. गृहमंत्रालय आणि गुप्तचर विभाग काय करतोय. गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे, त्यामुळे सरकारने राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की, अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं, हे बंद केले पाहिजे. कारण त्यातून आपलंच तोंड भाजतं. महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी मराठा समाजाच्या बाजूने एकही निर्णय घेतला नाही. आम्ही घेतलं, असं उत्तर दिले आहे.
कुणाचं ऐकून गोंधळ घालायचा असेल तर गावाकडे जाऊ शकता. तुमच्याशी बोलण्यासाठी घोटभर पाणी प्यावं लागलं. हे कोणाचं तरी षडयंत्र आहे, आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे कोणीतरी करतंय. कुणाचं तरी ऐकून गोंधळ करायचा असेल तर गावाकडे निघून जावे. मी मेलो तरी इथून उठत नाही. सरकारला गोळ्या बंदूक घेऊन येऊ दे. मी मरायला तयार आहे, तुमच्यासाठी. पण तुम्ही मी सांगतो तेवढं करा. मराठा आणि कुणबी एकच आहे. ते फायनल आहे आणि आम्ही त्यावर ठाम आहोत, असे उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिले.
कोर्टाच्या सर्व नियमांचं पालन करण्यात येईल. मुंबईकरांना त्रास होईल, असे कोणी वागू नये. तुमच्यामुळे माझी जात हारू नये, याची काळजी घ्या. आमची पोरी इतरांना त्रास देत नाहीत. आंदोलकांनी रस्ते मोकळे करावेत. पोलिसांनी नेमून दिलेल्या ठिकाणी गाड्या लावण्यात याव्यात, असे आदेश मनोज जरांगे पाटील यांनी कोर्टाच्या फटकाऱ्यानंतर मराठा आंदोलक कार्यकर्त्यांना दिले.
उच्च न्यायालयाच्या टिपण्णीनंतर मराठा आरक्षण आंदोलकांचे वकिल मुंबईतील आझाद मैदानावर पोचले आहेत. ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. वकिलांशी चर्चा केल्यानंतर जरांगे पाटील हे माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
आम्ही ठरवलं आहे. आम्हीही उपोषण करणार, आम्ही जिल्हा जिल्ह्यातून आणि तालुका तालुक्यांतून मिरवणुका काढणार आहोत. आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही. असे आम्ही ठरवले आहे, असे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.
आमच्या ओबीसीमध्ये दुसरे वाटेकरी नकाते. अगोदर २५० होते, ते आता ३५० झाले आहेत. आता ते साहेब (मनोज जरांगे पाटील) म्हणतात की तुम्ही १७ जाती नवीन घेतल्या. पण त्या लिंगायत समाजाच्या पोटजाती होत्या. आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांचा ओबीसीमध्ये समावेश झालेला आहे. चार आयोग, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यास नकार दिला आहे. शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी केली आहे. ते ना शरद पवार यांच्या हातात आहे ना देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
मराठा समाज मागास नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे. मराठा-कुणबी एक म्हणणे हा सामाजिक मूर्खपणा आहे. मराठा कुणबी ह्या वेगवेगळ्या जाती आहेत, असेही कोटार्न म्हटलेले आहे. सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यात आलेले आहे, असे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
आंदोलकांच्या काही गोष्टी कोर्टात दाखवण्यात आल्या. जरांगे यांनी कोर्टाच्या नियमाचं पालन करायला सांगितलं आहे. न्याय आणि कायदा सुव्यवस्था पाळण्यास सांगितलं आहे. आम्ही त्या पाळल्या आहेत. पण या आंदोलनात काही समाजकंटक घुसले असून त्यांच्याकडून हे आंदोलन भरकटवण्याचा डाव आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन आहे. यादरम्यान आता राज्यभर मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. समाजात राजकारण्यांविरोधात संतापही आता बाहेर येताना दिसत आहे. याचा फटका नुकताच रावसाहेब दानवे यांना बसला आहे. आता नांदेडमध्ये देखील मराठा खासदार आणि आमदाराच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. आपण यांना पाहिलंत का? असे बॅनर मराठा समाजाच्या वतीने लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मराठा खासदार व आमदारांचे फोटो आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदान येथे करण्यात येणाऱ्या मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. चार