
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणूक लढवण्यासाठी 2 ते 3 कोटी रुपये खर्च करण्यासह कधी कधी 100 बोकड सुद्धा कापावे लागतात असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. आमदार संजय गायकवाड यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना थेट फटकारलं असून वडेट्टीवार, वैभव नाईक व त्या मुंबईच्या महापौर बाईंनी जास्त चभरेपणा करु नये. मी माझ्या नाही तर तुमच्या पक्षाबद्दल बोलत होतो असे म्हणत युटर्न घेतला आहे.
लक्ष्मण हाके यांनी नाभिक आणि धोबी समाजांना अनुसूचित जाती (एससी) आरक्षणात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. यावरून राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. या मागणीवर सचिन खरात यांनी प्रतिक्रिया देताना, दलित समाजाला चिथावू नये असा इशारा दिला आहे. तसेच अशा मागण्यांमुळे पुन्हा भीमा कोरेगावची घटना घडू शकते, असाही दावा त्यांनी केला असून हाके यांच्यावर जातीय भांडणे निर्माण करण्याचा आरोप देखील खरात यांनी केला आहे.
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून हैदराबाद गॅझेटमुळे ओबीस विरूद्ध मराठा समाज असं चित्र निर्माण झालं आहे. यादरम्यान आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नाभिक, धोबी समाजाला एससीमधून आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
आज मध्यरात्रीपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी, GST चे नवे दर लागू करणे म्हणजे देर आये दुरुस्त आये अशी गत आपल्या सरकारची झाली आहे. GST संकल्पना म्हणजे वन नेशन वन टॅक्स अशी होती मग एवढे स्लॅब करण्याची गरज काय होती असा सवाल उपस्थित कोल्हे यांनी केला आहे. तर महागाई नियंत्रण करण्यात सरकारला येत असलेलं अपयश झाकण्याचा प्रयत्न यातून झालाय का असाही संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
रायगडच्या कर्जतमध्ये आज राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का बसला आहे. कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसेना समर्थक आणि खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्षासह सर्पक प्रमुख सुनिल पाटील आणि रायगड उत्तर भाजप महिला अध्यक्षा अश्विनी पाटील, भाजप शहर अध्यक्ष राहुल जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे रायगडमद्ये राष्ट्रवादीने शिवसेनेसह भाजपवर कुरघोडी केल्याची चर्चा सुरू आहे.
देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत, केंद्र सरकारनं जीएसटी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पुर्वी जीएसटीचे चार स्लॅब होते, त्यातील दोन रद्द करून आता फक्त 18 टक्के आणि 5 टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. सुधारीत दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील, त्यामुळे अनेक वस्तू आता स्वस्त होणार आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. त्यानंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे सांगितले.
मुंडे साहेबांनी मला तुमच्या ओटीत घातले आहे. आपलं अद्भुत नातं आहे असं म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक भाषण केलंय. पाटोदा येथील श्री संत भगवान बाबा जन्मोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या. "मुंडे साहेबांनी मला राजकारणात यायचं नव्हतं; मी घर कोंबडी मुलगी आहे. मी आई-वडिलांना सोडून कधी राहिले नाही. निवडणुकीत माझ्या लेकराला सोडून मी राहिले. संपूर्ण जीवन समाजाला दिले आहे. मुंडे साहेबांनी मला तुमच्या ओटीत घातले आहे; ही अतूट नाते आपल आहे. आज जे काही मी करते, तो प्रत्येक श्वास मुंडे साहेब आणि भगवान बाबांना शोभेल असाच घ्यायचा प्रयत्न आहे. युद्धात जाताना हातातली तलवार खाली ठेवायची नाही. मी जीवनात हेवा-द्वेष कुणाच्या काड्या नाही केल्या. लोक बोलली असतील, पण मी त्यांच्यावर कधीही राग केला नाही."
