

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्या इथं दाखल झाल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले असल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. त्यामुळं सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर ते राजीनामा देतील अशी दाट शक्यता आहे.
- विधान परिषद आमदार संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता
- मात्र आता त्यांनी तो निर्णय बदलत विधान परिषद आमदार पदाचा टर्म संपल्या नंतर सहा महिन्यांचा ब्रेक घेऊन पुन्हा सक्रिय राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला
- मे महिन्यात संपणार आहे आमदारकीचा टर्म.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला या विषयी समजावलं राजकारणापासून दूर जाऊ नको अस सांगितल्या नंतर हा निर्णय घेतला.
- कार्यकर्त्यांच्या सुद्धा त्याच भावना होत्या. त्यामुळे मी आता हा निर्णय घेतला असल्याचं विधान परिषद आमदार संदीप जोशी यांनी सांगितलं.
मध्य पूर्व आखाती देशातील इराण-इस्त्रायलमध्ये पेटलेल्या युद्धाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. यात भारताचाही समावेश आहे. सगळीकडे गॅस सिलेंडरसाठी लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागला होता. आता युद्धामुळे सुपर आणि स्पीड पेट्रोल 2 रुपयांनी महाग झाले आहे. तर डिझेलचा पण भाव इतका वधारला आहे. तर डिझेलच्या किमती आहेत, त्याच आहेत.
हवामान विभागानं महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांना यलो तर 7 जिल्ह्यांना ऑंरेंज अलर्ट दिला होता. यानंतर पुन्हा काही भागात वादळी पावसाची शक्यता अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेचा बॅनर लावण्यावरून दोन गटांत निर्माण झालेला तणाव मिटवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (ता.20 मार्च) सादर करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी कल्याण डोंबिवलीतील नागरिकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. महापालिकेनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आली नसल्याचं जाहीर केलं आहे. महापालिकेचा एकूण 3186 कोटी 60 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
लोणावळा नगरपरिषदेत तणाव वाढला असून नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक साबळे यांच्या कॅबिनला टाळे ठोकत निषेध नोंदवला. निवडणुकीनंतर तीन ते चार महिने उलटूनही मुख्य अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच इतर लोकप्रतिनिधी यांनीही या कारवाईला पाठिंबा दिला आहे. प्रत्येक कामासाठी साहेबांना विचारावे लागेल, असे सांगितले जाते आणि नागरिकांची कामे प्रलंबित राहत असल्याचा आरोप करण्यात आला.
राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. गारपीट होत असल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. त्यामुळे आता बीड जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.
अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. तसेच गुलाबो गॅंगच्या वतीने संगीता तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यातील अलका टाकीज चौकात आंदोलन करण्यात येत आहे. चाकणकरांना फक्त पदावरून हटवू नये, तर खरातप्रकरणी सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी संगीता तिवारी यांनी केली आहे.
अशोक खरात याने आम्हाला पिस्तुलाची धमकी दिली होती. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन ही माहिती दिली आहे. पोलिसांना त्याबाबत तपासात मदत करण्यास तयार असल्याचेही अंनिच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
अशोक खरात याच्या पत्नीच्या नावे शिर्डीत मालमत्ता असल्याचे तपासात पुढे आले आहे. अनेक मोक्याच्या ठिकाणी त्याने जमिनी घेतल्याचेही सांगितले जात आहे.
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत सापडल्या आहेत. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणात योग्यवेळी बोलेन आणि मला जेवढं बोलायचं आहे, तेवढंच बोलेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची नाट्यमय घडामोडीनंतर निवड झाली आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्व अस्त्रांचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे भाजपने शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन पद्धशीरपणे गेम खेळल्याचे दिसून येते. मात्र, मिनी मंत्रालयाच्या सत्तेच्या सारीपाटात राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम कोणी केला, अशी चर्चा रंगली आहे.
DGCA ने पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांना महत्वाचे आदेश दिले आहे. बहारीन, इराण, इराक, इस्रायल, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, ओमान, कतार, यूएई आणि सौदी अरेबिया यांच्या प्रभावित हवाई क्षेत्रात उड्डाणे करू नयेत, अशा सूचना DGCA ने दिल्या आहेत.
रायगडमधील महाड येथे 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले आदी उपस्थित होते.
ंसंपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे, फळबागांचे तसेच काढणीस आलेल्या पिकांचेही नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आणि योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या भोंदूबाबा अशोक खरातविरोधात अंधश्रध्दा निर्मूल समितीही आक्रमक झाली आहे. समितीचे पदाधिकारी एसआयटी प्रमुखांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
रुपाली चाकणकर फरार असल्याचे पोस्ट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या की,रुपाली चाकणकर फरार कशा काय होऊ शकतील? त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा त्यांच्या विरोधात अटक वॉरंट नाही, परंतु माध्यमांसमोर येऊन सर्वकाही सत्य त्यांनी मांडले पाहिजे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अशोक खरातच्या सर्व गुन्ह्यांची माहिती होती. त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच चाकणकर यांनी तातडीने राजीनामा द्यावे, असे देखील त्यांनी म्हटले.
अनेक बडे सरकारी अधिकारी अशोक खरातच्या दरबारात जात होते, असे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. चॉईस पोस्टिंगसाठी, बदलीसाठी हे अधिकारी खरातकडे जात होते, तसेच कामांच्या बदल्यात खरातला जमिनीत गुंतवणुकीच्या स्वरूपात ‘दक्षिणा’ दिली जात असल्याचीही चर्चा आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे, दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे चार फोटो शेअर करत अशा Epstein बाबांवर इतकी मेहेरबानी ? ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ? ह्या रुपाली चाकणकरांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करा असे म्हटले आहे.
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते म्हणाले, नैसर्गिक संकट राज्यातील शेतकऱ्यांच्या कायमच पाचवीला पुजलं असून राज्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशीव, कोल्हापूर, अकोला, सांगली, अहिल्यानगर, परभणी, बुलढाणा, नाशिकसह इतरही जिल्ह्यात गहू, ज्वारी, कांदा, द्राक्ष, कलिंगडसह अन्य पिकांचं अतोनात नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला गेल्याने शेतकरी हवालददिल झाला आहे. या सर्व नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, ही विनंती!
अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्रातील एपिस्टीन फाईल प्रकरणापेक्षाही भयंकर प्रकरण आहेत. जर पोलिसांनी 58 व्हिडिओ समोर आणले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
अशोक खरात प्रकरणामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणी होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली पाटील ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली, अशी फेसबूकवर पोस्ट केली आहे.
अंबादास दानवे यांनी परस्पर आमचा सौदा केला. चार दिवस आम्हाला डांबून ठेवलं, आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही, की भाजपाशी हातमिळवणी केली नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी केला.
अशोक खरात या अत्याचारी भोंदू बाबाच्या कुटुंबीयांनी मुजोरीची परिसीमा गाठली आहे. त्यांच्या आलिशान बंगल्यातून बाहेरील पत्रकारांवर चपलांचा मारा करत पत्रकारांना कुत्र्याचा धाक दाखवायचा प्रकार खरात कुटुंबीयांनी केला आहे, या विषयी ट्विट करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खरात कुटुंबीयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.