Narayan Rane : महायुती, ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? नारायण राणेंचा अंदाज 'सबसे अलग'

Narayan Rane seat prediction: नारायण राणे यांनी मतदानादिवशी महायुतीच सत्तेत येणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.
Uddhav Thackeray, Narayan Rane
Uddhav Thackeray, Narayan RaneNarayan Rane
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मतदानादिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसह महायुतीला किती जागा मिळणार, याचा आकडा सांगितला. महायुतीला राज्यात 161 जागा मिळतील, असे भाकित राणेंनी वर्तवले आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 10 ते 12 जागाच मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते जे काही आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंमुळे असल्याची टीका केली. मी उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडली. त्यांचे विचार चांगले नाहीत. त्यांना 10 ते 12 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही. तर महायुतीचे 161 आमदार निवडून येतील आणि भाजप, राष्ट्रवादी काँगेस आणि शिवसेनेची सत्ता येईल, असे राणे म्हणाले.

Uddhav Thackeray, Narayan Rane
Hitendra Thakur : तावडेंच्या आरोपांवर ठाकूर बरसले; म्हणाले, 'काल भिजलेल्या कोंबडीसारखे...' पाहा VIDEO

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप झाले आहे. त्यावर बोलताना राणेंनी तावडे हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबाबत असे व्हायला नको होते, असे सांगितले. ते म्हणाले, ‘तावडे यांच्याविषयी जे घडले ते योग्य नव्हते. ते ज्येष्ठ नेते आहेत.’ पुत्र नीतेश आणि नीलेश राणे दोघेही शंभर टक्के निवडून येणार, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून तर नितेश राणे कणकवली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात अनुक्रमे वैभव नाईक आणि संदेश पारकर मैदानात आहेत. दोन्ही मतदारसंघातील लढत हायहोल्टेज असल्याने नारायण राणे यांनी दोन्ही मतदारसंघात जोरकसपणे प्रचार केला. तर उद्धव ठाकरेंनीही या मतदारसंघात प्रचारसभा घेत राणेंवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.

Uddhav Thackeray, Narayan Rane
Sushilkumar Shinde : ‘सोलापूर दक्षिण’मध्ये काँग्रेसने डाव टाकला; ठाकरेंना धक्का देत शिंदेंकडून अपक्ष काडादींना पाठिंबा जाहीर

दरम्यान, राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत केवळ 18.14 टक्के मतदान झाले आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी अधिक आहे. कोकणातील मतदानाचा टक्काही तुलनेने कमी आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com