Maharashtra Live Updates : मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश; अशी करा नोंदणी

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
 Maharahtra Mantralay
Maharahtra Mantralay sarkarnama
Published on
Updated on

Mantralay News : आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही

मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना दुपारी 2 वाजेनंतर प्रवेश देण्यात येईल. प्रवेशासाठी त्यांना डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येईल. त्यामुळे आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

ramdas kadam : दिशा सालियन प्रकरणी केले गंभीर आरोप

Summary

दिशा सालियन प्रकरणावरून रामदास कदम यांनी टीका केली आहे. मुलाला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केले आहेत का? याची चौकशी होणे गरजेचं आहे. किशोरी पेडणेकर नेहमी दिशा सालियन प्रकरणात घरी का जायच्या? याचाही तपास होणे गरजेचे आहे. दिशा सालियनच्या वडिलांची नार्को टेस्ट करा अशी मागणी होत असेल तर आदित्य ठाकरेंची देखील नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी या प्रकरणात कदम यांनी केली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला

''टोमणे सम्राटांना आज अधिवेशन संपल्यावर अचानक जाग आली आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली... राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होते तेव्हा एक ही प्रश्न यांना मांडता आला नाही किंवा सरकारला जनतेच्या प्रश्नांकरिता जाबही विचारला नाही!! संपूर्ण अधिवेशनात उद्धटराव सभागृहात मूग गिळून गप्प बसलेले... कारण अधिवेशनात विषय मांडण्याकरिता अभ्यास लागतो... तिकडे फक्त टोमणे देऊन चालत नाही...!!!'' असं म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

मनसेच्या 'त्या' बॅनरबाबत शेलारांची प्रतिक्रिया

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरे यांचे गुरु सोबतच त्यांचे काका ही आहेत, त्यामुळे त्यांनी फोटो लावले यावर कोणी भाष्य करण्याचं कारण काय ? असा सवाल भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे.

Trimbakeshwar Jyotirling Temple : त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र वर्ग 'अ' दर्जा जाहीर

त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्रास वर्ग 'अ' दर्जा जाहीर करण्यात आला आहे. नगर विकास खात्याने त्यास मंजुरी दिली आहे. आगामी २०२७ सिंहस्थ कुंभमेळा येथे होत आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थस्थान, निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ अशा महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळांमुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र अ दर्जा देण्यात आला आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष दर्जाचा फायदा होणार आहे.

गिरीश महाजनांच्या डोक्याला मार 

Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. डोक्याला रॉड लागल्याने ते जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना नाशिककडे रवाना करण्यात आले आहे.

सात ते आठ हजार कार्यकर्ते गुढीपाडवा मेळाव्याला जाणार

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याला मुंबईत मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी यंदा पहिल्यांदाच नाशिक मधून जोरदार तयारी करण्यात आली आहे. सात ते आठ हजार कार्यकर्ते या मेळाव्याला नाशिक मधून उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

Aurangzeb's Tomb : औरंगजेबाची कबर राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीतून काढून टाका...

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर केंद्र सरकारच्या वतीने तोडण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी. या मागणीसाठी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची आज दिल्लीत भेट घेतली. शवाय औरंगजेबाची कबर राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीतून काढून टाकावी अशी मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Ajit Pawar : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना शिक्षा होणारच - अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. याचवेळी त्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, या हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. कुठेही राजकीय हस्तक्षेप नाही. उज्वल निकम यांच्यासारखे प्रख्यात वकील तिथे नेमले आहेत. त्यामुळे इथे कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. जो चुकीचा वागला असेल, जो दोषी असेल, जो मास्टरमाईंड असेल त्याला तेथे शिक्षा होणारच, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.

Prakash Ambedkar : संभाजी भिडेंना जेलमध्ये टाका - प्रकाश आंबेडकर

किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन राज्यात नवा वाद सुरू झाला आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली आहे. मात्र, संभाजीराजेंची मागणी चूक असल्याचं संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हटलं आहे. याच प्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मला या वादावर जास्त बोलायचं नाही. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी राजधर्माचं पालन करून संभाजी भिडेंना तुरुंगात टाकावं."

आताताईपणाची भूमिका घेऊ नये; आम्ही सहन करणार नाही... होळकरांचा इशारा

वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा मुद्दा हा कोणीही जाती अस्मितेचा मुद्दा करू नये. काही संघटना आताताईपणे तो पुतळा पाडू, तो पुतळा काढून टाकू अशी भूमिका घेत आहेत. मात्र अशा आताताईपणाची भूमिका कोणत्याही संघटनेने घेऊ नये ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा भुषणसिंह होळकर यांनी दिला आहे.

लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांचे काय? कर्जमाफीचे काय? अधिवेशन संपताच ठाकरेंचे सवाल

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले. अत्यंत निरर्थक आणि निराशवादी अर्थसंकल्प झाला. असे अधिवेशन नजीकच्या काळात तरी झाले नसेल. कबरीपासून कामरापर्यंत एवढेच मुद्दे या अधिवेशनात गाजले. लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांचे काय? कर्जमाफीचे काय झाले? असे सवाल ठाकरेंनी केले.

Mumbai live: आमदारानं सिलेंडर रस्यावर फेकले

Mumbai : मुंबईत आमदार दिलीप लांडे यांनी रस्त्यावर गाडी अडवून सिलेंडर रस्त्यावर फेकले धारावीत गाडीतील सिलेंडर ब्लास्ट नंतर हा प्रकार घडला आहे.

Kolhapue News : प्रशांत कोरटकरच्या छातीत कळा?

