Political News Live Updates : अजितदादांनी दिलगिरी व्यक्त करूनही मीडिया ट्रायल सुरू - रोहित पवार

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

NCP SP : पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जनआंदोलन

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यातील आंबेडकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जनआंदोलन सुरू करण्यात आलं आहे. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. या कायद्याच्या आडून सरकार जनतेचा आवाज दाबत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.

Rohit Pawar : अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली तरीही...

कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा काका अजित पवारांची पाठराखण केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत अजितदादांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचं म्हटलं आहे. तसंच मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील! राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात "चहापेक्षा किटली गरम असणारे" एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल झाले आहेत.

PMC : शिंदेंच्या शिवसेनेकडून पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग रचनेनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत हे पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबक पालिका निवडणुकीची रणनीतीची चर्चा करण्यासाठी आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महापालिका निवडणुका स्वबळावर लढायच्या का महायुतीत लढायच्या यावर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे.

पुण्यासाठी शिंदेंची मोर्चेबांधणी, सामंत घेणार बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये निवडणूक लढण्याची रणनिती ठरवण्यासाठी मंत्री उदय सामंत पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. प्रभाग रचनेनंतर शिवसेना पदाधिकारी व्यक्त केली होती. बैठकीत निवडणुका स्वबळावर लढायची की महायुतीत लढायच्या यावर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाजी आज सुनावणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 14 वी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज होणार आहे. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. विष्णू चाटे सुदर्शन घुले सह इतर आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आज न्यायालयामध्ये युक्तिवाद होणार आहे.

कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटण्यास सुरुवात केली आहे.  २ सप्टेंबर रोजी काढलेल्या हैद्राबाद गॅझेटिअरच्या जीआरनुसार ही प्रक्रिया सुरू झाली.

परिवर्तनचे 8 नगरसेवक भाजपमध्ये

मुरबाड नगरपंचायती परिवर्तन पॅनलमधील तब्बल 8 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. भाजपकडून निधी मिळत नसल्याचे सांगत शिंदेंना साथ देणार असल्याच्या प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी सांगितले.

लाडक्या बहि‍णींना मिळणार ऑगस्टचा हप्ता, 344 कोटींचा निधी वितरीत

लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे हप्ता न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र, लाडक्या बहिणींना लवकरच गूड न्यूज मिळणार आहे. सरकारने 344 कोटींचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा निधी जमा केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com