Maharashtra News Live Update : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे दर्जेदार आणि निश्चित कालावधीत पूर्ण करा : देवेंद्र फडणवीस

Marathi Breaking Live Headlines Updates : अभिजीत दीपके यांचे उपोषण सुरू, आज संसदेवर मोर्चा काढणार, पोलिसांनी परवानगी नाकारली, संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात यासह राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

कोणताही प्रश्न सनदशीर मार्गाने आणि सलोख्याने सोडवला गेला पाहिजे : अण्णा हजारे 

दिल्ली येथे आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देताना लाठीचार्ज नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला, याची माहिती नसल्याचे सांगितले. तसेच कोणताही प्रश्न सनदशीर मार्गाने आणि सलोख्याने सोडवला गेला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे

युवकांवरील लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीची हत्या

कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपसे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. युवकांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह संपूर्ण मोदी सरकारनेच पायउतार व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे दर्जेदार आणि निश्चित कालावधीत पूर्ण करा : देवेंद्र फडणवीस

गंगाखेड, अमरावती, काटोल येथील स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे ११५ कोटींच्या कामांना गती मिळणार आहे. या आराखड्यातील कामे दर्जेदार आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

महाविद्यालयीन तरुणीवर चार मित्रांकडून अत्याचार; चौघांनाही अटक

पुण्यातील महाविद्यालयीन तरुणीवर चार मित्रांनी अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. विमाननगर परिसरातील ही घटना असून तरुणीच्या तक्रारीवरून फरहान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहील या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देऊन ते तरुण अत्याचार करत असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित मुलगी आणि चारही तरुण एका महाविद्यालयात शिकत होते.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी ही घोषणा केली. येत्या एक ऑगस्ट रोजी पुण्यात डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदी हे इतिहासातील सर्वांत तरुणविरोधी पंतप्रधान : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वांत तरुणविरोधी पंतप्रधान आहेत. इतके तरुण विरोधात असूनही पंतप्रधान मोदी हे एका अयशस्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ शकलेले नाहीत, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.

चर्चा झाली, आता आंदोलकांनी हे आंदोलन थांबवावं, जे पी नड्डा यांचं आवाहन

आंदोलन मागे घ्यावं, जनजीवन पूर्वरत करण्यासाठी पोलिसांना मदत करावी असे आवाहन केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. आंदोलकांकडून सरकारकडे चर्चेचा आज पहिला प्रस्ताव आला आहे. सकाळी 11.50 पासून आमची आंदोलाकांसोबत चर्चा सुरू आहे असे नड्डा म्हणाले. आंदोलकांसोबत बैठक पार पडली आहे. शिष्टमंडळासोबत व्यवस्थीत चर्चा झाली आहे असे नड्डा म्हणाले. आंदोलकांकडुन दुपारी 4 वाजता निवेदन देण्यात आले आहे असे  नड्डा म्हणाले. 

मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद, सरन्यायाधीश सूर्यकांत यांना संजय राऊत यांचा टोला

नवी दिल्लीमध्ये आज जे आंदोलन सुरू आहे त्याचं श्रेय हे फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जात आहे. त्यांनी देशातील मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल आभार, अशा शब्दात संजय राऊतांनी टोला लगावला आहे.

मुंबईत चैत्यभूमी परिसरातही CJPच्या पाठिंब्यासाठी महाविद्यालयीन तरुणींचं आंदोलन सुरु; पोलिसांनी घेतलं ताब्यात

दिल्लीत जंतर-मंतर ते संसद भवन परिसरात कॉक्रोच जनता पार्टीनं आज मोर्चा काढला आहे. या मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून देशभरातून तरुण मुलं इथं मोठ्या प्रमाणावर गोळ्या झाले आहेत. सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दादरच्या चैत्यभूमी परिसरातही महाविद्यालयीन तरुणांनी आज आंदोलन केलं. यामध्ये मुलींचा मोठा सहभाग होता. आंदोलनाला ४ वाजताची वेळ देण्यात आली होती. आंदोलनाला सुरुवात होताच या तरुणींना पोलिसांनी घेतलं ताब्यात.

नड्डांसोबतची चर्चा अद्याप सुरुच! सीजेपीनं 'या' मागण्या ठेवल्या समोर

वागचूक यांच्या आंदोलनात समर्थनार्थ नागपुरातील संविधान चौकात आंदोलकांचं ठिय्या आंदोलन 

वागचूक यांच्या आंदोलनात समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपुरातील संविधान चौकामध्ये आंदोलकांनी मागील दोन तासापासून जास्त वेळा पासून ठिया देऊन बसलेले आहे..

यावेळी गटागटामध्ये आपापल्या पद्धतीने रोष व्यक्त करत, तर काही जण हातात फलक घेऊन घोषणा देत आहे..

