10 दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने 22 लाख एकरावर शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय, असेही मंत्री भरणे यांनी म्हटलं आहे.
शरद पवार आणि उप मुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या 65 व्या वार्षिक अधिवेशनात दोघं पवार एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दर वर्षी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचं अधिवेशन होत असतं. उप मुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी विभागांचे प्रधान सचिव विकास रस्तोगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहेत.
उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी दिल्ली इथं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या 40 फेऱ्यांऐवजी 50 फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार बालदी यांनी दिली.
अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौकात असणाऱ्या एक जुन्या धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हा प्रकार आज पहाटे झालं. धार्मिक स्थळ जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या धार्मिक स्थळाकडे पाहिले जात होते. हे धार्मिक स्थळ संपूर्णपणे तोडून टाकण्याची तयारी केली गेली होती. अहिल्यानगर शहरात यामुळे तणाव असून, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस सीसीटीव्हीमधील चित्रीकरणाच्या मदतीने धार्मिक स्थळ पाडणाऱ्यांचा शोध घेत आहेत.
नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांसह उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला होता. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून परप्रांतीय नागरिकाने राज ठाकरेंविषयी अर्वाच्च भाषा करत मराठी नागरिकांविरोधात गरळ ओकली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या परप्रांतीय नागरिकाला चोप दिला होता होता.
मुंबई महापालिकेशी संबंधित असलेल्या दी म्युनिसीपल काॅ.बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित जय सहकार पॅनेलचा पराभव झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि १४६ गणांची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी (ता. २२) प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील सर्व तहसील, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकांवर प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत गट आणि गणांमध्ये घट झाल्याने आरक्षणदेखील नव्याने करावे लागणार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग घेणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचं कौतुक केलं आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असून भारत आता जगातील शंभर देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्यात करणार आहे. या संदर्भातील 26 ऑगस्टला खूप मोठा कार्यक्रम आयोजित केल्याचंही मोदींनी सांगितलं. तर तज्ञांनी आता जागतिक विकासात भारताचं योगदान 20 टक्के असेल असं सांगितलं आहे. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा खूप मजबूत आहेत. महागाई कमी आहे, व्याजदर कमी आहेत, असंही मोदींनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
गणोशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या मुंबईकरांचे हाल होणार आहे. चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल पडल्याने या मार्गावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल पडल्याने 10 ते 15 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पूल नदीत कोसळ्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी येथे आले होते. सुदैवाने येथे कोणतीही दुसरी दुर्घटना घडली
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.