Manoj Jarange Patil live: ओबीसींची आरक्षण काढून आम्हाला नको,ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या, असे मनोज जरांगे म्हणाले. फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, आरक्षणाबाबत त्यांना राजकारण करायचे आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाली आहेत. मनोज जरांगे यांचे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत, उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलकांमुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी आंदोलकांची आहे.
राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. यामुळे मराठा समाजाला सरकारकडून मोठा दिलासा मिळाल्याच पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. अशातच आता जरांगेंच्या मागण्यांमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे ओबीसी महासंघाकडून आजपासून नागपुरात साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेडसह बहुतांश ठिकाणी दमदार पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात तीन दिवसाच्या पावसामुळे शेतीच प्रचंड नुकसान झाले आहे.
मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन आणि राज्यात सुरू असलेला गणेशोत्सवामुळे सर्व पोलिसांच्या रजा तडकाफडकी रद्द करण्यात आल्या असून सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तातडीने ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईतील मराठा आंदोलकांचा मुक्काम वाढला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी जाणार नसल्याचं आंदोलकांनी ठरवलं आहे. मात्र, आझाद मैदानाच्या परिसरातील हॉटेल आणि जेवणाचे स्टॉल्स बंद असल्यामुळे मराठा आंदोलकांचे मोठे हाल होत आहेत. अशातच आता मराठा आंदोलकांनी मराठा बांधवांसाठी नाश्त्याची सोय केल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली. राज्यातील मराठा आरक्षणासह, बिहार निवडणुकी बाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतची माहिती शहांनी जाणून घेतल्याचं सांगितलं जात आहे.
देशात पहिलं आरक्षण 50 टक्के दिले. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी माझा पहिल्या दिवसांपासून प्रयत्न आहे. माझा मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा आहे. सरकार आणि पाटील यांनी लवकर मार्ग काढावा ही विनंती, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील ज्या मैदानात आंदोलन करत आहेत. त्या आझाद मैदानात मागील काही तासांपासून पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मैदानात चिखल झाल्यामुळे मराठा आंदोलकांची गैरसोय झाली आहे. तर रात्री देखील थोडा पाऊस पडल्यामुळे शेकडो आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आसरा घेतल्याचं पाहायला मिळालं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.