Maharashtra Political Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरीवर दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज शिवनेरी गडावर उपस्थित राहणार, यासह आज 19 फेब्रुवारी रोजीच्या राज्य आणि देशातील दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

'ब्लॅकबॉक्स खराब झाला, यावर कोण विश्वास ठेवणार? - जयंत पाटील

'ब्लॅक बॉक्स जाणं अशक्य आहे. आणि त्यामध्ये घड्याळ, मोबाईल सापडलं, त्यामुळे ब्लॅक बॉक्स जातो याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही'. असे विधान देखील जयंत पाटील यांनी केलं आहे.

धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला अध्यक्षपदाची ऑफर

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी नव्या समीकरणांची चर्चा रंगली असतानाच आता शिंदेसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर एक मोठा डाव टाकलाय.अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीला अध्यक्षपद देण्याबाबत शिंदेसेना अनुकूल असल्याचं प्रवक्ते योगेश केदार यांनी स्पष्ट केले आहे.

86 लाख लाडक्या  बहिणी अपात्र

86 लाख महिलांना अपात्र ठरवल्याने मोठा अंसतोष आहे. त्यामुळे अपात्र महिलांसाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांनी केवायसी करताना तांत्रिक चूका झाल्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना 31 मार्चपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरीवर दाखल

शिवजयंतीनिमित्त शिवनेवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार गडावर दाखल झाले आहेत.

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल

शिवजयंतीनिमित्त शिवनेवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल झाल्या आहेत.

'एनसीईआरटी'ने आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवला

एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात असललेला 1759 सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एकतर्फी हटवला असून राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली एनसीईआरटीने हा खोडसाळपणा केल्याचा आरोप मुधोजीराजे भोसले यांनी केला आहे.

Pune : शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतूकीत बदल

छत्रपती शिवजयंती निमित्त आज निघणाऱ्या शोभायात्रेमुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये मध्यभागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, कुमठेकर रस्ता या परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. तर शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्यांसाठी जंगली महाराज रस्ता, बर्वे चौक टिळक रस्त्याने पर्यायी मार्ग दिला आहे. गणेश रस्ता जिजामाता चौक वाहतुकीला पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे दारूवाला पूल मार्गाने जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर केळकर रस्त्यावरील आप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.

Shiv Jayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज शिवनेरी गडावर जाणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर हजारो शिवभक्त दाखल झालेत. आज शिवनेरीवर अनेक शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलारहे उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com