एसटी कर्मचारी कृती समितीने दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यासाठी कृतिसमितीने पुन्हा एकदा एल्गाराचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव फरक लवकर द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
छत्रपती संभाजी नगरमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. वाळूज परिसरातील महाराणा प्रताप चौकात स्कॉर्पिओतून आलेल्या तीन ते चार जणांनी एक भिशीचालकावर सिनेस्टाइल हल्ला चढवला. चाकूने वार केला, गोळीबाराचाही प्रयत्न केला मात्र गावठी पिस्तुलाचे मॅगझिन खाली पडल्याने अनर्थ टळला. या घटनेत भोलानाथ श्यामराव कडमी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कुमशेत गावातील ठाकर वस्तीवरील इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने सावज बनवले. जुन्नर तालुक्यात बिबटयाने माणसांना ठार केल्याची या महिन्यातील हि तिसरी घटना आहे.
युवकांच्या आंदोलनामुळे लेह जिल्ह्यातील वातावरणं तापलं आहे. संतप्त आंदोलकांनी वाहने जाळली आहे. आंदोलनात चौघांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 15 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण करत होते.
सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टाचा मोठा फटका बसला आहे. नद्यांना पूर आल्याने नागरिक अडचणीत आले आहेत. या परिस्थितीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. मंदिराकडून तब्बल1700 फूड पॅकेटसचे वाटप करण्यात आले आहे.
हैद्राबाद गॅझेटचा जीआर रद्द रण्यात यावा, या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने तुषार वाढोणकर आणि चंद्रशेखर देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहेत. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यात 22 वर्षीच्या कुमार आघावी याने आत्महत्या केली. ओबीसी आरक्षण गमावल्याने मानसिक तणावात आल्याचे सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिलं आहे. कुमार हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याला चार बहिणी आहेत.
भाजपाआमदारानी एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले, करोना काळात याच भाजपा आमदारानी त्यांचे वेतन मुख्यमंत्री निधीला देण्या ऐवजी पंतप्रधान सहायता निधीला दिले,महाराष्ट्राचा हा अपमान होता. ढोंग आणि बनावटगिरी म्हणायचे ते यालाच, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीची मदत मिळावी व कर्जमाफी व्हावी अशी मागणी करणारे पत्र आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले. ते ह्या मागण्यांची दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करतील आणि घोषणांच्या पुढे जाऊन मदत करतील, अशी आशा आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीची मदत मिळावी व कर्जमाफी व्हावी अशी मागणी करणारे, पत्र आज मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 24, 2025
ते ह्या मागण्यांची दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करतील आणि घोषणांच्या पुढे जाऊन मदत करतील, अशी आशा… pic.twitter.com/qXwnohqJTy
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना शरद पवारांनी केंद्र सरकारच्या सहकार्याने भरवल्या जाणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनांमध्ये हिंदुत्ववादी विचारसरणी आणि गोळवलकर गुरुजींचे साहित्य दिसते. मात्र, आंबेडकरवादी किंवा समतावादी चळवळीतल्या साहित्याला तिथे स्थान नसते ही खेदाची गोष्ट असल्याचं वक्तव्य केलं.
पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी सुकर व्हावी म्हणून राज्य सरकारने आता शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करायलाच पाहिजे आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत सरकारने दिलीच पाहिजे, अशी मागणी करत. मराठवाड्यातील पूरग्रस्तासाठी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि भारती विद्यापीठाकडून मदत दिली जाणार असल्याची माहिती काँग्रेस आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरूजी) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सांगली येथील दुर्गामाता दौड कार्यक्रमात बोलताना. नवरात्रीत दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपणा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भिडे म्हणाले, 'आपल्याला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको, तर हिंदवी स्वराज्य हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी विस्कटलेल्या नवरात्रीचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली होती. त्याच प्रेरणेने आम्ही दुर्गामाता दौड घेतो. आपण गणपती व नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून या सणांचे विकृतीकरण केले आहे. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे.'
येवला व निफाड तालुक्यातील सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज करणार आहेत.
परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली नसल्यामुळे गंगाखेड पालम पूर्णा या तीन तालुक्यातील 17 गावांचा संपर्क तुटला आहे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आज बारामती पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याची माहिती आहे. बारामतीत ओबीसी समाजाचा मोर्चा काढल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरो हाके यांनी केला आहे. परभणीमधून ते त्यांच्या समर्थकांसह बारामतीमध्ये दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरश: वाहून गेल्या आहेत. सरकारकडून पूर परिस्थितीची पाहणी सुरू आहे. अशातच आज ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. याबाबतची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 6 वाजतल्यापासून बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे. बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट या गावातून सुरुवात होत आहे. त्यानंतर त्यांनी विविध गावातील पावसामुळे झालेल्या पाहणी नुकसानग्रस्त पिकांची आणि भागाची पाहणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.