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात येऊन धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलेल्या आंदोलकांची भेट घेतली, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतानाच त्यांना खोचक टोला देखील लगावला. जालन्यात येत असताना गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे, यावर देखील सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना खोचक टोला देखील लगावला आहे. लोक मुलींना नांदायला पाठवतात, मात्र जरांगे पाटील यांनी एक परंपरा सुरू केली आहे, जरांगे स्वत: नांदायला सासुरवाडीला आले आहेत, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
प्राप्तीकरातील सूट आणि जीएसटी सुधारणा हे एकत्रित केले तर मागील एक वर्षांत घेतलेल्या निर्णयांमुळे देशातील जनतेची अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक बचत होईल. त्यामुळे हा बचत उत्सव असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रत्येक घर स्वदेशीचे प्रतिक व्हायला हवा. प्रत्येक दुकान स्वदेशीने सजले पाहिजे. मी स्वदेशी खरेदी करतो, असे गर्वाने म्हणा. भारतात बनलेली वस्तूच तुम्ही खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. त्यांनी राज्यांनाही आत्मनिर्भर भारतासाठी राज्यांनाही स्वदेशी वस्तूंचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
गरीब, मध्यवर्गीयांना आता आपली स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे. घर बनविणे, टीव्ही, फ्रीज, बाईक आदी वस्तू खरेदी करणे शक्य होणार आहे. आता फिरणेही स्वस्त होणार आहे. दुकानदारही या सुधारणांबाबत खूप उत्साहात आहेत. अनेक ठिकाणी आधीचे दर आणि आताचे दर याचे बोर्ड लावले जात आहे. नागरीक देवो भव या मंत्राने आपण पुढे जात आहोत. नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांमध्ये त्याची झलक पाहायला मिळत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
जीएसटीच्या नव्या सुधारणा उद्यापासून लागू होणार आहेत. सर्व राज्यांना तसेच प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन जीएसटी लागू करण्यात आला होता. सुधारणा आवश्यक असतात. त्यानुसार या सुधारणा करण्यात आल्या आहे. आता फक्त ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच स्लॅब असतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आपल्या देशातील गरीब, मध्यवर्गीय लोक, युवक, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांना या उत्सवाचा खूप फायदा होईल. उत्सवांमध्ये प्रत्येक तोंड गोड होणार आहे. कुटुंबामधील आनंद वाढणार आहे. जीएसटी सुधारणांच्या आणि बचत उत्सवासाठी मी देशवासियांना शुभेच्छा देतो. या सुधारणा देशाच्या विकासाला पुढे नेतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुर्योदयासोबतच नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा लागू होणार आहे. एकप्रकारे उद्यापासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार आहे. या उत्सवात तुमची बचत वाढून तुम्ही तुमच्या पसंतीच्या वस्तू अधिक खरेदी करू शकता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Ph.D चे विद्यार्थी सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांमार्फत फेलोशिपची जाहिरात काढावी, तसेच वेळेवर फेलोशिप द्यावी, या मागण्यांसाठी पुण्यातील गुडलक चौकात आंदोलन करत आहेत. त्यांची आमदार रोहित पवार यांनी आज भेट घेतली.
वकिल गुणरत्न सदावर्तेंवर जालन्यात हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शाहु, फुले, आंबेडकरांचे नाव आपण घेतो, त्यांच्या मार्गावर जाण्याचं ठरवतो. तरी देखील असे हल्ले होतात. कालही नाशिकमध्ये पत्रकारांवर हल्ला झाल्याचे पवार म्हणाले.
आमदार निलेश राणे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राणे व ठाकरे यांच्यात वीस मिनीट चर्चा झाली. निलेश राणे यांच्या मुलाचा वाढदिवस होता. यावेळी त्याने राज ठाकरेंना भेटायचा हट्ट धरला. यानंतर राज ठाकरेंनी त्यांना घरी भेटण्यासाठी बोलावले असे कळते. त्यामुळे राणे मुलासह राज ठाकरेंना भेटले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सोप्या राहिलेल्या नाहीत. या निवडणुकांमध्ये ३-३ कोटी रुपयांपर्यंत खर्च होतो. असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली असून संजय गायकवाड सत्य बोलले, त्यांच्या पोटातलं ओठावर आलं'.. अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे.