संविधान चौकात नारे देत आंदोलकांची गर्दी वाढली,

4 वाजेपर्यंत पोलिसांकडून परवानगी असताना आता गर्दी वाढली आहे...

अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं, सीजेपीचा दावा 

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला तीव्र वळण लागले आहे. अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं, असा दावा सीजेपीने केला आहे.

संसद मोर्चादरम्यान पोलिसांची कारवाई; आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या

केंद्र सरकारविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला तीव्र वळण लागले आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी रोखत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक मागे हटण्यास तयार नसून, कोणत्याही परिस्थितीत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या कारवाईनंतर अनेक आंदोलक जखमी


आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाले, तर काहींना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी हलविण्यात आले. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आंदोलकांमध्ये तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनाची धग

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स अधिक मजबूत करण्यासाठी वेल्डिंगचे काम सुरू केले आहे. परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

हरिश्चंद्र गडावरून खाली उतरत असताना चार पर्यटक गंभीर जखमी

भंडारदरा परिसरातील हरिश्चंद्र गडावरून खाली उतरत असताना अचानक दरड कोसळल्याने चार पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

विद्यार्थ्यांचा मनपाचा आयुक्तांचा कार्यालयात दालनासमोर घेराव घालणार

नागपूर महानगर पालिकेच्या एकात्मका नगर शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने तेथील विद्यार्थी पालिका आयुक्तांच्या कार्यलय परिसरात आले आहे.पालिका आयुक्तांच्या दालनासमोर शाळा भरवणार आहेत.

दिल्लीतील काही भागांत इंटरनेट बंद

जंतर-मंतरवर CJPचा शक्तिप्रदर्शन; संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीतील काही भागांत इंटरनेट बंद

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला FTII विद्यार्थ्यांचा पाठिंबा

शिक्षणमंत्री धर्मंद्र प्रधान यांच्या जीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांना FTII विद्यार्थ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. Neet परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी जबाबदारी निश्चित न झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. FTII मुख्य प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करून आंदोलन सुरू केला आहे.

जंतर-मंतर परिसरात सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांचा जमाव

सध्या जंतर-मंतर परिसरात सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांचा जमाव जमला आहे. मंडी हाऊस, जनपथ, संसद मार्ग आणि जंतर-मंतर परिसरात लोक जमले आहेत. दिल्ली पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि सतत देखरेख करत आहेत.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु आहे. पावसाळा आणि पावसाळा अधिवेशन लाभदायक ठरो, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या.  

जादूटोण्याची भीती दाखवून जमीन व्यवहारात केली फसवणूक

उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील एका शेतकऱ्याला जादूटोण्याची भीती दाखवून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भोंदूबाबा अशोक खरातसह सहा जणांना नोटीस काढण्याचे आदेश सोलापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ऐश्वर्या सागर जाधव यांनी दिले आहेत. शेतकरी राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी दाखल केलेल्या खासगी फिर्यादीत हा आदेश देण्यात आला.

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात

बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला मोठा अपघात झाला. धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात ही अपघाताची घटना घडली. कारमध्ये आमदार कुचे यांच्यासह चौघे जण होते. पण काही कामानिमित्त आमदार कारमधून खाली उतरले आणि त्यांचा चालक आणि बॉडीगार्ड हे एका व्यक्तीला आणण्यासाठी पुढे निघून गेले. तिथून परत येत असताना ही अपघाताची घटना घडली.

सर्वात मोठा मोर्चा निघणार - अभिजीत दीपके

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके म्हणाले, "भारतातील इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघणार आहे. गेल्या १०-१२ वर्षांपासून या देशातील लोकशाही संपवण्याचे प्रयत्न झाले. तुम्ही जंतर-मंतरवर महिनाभर बसून लोकशाहीला पुन्हा जिवंत केले आहे.

सोनम वांगचुक यांच्या सरकारला तीन अटी,...तर आंदोलनही मागे घेणार

सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून ट्विट करत म्हटले आहे की, सरकारने जर आमच्या तीन अटी मान्य केल्या तर आम्ही आंदोलन मागे घेण्यास तयार आहोत. त्यामध्ये नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि तेथील खासदारांनी आम्हाला नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे. तसेच त्यांच्या तिसऱ्या अटीमध्ये म्हटले आहे की, जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावे.

जंतर मंतरवर प्रचंड गर्दी

आज संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. पहाटेपासून लोकांनी जतर मंतरवर जमण्यास सुरुवात केली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून; मोर्चा, सोनम वांगचुक उपोषणामुळे विरोधक सरकारला घेरणार

\संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात सहा विधेयके मांडली जाणार आहेत.मतदारसंघ पुनर्रचना संदर्भात विधेयक येणार की नाही याची उत्सुकता असणार आहे. तसेच जंतम मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे सरकारला विरोधक घेरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com