Devendra Fadnavis : आता अधिकृत ईश्वरपूर - महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी; CM फडणवीसांनी स्वतः केली घोषणा

CM Devendra Fadnavis Ishwarpur announcement : आता 3 नोव्हेंबर 2025 रोजी गृह मंत्रालयाने या प्रस्तावास मंजुरी दिल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
islampur rename ishwarpur
islampur rename ishwarpurSarkarnama
Published on
Updated on

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ झाले आहे. महाराष्ट्र शासनाने या नामांतराची अधिसूचना जाहीर केली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोशल मीडियावरून याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने अधिकृत अधिसूचना काढली आहे.

राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी पावसाळी अधिवेशनात इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो केंद्राकडे पाठवला होता. आता 3 नोव्हेंबर 2025 रोजी गृह मंत्रालयाने या प्रस्तावास मंजुरी दिल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

अधिसूचनेनुसार, "मौजे इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या गावाचे नाव बदलून 'ईश्वरपूर' असे करण्यात आले आहे. तसेच, 'इस्लामपूर नगर परिषदेचे नाव आता ‘उरुण-ईश्वरपूर नगर परिषद’ असे करण्यात आले आहे. यामुळे आता सर्व शासकीय, प्रशासकीय आणि स्थानिक संस्थांच्या नोंदींमध्ये ‘ईश्वरपूर’ हे नाव वापरले जाणार आहे.

या निर्णयाने अनेक वर्षांपासून सुरू असलेली स्थानिकांची आणि काही हिंदुत्ववादी संघटनांची मागणी पूर्ण झाली आहे. राज्यातील अनेक नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सोशल मीडियावर ‘#ईश्वरपूर’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. मात्र शासनाने दिलेल्या अधिसूचनेनंतर आता ‘ईश्वरपूर’ हे नाव अधिकृतपणे लागू झाले आहे आणि सर्व शासकीय बोर्डवर, कागदपत्रे व नोंदी यामध्ये हेच नाव नोंदवले जाईल.

islampur rename ishwarpur
voter limit polling booth : आता कोणत्याही मतदान केंद्रावर नसणार १२०० पेक्षा जास्त मतदार ; निवडणूक आयोगाचा निर्णय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com