
शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा दिली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. तर थोरवे यांचे ते वक्तव्य चुकीच्या ठिकाणी होते शिवसेना त्याचे समर्थन करत नाही, उलट एकनाथ शिंदेंसह मंत्री उदय सामंत यांनी देखील थोरवे यांना समज दिली आहे. अशी माहिती रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदींशी संवाद साधला. मोदींनी हातात नोटपॅड आणि पेन्सिल घेऊन बोर्डरूम शैलीत लखपती दीदींशी संवाद साधला. त्यांच्या व्यवसायाची माहिती घेतली. तसेच योजनेचा कितपत फायदा झाला याचीही माहिती घेतली. याशिवाय महिलांच्या समस्याही मोदी यांनी जाणून घेतल्या.
विदर्भ, मराठवाड्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गातून शेतकऱ्यांचे काहीच भले होणार नाही, मात्र काही पुढाऱ्यांचे हात ओले होणार आहेत. हा शक्तिपीठ महामार्ग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मोठा घोटाळा आहे. ८०२ किलोमीटर लांबीचा असणारा हा शक्तीपीठ महामार्ग त्याचा एक किलोमीटर रस्ता बांधणीच्या खर्चासाठी १०८ कोटी रुपये लागणार आहे. तर ८०२ किलोमीटर या महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपयांचा खर्च सरकार करणार आहे. त्यामुळे तब्बल पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून काही राजकारणी करणार आहेत. त्यामुळे हा शेतकरी विरोधी असणारा शक्तीपीठ महामार्ग असून याविरोधात मोठे आंदोलन करणार असल्याचे, माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.
ह्युंदाई कंपनीत कंत्राट मिळवण्यासाठी खेड एमआयडीसीमध्ये दोन गटात कंपनीच्या गेटवरच अशी तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लाठ्या-काठ्या, लोखंडी गज, बाटल्यांचा हल्लात वापर करण्यात आला. एकमेकांची डोकी फोडण्यात आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे.
लाॅरेन्स बिष्णोईच्या नावाने सतीश भोसले उर्फ खोक्या याला धमकी देण्यात आली आहे. बिश्नोईच्या नावानं अज्ञात व्यक्तीकडून दोन दिवसांपूर्वी एक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं. या फेसबुक अकाउंटवरून खोक्याला धमकी देण्यात आली आहे. खोक्याला लवकरात लवकर जेलमध्ये टाका अशी मागणी या अकाउंटवरून करण्यात आली आहे. हरिण आमचं दैवत आहे, त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही, असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुण्यात आज सकाळी बीएमडब्लूमध्ये असलेल्या एका दारुच्या नशेत तर्रर असलेल्या तरूणाने भरस्त्यात येणाऱ्या -जाणाऱ्या महिलांच्या समोर अश्लिल चाळे केले. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असताना पोलीसांनी फरार असलेल्या या तरुणाच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. गौरव मनोज आहुजा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.
रोहिणी खडसे काय म्हणाल्या मला त्याबाबत माहिती नाही. मात्र त्या कोणाचा खून करीत आहेत त्याचं नाव त्यांनी सांगावं अशी प्रतिक्रीया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून ‘एक खून माफ करावा’ अशी विनंती केली आहे.
सोयाबीन हमीभाव केंद्रावर व्यापाऱ्यांचे सोयाबीन शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत विकत घेतले जात आहे. नाफेडने सोयाबीन खरेदी केले आता विक्री काढण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव पडतील. सरकारनं काही उद्योगपतींना खुश करण्यासाठी तेलावरचा आयात कर कमी केला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. सोयाबीनच्या निर्यातीचे अडथळे सरकारने दूर केले नाहीत, त्यामुळं सोयाबीनला 4800 रुपये हमीभाव असताना ते कमी किंमतीत शेतकऱ्यांना विकावे लागत, असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
दिल्लीतील महिलांना महिला समृद्धी योजनेअंगर्गत आता महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी सरकारने मंजूरी दिली आहे.
कोथरुडमध्ये काही युवकांनी बेदम मारहाण झाल्याच्या घटनेवर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाष्य केले. "आरोपींना वाचवण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी पोलीस स्टेशनला फोन केले. त्यानंतर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. शेवटी पोलीस आयुक्तांना फोन केल्यानंतर गुन्हा दाखल झाला.राजकीय नेत्यांच्या फोनमुळे ह्या गुन्हेगारांना मस्ती आहे.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे छत्रपती यांना कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरी वनविभागाने छापा टाकला. यात वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडले आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या गावातील डोंगर परिसरामध्ये हा छापा टाकला आहे.
पुण्यातील कोथरुड भागात पुन्हा एकदा गाडी आडवी मारल्याच्या कारणावरुन हाणामारीची घटना घडली आहे. अक्षय लोणकर नावाच्या तरुणाला ही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी सचिन मीसाळ आणि त्याच्या साथीदारांवर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या हंपी येथे फिरण्यासाठी आलेल्या एका 27 वर्षीय इस्त्रायली महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय यावेळी महिलेल्या वाचवण्यासाठी आलेल्या तिघांवर जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे. महिलेसोबत असलेल्या एका महाराष्ट्रातील आणि एका ओडिशाच्या सहकाऱ्याला आरोपींनी मारहाण केली. आरोपींनी या तिघांना एका तलावात फेकून दिलं. यातील दोघांना पोहत येत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून 6 पथक तयार करण्यात आली आहेत. मात्र, विदेशी पर्यटकासोबत घडलेल्या या घटनेमुळे पर्यटनस्थळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सोलापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वात मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे. यासाठी आज मातोश्रीवर सोलापुरातील पदाधिकारी ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. अपात्रतेचे आदेश संबंधितांपर्यंत पोचविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आदेश काढताच खळबळ उडाली आहे.
काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या घरापासून वर्षा गायकवाड यांच्या घरापर्यंत यात्रा काढावी, असा टोला भाजप मंत्री आशिष शेलार यांनी बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना रॅलीवर लगावला आहे. वडेट्टीवार ते गायकवाड, अशी रॅली काढल्यास काँग्रेमधील आतल्या भावना काय आहेत, हे अध्यक्षांच्या लक्षात येईल. मस्साजोग आणि संवेदनशील घटनावर सरकार कायदेशीर कारवाई करत आहे, असेही मंत्री शेलार यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू आहेत. ज्यांचे पाय चिखलात माखलेले आहेत, त्यांनी दुसऱ्याला स्वच्छतेचे धडे घेऊ नये. उध्दव ठाकरेंनी शिंदेसेना ही आणाजी पंतांची सेना असल्याच्या वक्तव्यावर भाजप मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली.
सतीश भोसले उर्फ खोक्याभाई तिसऱ्या दिवशीही पोलिसांना सापडलेला नाही. याशिवाय सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून, त्याने सुरेश अण्णा धस हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अपेक्षा व्यक्त केली आहे. क्लिप व्हायरल झाल्याने खोक्याभाईची चर्चा होऊ लागली आहे.
संतोष देशमुख हत्येचा खटला केज न्यायालयाऐवजी बीडच्या जिल्हा न्यायालयात चालवावा,असा अर्ज 'CID'ने केला आहे. यावर दहा मार्चला सुनावणी होणार असून, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करणार आहे.
सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्या करारनाम्यामुळे भाजप आमदार सुरेश धस चांगलेच अडचणीत आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धस यांचा देखील राजीनामा घेतला पाहिजे, असे सुनावले आहे.
MSRTCच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरनाईकांच्या नियुक्ती पत्रावर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी सही केल्याची माहिती समोर आली आहे.
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल न्यू प्रशांतमधून चार बांग्लादेशी महिलांना घेतले ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई श्रीगोंदा पोलिस आणि नाशिक दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे केली आहे. प्राथमिक माहितीनुसार त्या येथे अवैध राहत असल्याचे उघड झाले असून भारतीय असणारा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही. तर बांगलादेशातील बेरोजगारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याची कबूली त्या महिलांनी दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काँग्रेसच्या माध्यमातून सद्भावना पदयात्रा काढण्यात येणार आहे. याच्या आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. काँग्रेस मस्साजोग ते बीड अशी 51 किलोमीटर सद्भावना पदयात्रा काढणार आहे.
शीना बोरा हत्याकाड प्रकरणाने अख्या देशात खलबळ उडवून दिली होती. आता प्रकरणाती नियमित सुनावणी 10 मार्चपासून होणार आहे. या प्रकरणावर मागिल चार महिन्यापासून सुनावणी झाली नव्हती. जी विशेष न्यायाधींशांतच्या बदमी झाली नव्हती. पण आचा उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सोमवारपासून या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. शीनाची हत्या 2012 मध्ये करण्यात आली होती. तर याप्रकरणात आई इंद्रायणी, पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामराव राय यांचा हात असल्याचे तपासात उघड झाले होते.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काँग्रेसच्या माध्यमातून सद्भावना पदयात्रा काढली जाते आहे. मस्साजोग गावात सरपंच देशमुख यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून सद्भावना पद यात्रेला सुरुवात होणार आहे. मस्साजोग ते बीड असा 51 किलोमीटरचा पायी प्रवास असणार आहे. या सद्भावना पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यात्रेत सहभागी होणार आहेत.
राज्यात उन्हाची दाहकता वाढत असून काल शुक्रवारी सकाळपर्यंत सोलापूर आणि रत्नागिरीत 38 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. आजही (ता.8) राज्यात उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता असून, कोकणाला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रतील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी क्रूरकर्मा औरंगजेब याची स्तूती केली होती. हेच प्रकरण त्यांच्या अंगलट आल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते. यानंतर आता त्यांनी सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे.
रायवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील सरपंच राजेश पडळकर यांना पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांनी मारहाण केल्याने संतापाची लाट उसळळी आहे. याप्रकरणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने मोर्चा काढून निवेदन दिले असून सर्व सरपंचांनी सहभाग नोंदवला. तसेच निषेध नोंदवला आहे.
राज्यातील ‘ट्रिपल सीट’ सरकार हे जुलमी सरकार आहे. जे औरंगजेबाच्या विचाराने चालणारे असून त्याच वृत्तीचे आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच त्यांनी, या औरंगजेबाच्या विचाराने चालणाऱ्या सरकारविरोधात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे लढायचे आहे. पुन्हा काँग्रेसचे गत वैभव निर्माण करून यायचे असल्याचे म्हटलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी अखेर दिलासा मिळाला आहे. नाना पाटेकर यांना 'मी टू' प्रकरणात अभिनेत्री तनुश्री दत्ताने लैंगिक छळाचा आरोप केले होते. पण आता न्यायालयाने B समरी रिपोर्ट फेटाळून लावल्याने नाना पाटेकर यांना दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दत्ता वामनराव पै या गोराई इथल्या ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा आरोप शिवसेना विभागप्रमुख लालसिंह राजपुरोहितवर आहे. तसेच ‘पै' कुटुंबीयांना धमक्या दिल्याप्रकरणी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पै' कुटुंबीयांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी ‘पै' कुटुंबीयांना आश्वस्त करत मदत केली जाईल असे म्हटले होते. त्यानंतर अखेर कांदिवली पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) सोमवारी (ता.10) सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडतील. पण त्याच्याआधी राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करणारा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी सादर करण्यात आला. यामध्ये राज्याचा विकासदर 7.3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.