(कै.) राजारामबापू पाटील आणि त्यांचे पुत्र जयंत पाटील यांच्याविषयी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या सोमवारी राष्ट्रवादीचा सांगलीत राज्यस्तरीय मोर्चा निघणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जालना इथं दौऱ्यावर असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते आज धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. हल्ला करणाऱ्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी दिल्या.
मुंबई हवामान विभागाने पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला असून, 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह विजांसह हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे.
कंत्राटी भरतीने कर्मचाऱ्यांचे शोषण तर होतेच परंतु कोणतीही विशेष भरती परीक्षा न घेता अशी पदभरती केली जाते. पुढं हेच कर्मचारी कायम करावे म्हणून मुंबईत आंदोलनाला बसतात. दोन्ही बाजूंनी नुकसान होत असल्याने सरकारने कंत्राटी पदभरतीचा निर्णय रद्द करावा आणि कायमच्या भरतीची जाहिरात काढावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. कंत्राटी पदभरतीचा जाहीर निषेध, प्रताप सरनाईकांना विनंती आहे आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटले आहे.
नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी, आशा बाळगू नका. चंद्रपुरातील जनताच तिकीट ठरवणार आहे. सर्वेक्षणानंतर निर्णय घेतला जाईल. चंद्रपूर महानगरतर्फे कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. आमदार किशोर जोरगेवार आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून इंदिरा गांधींच्या पुतळ्याला कापड बांधून त्यांचा चेहरा झाकण्यात आला आहे. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची अशी करण्यात आलेल्या विटंबनेची काँग्रेस पक्षाकडून दखल घेत पोलिसांकडे तक्रार केली आहे. इंदिरा गांधींचा पुतळा स्वच्छ करत पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
व्यावसायिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला कर्ज मंजूर झाले नाही, असे सांगत त्याच्याच कागदपत्रावर त्याची जमीन गहान ठेवत तब्बल 50 लाखांचे खर्च स्वतःच्या नावावर वर्ग करण्यात आले. या प्रकरणी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) देशाला पाच वाजता संबोधित करणार आहेत. ते नेमके काय बोलणार याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.
अनेक बोगस दाखले देण्यात येत असून, सरकारमधील मंत्री आणि मोठे नेते प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने बालेवाडी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचा समारोप करण्यात आला. या परिषदेस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह राज्यातील शिक्षण विभाग, पुणे महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणातील तपासात आंदेकर टोळीच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर आले आहेत. पोलिसांनी बंडू आंदेकर व सहकाऱ्यांची तब्बल 27 बँक खाती गोठवली असून त्यांत 50 लाख 66 हजार 999 रुपये असल्याचे उघड झाले आहेत.
आयटी पार्क हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्या मेट्रो मार्गाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. कारण या मार्गाची आणि त्यावरील प्रस्तावित स्टेशनची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली असून आयटी पार्क हिंजवडी आणि चाकणया नव्या प्रस्तावित स्टेशनवर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Eknath Shinde Twitter hack latest update : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स (ट्वीटर) खाते हॅक झाले. त्यांच्या खात्यावर पाकिस्तान अन् तुर्की येथील व्हिडिओ दिसत होते. त्यांचे खाते सध्या रिकव्हर करण्यात आले आहे. पण उपमुख्यमंत्र्यांचे खातेच हॅक झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मंत्री पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. यासाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्ह्यातील संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
एसटी महामंडळात सरकारतर्फे लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळात कंत्राटी चालक आणि सहाय्यकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती एकूण 17 हजार 450 पदांसाठी होणार आहे. ही भरतीती निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबर पासून होणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये दौरे करत आहेत. विविध विकासकामांचा आढावा घेत ते आगामी स्थानिकच्या निवडणुकीसाठी पुण्यात फिल्डिंगही लावत असल्याचं बोललं जात आहे. अशातच आज पुन्हा अजितदादा पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले असून सकाळी ते नमो रन मॅरेथॉनमध्ये ते सहभागी होणार आहेत. यावेळी पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार आणि स्थानिक पदाधिकारी देखील हजेरी लावणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.