राज्यातील शेतकरी आज अतिवृष्टीने पुरता कोलमडला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर मागील सहा दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषण करत आहेत. उपोषणकर्ते सरपंच मंगेश साबळे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असून सरकारने अजूनही दखल घेतलेली नाही, असे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहेकी, त्यांची खालावत असलेली तब्येत बघता त्वरित त्या भागातील मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ संवाद साधत तोडगा काढावा, ही विनंती! त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी! सोमवार मीही त्यांची भेट घेणार आहे.