Maharashtra Live Updates : करुणा मुंडेंना पत्नी म्हणून स्वीकारा - तृप्ती देसाई

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Trupti Desai
Trupti DesaiSarkarnama
Published on
Updated on

करुणा मुंडेंना पत्नी म्हणून स्वीकारा - तृप्ती देसाई

धनंजय मुंडे यांनी कोर्टात दावा केला की मुलं आपली आहेत मात्र त्यांची आई करुण शर्मा यांच्या आपले अधिकृत लग्न झालेले नाही. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंना आव्हान केले की तुम्ही मुलांचा स्वीकार करत आहात मात्र मुलांच्या आईला पत्नी म्हणून नाकारत आहात. आमदरकी रद्द होण्याच्या भीतीने तुम्ही असे करत आहात. मुलांच्या आईला पत्नी म्हणून स्वीकारा.

तुळजाभवानी मंदिराबाबत मोठी अपडेट!

श्री तुळजाभवानी मंदिर जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक पार पडली.

धनंजय  मुंडे अन् करूणा शर्माबाबत गोपीनाथ मुंडेंना होती कल्पना?

करूणा शर्मा यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, धनंजय मुंडेंसोबतच्या संबंधाबाबत गोपीनाथ मुंडेंना कल्पना होती.

Devendra Fadnavis : अजित पवार यांच्या नंतर फडणवीसही म्हणाले कर्जमाफी होणार नाही

अजित पवार यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकरी कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहाता पुढील तीन वर्ष तरी कर्जमाफी होणार नाही असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर अजित दादा यांची जी भूमिका आहे तीच सरकारची आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

Devendra Fadnavis : पंढरपुरात तीन महिन्यांत काॅरिडाॅरचे काम सुरू होणार; देवेंद्र फडणवीस

Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या उज्जैन काशी विश्वेश्वरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरला येत्या तीन महिन्यांमध्ये कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे

Anjali Damania : हा धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा याचा कौटुंबीक प्रश्न : अंजली दमानिया

करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा आदेश मुंबईतील वांद्रे कौटुंबीक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिला आहे. त्याविरोधात मुंडेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून करुणा शर्माशी धनंजय मुंडेंचा विवाह झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देताना हा धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा याचा कौटुंबीक प्रश्न आहे. मात्र, लग्नाचे पुरावे असतील तर करुणा शर्मांनी ते द्यावेत. ते दिले तर धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकारला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पुष्पगुच्छ 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईहून सकाळी साडेदहाला सोलापूरच्या विमानतळावर उतरलेले मुख्यमंंत्री फडणवीस यांचे प्रशासनाच्या वतीने सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी स्वागत केले. विमानातून खाली उतरलेल्या अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ पुढे केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रिय आमदाराचा तो पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला.

MVA And CM Devendra Fadnavis : तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात 'SIT'मार्फत चौकशी करा;'MVA'चे फडणवीसांना निवेदन

तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात एसआयटी नेमून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपींवर मकोकानुसार कारवाई करावी,अशी मागणी महाविकास आघाडीने केल्यावर यात कडक कारवाई करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले.

Devendra Fadnavis Pandharpur visit : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात; विठ्ठल रुक्मिणीचं घेतलं दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल‌ झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पंढरपूर विकास आराखड्या संदर्भात बैठक झाली. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल‌ झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पंढरपूर विकास आराखड्या संदर्भात बैठक झाली. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते. CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या तुळजापूर दौऱ्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या 4 जणांना पोलिसांना घेतलं ताब्यात

मराठा क्रांती मोर्चाच्या चार कार्यकर्त्यांना तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या 4 जणांना तुळजापुरातून ताब्यात घेतले आहे. तरुणाची मराठा आरक्षणाची मागणी असून खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यामध्ये अर्जुन साळुंखे या उद्धव ठाकरे शिवसेनाच्या कार्यकर्ताचा समावेश आहे. मराठा आरक्षणा संदर्भात हे कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार होते.

Eknath Shinde : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने वडू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक झाले. छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदानाला स्मरण करत शासकीय इतमात सलामी देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते.

Devendra Fadnavis : तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मंजुरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर दौऱ्यावर असून, त्यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. याशिवाय त्यांनी विकास आराखड्याला मंजुरी दिली. काही तांत्रिक गोष्टी बाकी असून, त्यावर लवकरच होईल. मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना बैठकीत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

Anjali Damania : कुणाल कामरावर थर्ड डिग्री वापरा पण कृष्णा आंधळे कुठें आहे?

संतोष देशमुख हत्या प्रकणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट शंभुराज देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. देशमुख हत्या प्रकरण 8 ऑक्टोबरपासून नव्हे तर त्या आधीपासून सुरू झालं आहे. या हत्येसाठीच्या बैठका सातपुडा बंगल्यात झाल्या. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड या बैठकीला उपस्थित होते. या सगळ्याला यंत्रणा जबाबदार आहे. आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शंभुराज देसाई म्हणतात की, कुणाल कामरावर थर्ड डिग्री वापरा. पण, यांचे काय? कृष्ण आंधळे कुठे आहे? त्यावर नाही वापरायचा का? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला.

