Maharashtra Live Updates : भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Supreme Court On Stray Dogs
Supreme Court On Stray DogsSarkarnama

Supreme Court On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचा आदेश बदलला असून, कुत्र्यांना वैक्सीन दिली जाईल आणि पुन्हा त्याच क्षेत्रात सोडले जाईल. परंतु सार्वजनिक ठिकाणी अन्न दिलं जाणार नाही. अन्न देण्यासाठी वेगळी सोय करावी. नसबंदी करून पुन्हा कुत्र्यांना सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना, या केसचा पॅन इंडिया विस्तार केला आहे. भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना 25 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. प्राणीप्रेमी कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी एमसीडीकडे अर्ज करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

Pandharpur Weather Forecast : पंढरपूरला पूरस्थिती, आपत्ती व्यवस्थापन टीम दाखल; 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

Pandharpur Weather Forecast
Pandharpur Weather ForecastSarkarnama

पंढरपुरातील चंद्रभागा नदीला महापूर आला असून, महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. उजनी व वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदीमध्ये एक लाख 70 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या सकल भागामध्ये पुराचे पाणी शिरले असून, जवळपास 300 हून अधिक कुटुंबांना व 700 ते 800 नागरिकांना सुरक्षित स्थळी घालवण्यात आले आहे..

Maratha Reservation : मंत्री रामदास आठवलेंचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला

धाराशिवच्या सारोळा गावात मराठा आंदोलकांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा ताफा अडवला आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबई येण्याची वेळ येऊ देवू नका, त्यापूर्वीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आंदोलकांनी मंत्री आठवलेंकडे केली. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची रामदास आठवले यांच्यासमोर 'एक मराठा लाख मराठा' अशी जोरदार घोषणाबाजी केली.

Sanjay Raut : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला 'एनडीए'चं मत फुटण्याची भीती; संजय राऊत यांचा टोला

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "संविधान पायदळी तुडवून, पक्ष फोडणं, आमदार फोडणं, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, शरद पवारसाहेबांचा पक्ष फोडला, याच पक्षांकडे आता मतं मागत आहात. आपल्याकडे बहुमत असून, इतर पक्षांकडे मत का मागता? तुम्हाला भीती वाटते की, तुमची मतं फुटतील, डुप्लिकेटचे शिवसेनेचे मतं फुटतील? अशी भीती आहे. पण त्यांनी फोन करणं, म्हणजे शिष्टाचार आहे." देवेंद्र फडणवीसांनी चाणक्य नीती शिकवू नये,असा देखील टोला संजय राऊतांनी लगावला.

Nawab Malik : नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादीच्या निवडणूक व्यवस्थापक समितीचे अध्यक्षपद

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार नवाब मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानच्या 'मुंबई निवडणूक व्यवस्थापन समिती'च्या अध्यक्षपदी नवाब मलिक यांच्याकडे देण्यात आले आहे.

संजय राऊत म्हणजे नया मुल्ला जोरसे बांग - केशव उपाध्ये

अमित शाह यांच्यावर सोराबुद्दीन प्रकरणी सामना अग्रलेखात टीका करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोम्बा. हिंदुत्व सोडून राहूल गांधीचे मांडलिकत्व स्वीकारून कॅाग्रेस अंकीत झालेल्या संजय राऊत हे ‘नया मुल्ला जोरसे बांग देता है’ या म्हणी प्रमाणे भाजपा नेत्यांवर रोज टीका करत असून राहूल गांधी सुंध्दा त्यांचे चाळे पाहून ‘नया है वह…’ म्हणत हसत असेल. बाकी सोडा आपले पूर्वीचे सोहराबुद्दीन प्रकरणातील सामनाचे अग्रलेख तरी आठवायचे होते, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

सदाभाऊ खोत यांची टीका करताना जीभ घसरली

सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले, खिलार किंवा देशी गाईची कधीच विक्री होत नाही. जेव्हा शेतकऱ्यांच्या गाड्या अडवायला सुरवात झाली तेव्हा मी त्यांची बाजू घेतली. मला धमक्या आल्या. अरे धमक्या कोणाला देता, शेतकऱ्यांच्या पोराला म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय, तुम्ही जर माझ्या वाटेला गेला. तर तुमच्या **** नांगर फाळ घातल्याशिवाय राहणार नाही.

तारापूर एमआयडीसीतील कंपनीत वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू

बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये औषध कंपनीत वायूगळती होईन चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, चार जणांनची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती, कमलेश यादव यांचा समावेश आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ १३ मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड कंपनीत ही वायुगळती झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com