Maharashtra News Live Update : रमेश म्हात्रेंचा जामीन न्यायालयाकडून रद्द, शरण येण्याचे आदेश

Marathi Breaking Live Headlines Updates : मागील वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर घाटमाथ्यसह मराठवाडा विदर्भातही पावसाला अनुकुल परिस्थिती तयार झाल्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यासह राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर हल्ला

बीड जिल्ह्यातील परळीत जुन्या भांडणाचा राग आणि राजकीय वैमनस्यातून एका 29 वर्षीय तरुणावर जीवघेण्या हल्ला झाला आहे. चांदापूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका हॉटेलवर चहा पीत असताना अभिजीत नागेश कांबळे या तरुणाला गाठले नंतर त्याला लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात,पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रमेश म्हात्रेंचा जामीन न्यायालयाकडून रद्द, शरण येण्याचे आदेश

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील कथित हल्ल्याप्रकरणी शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय... न्यायालयानं म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जामीन रद्द केलाय... त्यांना आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विष्णुनगर पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिलेत...

Navi Mumbai Crime : भंगार व्यवसायाकडे खंडणी मागितली; एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुखाला अटक

नवी मुंबईतील राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाकडून तब्बल 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडेला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे पूजा बनसोडे आणि तिच्या सहकाऱ्यांनी व्यावसायिकाला तसेच त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे.

Wardha Update : दहशत माजवणारी वाघिणीला पकडण्यात वनविभागाला यश

गिरड व्याघ्र प्रकल्पातील 'गिरडच्या राणी' वाघीणीच्या दोन वर्षांच्या मादी बछडीला वनविभागाला पकडण्यात आली आहे. पिंपळगाव, उंदिरगाव, साखरा, जोगिंगुफा परिसरात वाघीणीने दहशत निर्माण केली होती. वाघिणीच्या हल्ल्यात अनेक जनावरे ठार, तर काही जखमी झाल्याची नोंद. वाढती दहशत लक्षात घेऊन वाघिणीला पकडण्याची तातडीने परवानगी.

Mumbai Local Train Updates : मुंबईकरांची लोकल रेल्वेच्या गर्दीतून सुटका होणार; उद्यापासून 15 डब्यांच्या नवीन लोकल सुरू होणार

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. प्रवाशांची गर्दीतून सुटका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 15 डब्यांच्या नवीन लोकल सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे मुंबईतील रेल्वे प्रवासी संघटना आणि सामान्य मुंबईकरांकडून स्वागत केले जात आहे.

Buldhana Crime News : पतीसमोर पत्नीवर बलात्कार, बुलढाणा जिल्हा घटनेने हादरला

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. दुधलगाव परिसरात एका शेतात कामाला असलेले मध्य प्रदेशातील पती-पत्नी हे रात्रीच्या वेळेस झोपलेले असताना अचानक दोन इसम हातात शस्त्र आले. त्यांनी दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवला. 19 वर्षीय या विवाहितेवर आळीपाळीने आणि बळजबरी ने बलात्कार केला. शिवाय त्यांच्याकडे असलेले मोबाईल व काही रोख रक्कम घेऊन दोघे दुचाकीने पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी 19 वर्षे विवाहित पीडीतेने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली आहेत.

Jalgaon Police : जळगाव शहरात 1500वर वाहनचालकांवर कारवाई दंड

जळगाव शहरातील वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने 3 ते 17 जुलै या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविली. या 15 दिवसांच्या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 1 हजार 597 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून 16 लाख 54 हजार 250 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला.

