• 'तृतीयपंथी धोरण २०२४' जाहीर
• भरतीप्रक्रियेत तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री-पुरूषांसोबतच 'तृतीयपंथी' हा लिंग पर्याय उपलब्ध तृतीयपंथी
• तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी ३८ ते ६० हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ८२ शासकीय विश्रामगृहे स्थापन करण्यास मंजूरी.
• राज्यात गाव तिथे गोदाम योजनेसाठी 331 कोटींची तरतूद
• कापूस, सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5000 रुपयांचे अर्थसहाय्य
• गाईच्या दुधासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान
• ई पंचनामा योजना राज्यभर राबवण्यात येणार
• शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देण्याची योजना कायम राहणार
• राज्यातील पडीक जमिनीवर बांबू लागवड करणार
• शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर पंप
'तुफानों में संभलना जानते है!
अंधेरों को बदलना जानते है!
चिरागों का कोई मजहब नहीं है!
ये हर मेहफिल में जलना जानते है!
विधवा, दिव्यांग, अनाथांना 1500 रुपये अनुदान.
जलयुक्त शिवारसाठी
मागेल त्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप दिले जाईल. शेतकऱ्यांना मोफत वीजेसाठी सौरऊर्जा पंप मोफत देण्यात येणार आहे.
राज्यातील पडीक जमिनींवर बांबू लागवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बांबूची रोपे देण्यात येणार आहेत. वन्य प्राणी हल्ल्यात झालेल्या मृत कुटुंबाला निधीची मदत करणार आहे. ही रक्कम 20 लाखांवरुन 25 लाखांवर करण्यात आला आहे. रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहोत.
गायीच्या दुधाला 5 रूपये लीटर अनुदान देण्यात येणार.
राज्यातील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 10 हजार रुपये देणार. यामधून 10 हजार रोजगार निर्माण होणार आहे.
वर्षांला 3 गॅस देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू होणार. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची मी घोषणा करत आहे.
सरकारी रूग्णालयात गर्भाशय कर्करोगाची तपासणी करणार आहे. विवाहीत मुलीसांठी शुभमंगल योजना लागू होणार आहे.
वारकरी महामंडळ स्थापन करणार आहे. त्यासह वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. दुधाच्या बाजारभावामध्ये वाढ करून 40 रु प्रति लिटर इतके करावे. अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करीत आहेत. त्यांचे पडसाद आज विधिमंडळात उमटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.