Mahadev Jankar : 'शिवसेना-राष्ट्रवादी फोडली, माझे आमदार पळवले; भाजपची मस्ती जिरवणार', संतप्त महादेव जानकरांनी दिले चॅलेंज

Mahadev jankar BJP Assembly Election : जानकर म्हणाले, 'सत्तेच्या जोरावर भाजपने पक्ष फोडले, शरद पवार उद्धव ठाकरे यांचे पक्ष आणि चिन्ह पळवलं. लोकांचा भाजपवरील राग हा विधानसभेच्या निवडणुकीतून दिसून येईल आअि भाजपचा पाडाव होईल.'
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Mahadev Jankar News : लोकसभेला भाजपचे सहकारी असणारे राष्ट्रीय समाजे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे भाजपवरच संतप्त झाले आहे. महादेव जानकर स्वबळावल विधानसभा निवडणूक लढत असून भाजपवाल्यांची मस्ती जिरवतो आता काळजीच करू नका, असे चॅलेंजच जानकर यांनी दिले आहे.

महादेव जानकर म्हणाले,'भाजपची मस्ती वाढलीये. त्यांची शिवसेनेची, राष्ट्रवादीची दोन शकलं केली. आम्ही काय केलं होतं.आमचे दोन आमदार पळवले. आमच्या पक्षाकडून ते निवडून येत होते. आत्ता या भाजपवाल्यांची मस्ती जिरवतो तुम्ही काळजीच करू नका'.

Mahadev Jankar
Asaduddin Owaisi : शिंदेंबरोबर '12'चा आकडा, फडणवीसांचे CM पदाचं स्वप्न..; असदुद्दीन ओवैसींचा तिखट मारा

महादेव जानकर यांनी पंढपूरमध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचासाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देखील भाजपवर राग व्यक्त केला होता. जानकर म्हणाले, 'सत्तेच्या जोरावर भाजपने पक्ष फोडले, शरद पवार उद्धव ठाकरे यांचे पक्ष आणि चिन्ह पळवलं लोकांचा भाजपवरील राग हा विधानसभेच्या निवडणुकीतून दिसून येईल आअि भाजपचा पाडाव होईल.'

लोकसभेत पराभव

महादेव जानकर हे लोकसभेता महायुतीसोबत होते. परभणी मतदारसंघातून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

विधानसभा स्वबळावर

महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये 40 जागांची मागणी केली होती. मात्र, महायुतीमधून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महायुतीमधून बाहेर पडत महादेव जानकर यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करत 65 उमेदवारांची यादी घोषित केली होती.

महादेव जानकर यांनी भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी उद्देशूनही तुमने मुझे एक धोका दिया है मै तुम्हे सौ धोखे दुंगा, असे म्हटले होते.

Mahadev Jankar
Phulambri Assembly Constituency : महायुतीची गॅरंटी, `लाडकी बहीण योजना` अखंडित सुरुच राहणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com