Buldhana Farmer : बोगस बियाणे पेरले, फक्त 20% उगवले; संतप्त शेतकऱ्याने सात एकर सोयाबीन पिकावर फिरवलं रोटावेटर

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील निवाना गावातील शेतकऱ्याने गावातीलच कृषी केंद्रावरून सोयाबीनचे बियाणे खरेदी केलं व आपल्या सात एकर शेतात पेरले. मात्र यातील फक्त 20 टक्के सोयाबीन उगवल्याने संतप्त शेतकऱ्याने आपल्या सात एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवून हे पीक नष्ट केलं आहे. बोगस व न उगवलेल्या बियाण्याची तक्रार देण्यासाठी गेले असता संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी पद हे गेल्या सहा महिन्यापासून रिक्त असल्याने आता तक्रार करावी तरी कुणाकडे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

Irshalwadi Rehabilitation Place : पुनर्वसित इर्शालवाडीला सरकारने बांधून दिलेल्या घरांना दोन वर्षात गळती

काळ बनून आलेल्या दरडीने 84 आदिवासींना गिळले, निसर्गाने छप्पर हिरावले शासनाने बांधून दिलेली घरे 2 वर्षांत गळू लागली आहे. 19 जुलैला इर्शालवाडी दुर्घटनेला 3 वर्ष पूर्ण होत असून आपले बेपत्ता नातेवाईक पुन्हा कधी येतील या भाबड्या आशेवर इर्शालगडाकडे डोळे लावून बसले आहेत. नानीवलीत आपत्तीग्रस्तांसाठी 44 घरे बांधली. 3 वर्षात बांधलेली पक्की घरे गळू लागल्याने गळती काढण्यासाठी शासनाची दारे ठोठावण्याची पाळी आली आहे.

एसटीची भाडेवाढ म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला - विजय वडेट्टीवार

महागाईने होरपळलेल्या महाराष्ट्रातील जनतेवर महायुती सरकारने पुन्हा एकदा एसटी भाडेवाढीचा बोजा लादला आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "एसटीची १३.५६ टक्के भाडेवाढ म्हणजे महायुती सरकारचा सर्वसामान्यांच्या खिशावर मारलेला आणखी एक डल्ला आहे," अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी आपला संताप व्यक्त केला.

सच्चा गांधीवादी, समाजवादी 'सप्तर्षी' निखळला - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते, लेखक आणि तरुण पिढीचे मार्गदर्शक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे सच्चा गांधीवादी व समाजवादी 'सप्तर्षी' निखळला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आ

पुणे राष्ट्रवादीची सूत्रं जय पवारांच्या हातात?

जय पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक आणि नगरसेविकांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीमुळे आता पुण्याची राष्ट्रवादीची सूत्रे जय पवार यांच्या हातात जाणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक प्रश्नांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विकासकामांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक प्रभागातील विकासकामांची सद्यस्थिती आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्या कशा पूर्ण करता येतील, याची चाचपणी करण्यात आली. पक्षाच्या संघटनात्मक वाढीबाबत जय पवार यांनी नगरसेवकांशी थेट संवाद साधून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आणि पुढील कामांचे नियोजन आखण्यात आले.

लाचेची मागणी करणाऱ्या नगराध्यक्षावर गुन्हा दाखल

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगरपरिषदेत बिल मंजुरीच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भाजपचे नगराध्यक्षासह एका खासगी व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

मागील वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर घाटमाथ्यसह मराठवाडा विदर्भातही पावसाला अनुकुल परिस्थिती तयार झाल्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर पुणे, अहिल्यानगर यासह बीड, परभणी,हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Abhijit Dipke : अभिजीत दिपकेच्या आई-वडीलांची मोदींवर टीका

अभिजीत दिपके यांच्या आई-वडीलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. "लोकशाहीमध्ये ही भारतीय लोकांची चूक आहे, की त्यांनी अशा व्यक्तीला निवडून दिलंय की ज्याला संसाराचा कुठलाही व्याप नाही, मूल नाही, कुटुंबात कोणत्या गोष्टी लागतात, याचं या व्यक्तीला काहीही देणंघेणं नाही, अशा माणसाला जनतेनं पंतप्रधानपदी बसवलं आहे. त्याचे परिणाम आता सगळा देश भोगत आहे, अशी भाषा अभिजीत दिपके याचे वडील भगवानराव दिपके टीका करताना वापरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com