Maharashtra Politics Live Updates : ईडीची मोठी कारवाई : तेलंगाना, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक व दिल्ली-NCR मध्ये एकाचवेळी छापे

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Big News : ईडीची मोठी कारवाई : तेलंगाना, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक व दिल्ली-NCR मध्ये एकाचवेळी छापे

आंध्र प्रदेशातील ३५०० कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई सुरू केली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि दिल्ली-एनसीआरमधील तब्बल २० ठिकाणी छापे टाकण्यात आले. हैदराबाद झोनल कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली असून घोटाळ्यात सामील असलेल्या व्यक्ती व संस्थांच्या ठिकाणी दस्तऐवज, डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. २०१९ ते २०२४ या काळात वायएसआरसीपी सरकारदरम्यान फुगवलेल्या इनव्हॉइसद्वारे १६७७ कोटींचे किकबॅक दिल्याचे निष्पन्न झाले. मनी लॉन्ड्रिंग, हवाला, शेल कंपन्या आणि परदेशी व्यवहारांचा समावेश असलेल्या या प्रकरणाने राज्याच्या महसुलाला प्रचंड फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Amit Shah : अमित शाहांचा बिहार दौरा, देणार विजयाचा मंत्र

गृहमंत्री अमित शाह बिहार दौऱ्यावर असून ते शाहाबादसह 11 जिल्यांतील खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार व भाजप पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहेत. 2020 च्या पराभवानंतर यावेळी निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती आखत शाह विजयाचा मंत्र देणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारवर गंभीर आरोप, मग कोर्टात का जात नाही? भाजप नेत्याचा सवाल

राहुल गांधी यांनी सरकारवर मतचोरीचा गंभीर आरोप केला. मात्र भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पलटवार करत राहुल गांधींचा आरोप फुसका बॉम्ब असल्याचं म्हटलं. त्यांनी प्रश्न केला की, खरोखर पुरावे असतील तर राहुल गांधी कोर्टात का जात नाहीत? हा फक्त राजकीय ढोंग असल्याचं भाजपचं मत.

Amit Satam : राहुल गांधींकडे मुद्दाच उरलेला नाही, त्यांनी पक्ष खड्ड्यात नेण्याचं ठरवलंय - अमित साटम

राहुल गांधींकडे मुद्दाच उरलेला नाही, त्यांनी त्यांचा पक्ष खड्ड्यात नेण्याचं ठरवलं आहे, अशी बोचरी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे. राहुल गांधीच्या आजच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी ही टीका केली. शिवाय आगामी निवडणुकांमध्येही काँग्रेसचा बँड वाजणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील 6850 मतं वाढवली - राहुल गांधी

महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील 6850 मतं वाढवण्यात आल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. यावेळी त्यांनी अनेक पुरावे दाखवले शिवाय आयोगाला आता सबळ पुरावे दिले आहेत त्यामुळे त्यांनी कारवाई करावी अन्यथा ते मत चोरांना संरक्षण देत आहेत, असं समजू, असंही राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi press conference : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मत चोरी करणाऱ्यांचा बचाव करतायत - राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. शिवाय आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार हे गैरप्रकार करणाऱ्या लोकांना पाठिशी घालत आहेत, ते त्यांचा बचाव करत असल्याचंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Rahul Gandhi PC : काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळली, राहुल गांधींचा आरोप

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झाली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. काही ठिकाणी काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.

Latur News : मराठवाड्यातील महादेव कोळी समाजाचे आमरण उपोषण स्थगित

मागील अनेक वर्षांपासून महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाला एसटी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील इतर भागांत सहज प्रमाणपत्र मिळते. पण मराठवाड्यात वेगळे निकष लावले जातात. असा आरोप करत मराठवाड्यात महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाने विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनस्थळी भेट देत पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे.

Sharad Pawar : 'नरेंद्र मोदींना मी पंचाहत्तरीनंतर थांबा, असं म्हणू शकत नाही'

देशाचे पंतप्रधान मोदी यांचा बुधवारी (ता.17) 75 वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा केला गेला. देशासह परदेशातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे पंचाहत्तरीनंतर पंतप्रधान मोदी राजकीय निवृत्ती घेणार का? याबाबतची चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोदींच्या निवृत्ती संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी नरेंद्र मोदींना मी पंचाहत्तरीनंतर थांबा, असं म्हणू शकत नाही, तो मला नैतिक अधिकार नाही. कारण मी स्वत: पंचाहत्तरीनंतर थांबलो नाही, आता माझं वय 85 आहे, असं म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

राज-उद्धव एकत्र आले तर आनंदच - शरद पवार

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांचीही मुंबईत ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल, असे शरद पवार म्हणाले,

ओला-उबेर विरोधात रिक्षा संघटना आक्रमक

आज दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथे ओला- उबर वर काम करणाऱ्या कॅब आणि रिक्षाचालकांची सभा होणार आहे. राज्याच्या सहाय्यक परिवहन आयुक्तांना वारंवार लेखी व तोंडी सरकारी दर पाळण्याचे आश्वासन देऊनही ओला उबर रॅपिडो नामक कंपन्यांनी आजतागायत त्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर कोणतेही दर लागू केले नाही. दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी दिलेले आश्वासन, तसेच त्यापूर्वी अनेक वेळा सदर कंपन्या शासकीय अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नियमांची पायमल्ली करून शासनाची व चालकांची फसवणूक करत असून या विरोधात आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान मुंबई येथे ओला उबेर रॅपिडवर काम करणाऱ्या टॅब रिक्षा व टॅक्स चालकांची जनसभा होईल, व आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे भारतीय गिग कामगार मंच अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी सांगितले,

राहुल गांधींची आज पत्रकार परिषद

विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (गुरुवारी) सकाळी 10 वाजता विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत. राहुल गांधींनी या आधी मतचोरीचा हायड्रोजन बाॅम्ब टाकणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मतचोरीबाबत ते मोठा खुलासा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न - मंत्री लोढा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्यावतीने "स्वच्छता अभियान" राबविण्यात आले. कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आणि ५०० खाजगी आयटीआय मधून हजारो विद्यार्थी व शिक्षकांनी ७५० गावांमध्ये सदर स्वच्छता अभियान राबवले. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

मध्यरात्री पुण्यात गोळीबाराचा थरार, एक जण जखमी

बुधवारी मध्यरात्री पुण्यातील कोथरुड परिसरात किरकोळ कारणावरून निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार करण्यात आली असल्याची घटना घडली. गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com