Kunal Kamra : खार पोलिस स्टेशनमध्ये 3 गुन्हे दाखल

कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कारण त्याच्याविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली असतानाच अनेक तक्रारी देखील दाखल होत आहेत. आता खार पोलिस स्टेशनमध्येही त्याच्या विरोधात 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Sanjay Raut : आम्हालाही मोदी-शाह हे महाराष्ट्राचे शत्रू वाटतात - राऊत

कुणाल कामराच्या विडंबन गीतावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून काही आम्ही बोलू नये का? असा सवाल करत आम्हालाही मोदी-शाह हे महाराष्ट्राचे शत्रू वाटतात, असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

Beed Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

मराठा समाजाच्या मेळाव्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम सांगताना जरांगे पाटलांसह धनंजय देशमुख आणि महिला शिक्षिका गहिवरल्या. याच कार्यक्रमात जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, घेणार तुळजाभवानी मातेचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्हाच्या दौऱ्यावर असून ते तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. तसेच तुळजाभवानी मंदीर जिर्णोद्धार कामाची पाहणीही करतील. यावेळी त्यांचा तुळजापूरात होणार भव्य सत्कार होणार आहे. दरम्यान तिर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापुरात ड्रग्स तस्करी होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे या ड्रग्सप्रकरणी ते काय भुमीका घेणार? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mahavitaran News : महावितरणची वीज 1 एप्रिलपासून 10 टक्के स्वस्त होणार

महावितरणने राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर सुनावणी झाली असून महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने नवे वीज दर जाहीर केले आहेत. आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाप्रमाणे आता महावितरण कंपनीची वीज 10 टक्क्यांनी स्वस्त होणार असून यामुळे घरगुती वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. हा आदेश 1 एप्रिलपासून लागू होईल.

Nashik Market Committee News : नाशिक बाजार समितीत आता महायुतीच्या नेत्यांमध्येच राजकीय शत्रुत्व टोकाला

नाशिक बाजार समितीच्या सत्तांतरानंतर संचालक मंडळाची पहिली बैठक शुक्रवारी (ता.29) झाली. या बैठकीत नियमित कामकाजापेक्षा राजकीय हेवेदाव्यांवरच भर दिला होता. त्यामुळे आगामी कालावधीत बाजार समितीत राजकीय सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. तर पिंगळे विरुद्ध चुंभळे असा संघर्ष सुरू झाला आहे.

Raj Thackeray News : गुढीपाडवानिमित्त मनसेची उद्या (ता.30) जाहीर सभा

गुढीपाडव्याला रविवारी (ता.30) मनसेची जाहीर सभा होणार आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा पार चिखल झाल्याची जहरी टीका राज ठाकरे यांनी याआधीही केली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सभेत ते कोणत्या विषयात हात घालतात. आपल्या टीकेचा दाणपट्टा फिरवणार कोणावर फिरवतात हे पाहावं लागणार आहे.

Girish Mahajan politics News : अंदर की बात; साधूंच्या अव्वाच्या सव्वा मागण्यांनी मंत्री महाजन सावध!

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा तयारीची बैठक झाली. बैठक प्रामुख्याने स्थानिक साधू आणि महंतांची होती. मात्र त्यात स्थानिक साधूंमध्येच मतभेद आणि गोंधळ दिसला.

Earthquake in Myanmar News : म्यानमारमध्ये भूकंपाचा कहर! 144 जणांचा मृत्यू, 700 हून अधिक जखमी

म्यानमारमध्ये शुक्रवारी (ता.२८) आलेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे कहर पाहायला मिळत आहे. येथे भूकंपांमुळे मोठं नुकसान झालं असून आतापर्यंत 144 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 700 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आणि जखमींचा हा आकडा वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान म्यानमारला मदतीचा हात भारताने दिला असून मदत पोहचवली जातेय. तसेच म्यानमारने आणीबाणी जाहीर करताना आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केलं आहे.

Ajit Pawar : 'मलिदा गँगने हैराण केलंय'; अजितदादांचा भर स्टेजवर संताप

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता.29) बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकरी मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळेंसह युगेंद्र पवारांना लक्ष केलं. तसेच ठेकेदार आणि पुढाऱ्यांनाही झापलं. यावेळी अजित पवार यांनी मलिदा गँगने मला नकोसं केलं असून एकतर पुढारपण करा, अन्यथा कॉन्ट्रॅक्ट बघा असा दम भरत संताप व्यक्त केला आहे. सध्या त्यांच्या या विधानाची राज्यभर चर्चा सुरू आहे.

CM Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर असून ते येथे विठ्ठलाचे दर्शन घेतील. यानंतर ते तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सादरीकरणाची पाहणीही करणार आहे. याबरोबर ते तुळजापूर आणि नीरा नरसिंगपूरमध्ये जावून देवदर्शन घेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com