दिवस झाल्यानंतर देखील अद्याप आंदोलनाबाबत कोणताही ठोस असा निर्णय होत नसल्याने मराठा आंदोलक काहीशी आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. सीएसटी स्टेशनच्या जवळपास असलेल्या चौकांमध्ये मराठा आंदोलकांकडून ठिय्या मांडण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. तसेच आंदोलक आणि पोलिसांमध्ये छोटे मोठे वाद विवाद देखील पाहायला मिळत आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून मराठा आंदोलकांचा रेटा मुंबईकडे वाढत आहे. अशातच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अनेक गोष्टींवरून अक्षेप घेतला आहे. यावरून न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना मुंबईबाहेरून आता आंदोलकांना येऊ देऊ नका. त्यांना ठाण्यातच थांबवा, आंदोलकांना कंट्रोल करा असे आदेश दिले आहेत.
मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सध्या आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर जोरदार टीका केलीय. यादरम्यान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन मोठा आरोप केला आहे. त्यांनी, मराठा आंदोलकांसमोर पोलीस हेल्पलेस असून मुंबई दाखल होताना आंदोलक देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा दावा केला आहे. तर हे थांबवण्यासाठी न्यायालयाने कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.
मराठा आंदोलनावर हार्यकोर्टात सुनावणी झाली. हायकोर्टाने मराठा आंदोलकांना दोन दिवसांची मुदत दिली आहे. दोन दिवसांत सर्व पूर्ववत करा असं ठणकावलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आतापर्यंत तिसरा खून झाला आहे असं खळबळजनक विधान जरांगे पाटील यांनी केलं आहे.
मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी सुरू आहे. रुद्रा नावाच्या श्वानाकडून सीएसएमटी स्थानकाची पाहणी करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेतली आहे. एमी फाऊंडेशसने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे.
मराठा बांधव आझाद मैदानावर एकत्र येत असतील तर त्यात गैर काहीही नाही. मात्र इतर ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करणार असाल तर समाजाची बदनामी होतीय याचे भान ठेवा.
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रोसिटीअंतर्गत भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशिष्ट समाजाविषयी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली होती.
खासदार सुप्रिया सुळे आज पुण्या दौऱ्यावर आहेत. आज कसबा गणपती दर्शनाला गेल्या आहेत. पुण्यातील मानाच्या गणपती सह इतर गणपतीचे घेणार दर्शन घेणार आहेत.
मुंबई आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना मदत करा, असे आदेश अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाता आज चौथा दिवस आहे. मराठा आंदोलक मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झाले आहेत. काही आंदोलकांनी मंत्रालयात घुसण्याचा देखील इशारा दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सुरक्षमध्ये वाढ करण्यात आली आहे.
जयंत पाटलांनी जत मधून लोकसभेसाठी मुलाचं नाव पुढे केलं पण सर्वेत कुठं नाव येत नव्हतं. त्यानंतर हातकणंगले मधून मुलग्याचे नाव लोकसभेसाठी पुढे केलं पण तिकडे सुद्धा सर्व्हेत कुठेच नाव येत नव्हतं. दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन लढण्यासाठी धाडस लागतं ते धाडस जयंत पाटलाकडे नाही, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आजपासून आपण पाणीही घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे रविवारी रात्रीच सरकारकडून मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी हलचाली सुरू करण्यात आल्या होत्या. रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवाची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेत सीएसएमटी आणि मुंबई पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज (1 सप्टेंबर) बंद ठेवले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असल्याने आंदोलनाला आणखी गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.