प्रशांत कोरटकरच्या छातीत कळा छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारा प्रशांत कोरटकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. बुधवारी मध्यरात्री त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यावेळी त्याच्या छातीत कळा येत असल्याचे त्याने सांगितले. कोरटकर याला पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

Maharashtra Assembly : विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर 

विधानसभा 2024-25 या वर्षासाठी विधान मंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विधानसभा सदस्यांची विविध समितीवर नावांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समितीचे प्रमुख म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोजगार हमी योजना समिती प्रमुख म्हणून सुनील शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अल्पसंख्याक कल्याण समितीवर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांची समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Raigad News: होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर  आज भूमिका स्पष्ट करणार 

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला माजी खासदार संभाजी राजे यांनी विरोध केला आहे. मात्र, संभाजी भिडे गुरुजींकडून वाघ्या कुत्र्यांच्या समाधीचं समर्थन केले आहे. या वादावर आज होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

DCM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे पुण्यात होल्डिंग? गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील व्यंगात्मक गाण्याने सगळं राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता शिंदे यांच्या व्यंगचित्राचे पुण्यात होल्डिंग लावण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुण्यातील अलका चौकात हे होर्डिंग लावण्यात आले आहे. तर रिक्षा, गुवाहाटी, दाडी, चष्मा आणि गद्दार या शब्दाला महाराष्ट्रात बंदी आहे का? असा सवाल करण्यात आला आहे. या होर्डिंगची चर्चा दिवसभर शहरात रंगल्यानंतर पोलिसांनी या होर्डिंग लावणाऱ्या अज्ञाता विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Agriculture Minister Manikrao Kokate : कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच युरिया घोटाळा

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यातच मोठा युरिया घोटाळा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या अनुदानित शेतीसाठीचा नीम कोटेड युरियाचा उद्योगासाठी वापर होत असल्याचं समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. गोदरेज ग्रोवेट या कंपनीतून तब्बल 90 मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी परिसरात कृषी विभागानं हा छापा टाकून ही कारवाई केलीय

PM Modi News : 30 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा

रविवारी (ता.30) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी नागपूरमध्ये मोदींचं आगमन होणार असून ते येथील मोदी रेशमीबागेत जाणार आहेत. तर माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला ते अभिवादन करतील.

Pune Congress News : पुणे काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरू, ही नाव चर्चे

नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. मात्र प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी मी काही सूचनापेटी नाही तक्रारी करू नका, असं संबंधितांना सुनावल. यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानिमित्त पुन्हा एकदा पुणे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळालं. यानंतर आता पुणे शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाचे जोरदार वारे वाहू लागले असून पुण्यातील विविध गटांकडून शहराध्यक्ष पदासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. या वेगवेगळ्या गटांकडून पुणे कॉग्रेस शहराध्यक्ष पदासाठीचे वेगवेगळी नावं चर्चेत आहे.

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात घुलेची कबुली; धस यांची प्रतिक्रिया

अख्या महाराष्ट्राला हादरुन सोडलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हत्येची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणात सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या केली, अशी कबुली घुले याने दिली आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील यावरून प्रतिक्रिया दिली आहे. अशी कबुली येणं म्हणजे कोणालातरी वाचवले जातय, असा संशय धस यांनी व्यक्त केला आहे.

Ajit Pawar Kolhapur Visit News : अधिवेशनाचे सूप वाजले, अजितदादा कोल्हापूर दौऱ्यावर

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी (ता.26) सूप वाजले. आज (ता.27) उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आहेत. ते सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी येथील कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार असून नंतर ते हेलिकॉप्टरने नांगरतासकडे (जि. सिंधुदुर्ग) जाणार आहेत.

Disha Salian Case News : दिशावर कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही

दिशा सालियनचा मृत्यू पडून झाला नाही. तिने आत्महत्या केली नसून तिच्यावर बलात्कार झाला असून तिचे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला होता. पण आता याप्रकरणातील पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून दिशावर बलात्कार झाला नसल्याचे समोर आले आहे.

Pune News : अखेर गौरव आहुजा याला जामीन मंजूर

पुण्यातील येरवडा येथे भर रस्त्यात लघुशंका करत अश्लिलवर्तन केलेल्या गौरव आहुजाला अखेर जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायालयाकडून अटी व शर्तीवर गौरव आहुजाला जामीन मंजूर करण्यात आला. काही दिवसापूर्वी भर रस्त्यावर मद्यप्राशन करत लघुशंका करत असलेल्या व्हिडिओ झाला होता. याप्रकरणी दोन आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव आहुजा आहे.

Kunal kamra Live : कॉमेडियन कुणाल कामराला दोन समन्स, शिवसैनिक आक्रमक

कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेवर केलेल्या विडंबनात्मक गाण्यावरून वाद सुरू आहे. त्याला खार पोलीसांनी दोन समन्स बजावले असून तो हजर झालेला नाही. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून आज (ता.27) सकाळी 10 वाजता शिवसैनिक खार पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची भेट घेणार आहेत. तर कुणाल कामराला टी सीरीजकडून कॉपीराईटचा दावा करत दणका देण्यात आला आहे. दरम्यान गुंडगिरी करणं थांबवा, असं ट्वीट करत कामरानं उत्तर दिलं आहे.

Vidhansabha Opposition Leader Issue : अधिवेशन संपलं, पण विरोधी पक्षनेता नाहीच

हे देखील अधिवेशन संपलं असून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती झालेली नाही. ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांचे नाव अध्यक्षांना देण्यात आलं असूनही घोषणा झालेली नाही. तर विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानेच ती झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com