Maharashtra Political : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजीच्या राज्य आणि देशातील दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

चंद्रपूरचा बदला भिवंडीत? मुनगंटीवार यांनी उडवली काँग्रेसच्या दाव्याची खिल्ली

नागपूर : सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चंद्रपूर आणि भिवंडी या दोनच महापालिकांची चर्चा सुरू आहे. चंद्रपूरमध्ये भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मदतीने आपला महापौर बसवला, तर भिवंडीत भाजपच्या बंडखोराला काँग्रेसने महापौर केले. अशा परिस्थितीत 'आम्ही चंद्रपूरचा बदला भिवंडीत घेतला' असे दावे काँग्रेस नेत्यांमार्फत केले जात आहेत. मात्र, हे सर्व दावे हास्यास्पद असल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते व चंद्रपूर महापालिकेचे 'किंगमेकर' सुधीर मुनगंटीवार यांनी "आमचा महापौर शुद्ध भाजपचा आहे" असा टोला काँग्रेसला लगावला.

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून राजकारण तापलं; राजू शेट्टींचा राज्यभर आंदोलनाचा इशारा 

शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या ऑनलाइन बैठकीत बोलताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. शेतकरी आणि महिलांना अटक करून दडपशाहीने संयुक्त मोजणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रत्नागिरी ते नागपूर दरम्यान आधीच महामार्ग अस्तित्वात असताना समांतर शक्तीपीठ महामार्ग उभारण्याचा घाट घातला जात असल्याचे ते म्हणाले. प्रतिकिलोमीटर १२५ कोटी रुपये खर्च दाखवून प्रकल्पात मोठा आर्थिक घोटाळा होणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य आर्थिक अडचणीत असताना आणि विविध विभागांची देणी थकीत असताना १ लाख कोटींचा बोजा जनतेवर टाकण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले.

Santosh Deshmukh Death कृष्णा आंधळे 3 वेळा गावी आला' देशमुख कुटुंबाला धोका' जरांगेंचं विधान

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार असतानाही तब्बल तीन वेळा गावी येऊन गेल्याचा खळबळजनक दावा मृत संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. तर पोलीस आरोपींचा बचाव करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आरोपीला कोणाचे तरी संरक्षण मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान यावर ही गंभीर बाब असून देशमुख कुटुंबाला धोका असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Harshwardhan Sapkal हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार

आरएसएस संघटनेनं दाखल केलेल्या मानहानी याचिकेवर आज भिवंडी कोर्टात सुनावणी झाली. त्यासाठी राहुल गांधी स्वत: उपस्थित होते. आधीच्या जामीनदारांचं निधन झाल्यामुळे नवीन जामीनदार सादर करण्यासाठी त्यांना कोर्टात बोलावलं होतं. त्यानुसार उपस्थित राहत त्यांनी नवीन जामीनदार सादर केला. हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवे जामीनदार आहेत.

Congress News : काँग्रेसविरोधात अंधेरीत भाजपचं आंदोलन

अंधेरीत राहुल गांधींविरोधात भाजप महिला मोर्चाने आंदोलन केलं..एआय शिखर परिषदेवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ आणि राहुल गांधींच्या कथित वक्तव्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं...भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे सहन केलं जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला...

Ambadas Danve : विरोधकही राज्य सरकारवर तुटून पडले

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सरकार अक्षरशः झुंडशाही करत आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. सध्या राज्यात शक्तिपीठ महामार्गाला मोठा विरोध होताना दिसतो आहे. परभणीत याच महामार्गाला विरोध करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठ्या चालवल्या. यावर आता विरोधकही सरकारवर तुटून पडले आहेत.

Rohit Pawar: विमानात जाणीवपुर्वक पेट्रोलचा मोठा साठा ठेवल्याचा केला आरोप

रोहीत पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. अजित पवार यांचे विमान अपघातात गेल्या महिन्यांत निधन झाले. या प्रकरणाबद्दल रोहीत पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतले. यात त्यांनी विमानात जाणीवपुर्वक पेट्रोलचा मोठा साठा ठेवला होता, असा आरोप केला. त्याशिवाय नागरी हवाई मंत्री राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा ही मागणी केली आहे.

NCP  Merger : 'सुनील तटकरेंना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कल्पना देण्यात आली होती'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबतची कल्पना खासदार सुनील तटकरे यांना होती. विलिनीकरणासंदर्भात दहा ते बारा बैठका झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वारंवार केला जात आहे. शेवटची बैठक १६ जानेवारी रोजी झाली होती, त्या बैठकीला सुनील तटकरे उपस्थित होते, या बैठकीला सुप्रिया सुळे आणि अजितदादा उपस्थित होते, त्यांना विलिनीकरणाबाबत माहिती देण्यात आली होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे, अशी बातमी एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

Congress News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा जामीन

आरएसएस संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात राहुल गांधी यांनी यापूर्वी दिलेले जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात दुसरा जामीन देण्यासाठी ते भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश पी. एम. कोळसे यांच्या न्यायालयात राहुल गांधी उपस्थित झाले होते. यावेळी खटला दाखल करणारे आरएसएसचे राजेश कुंटे देखील न्यायालयात उपस्थित होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा जामीन राहुल गांधी यांनी दिला असून पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती नारायण अय्यर यांनी दिली.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी कुठं जावं हे आता संजय राऊत सांगणार का? : संजय शिरसाट

राज ठाकरे यांनी कुठं जावं आणि कुठं जाऊ नये, याची आचारसंहिता आता संजय राऊत यांनी तयार करायची का? डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्ताने अशी वक्तव्ये करणे, हे लोकांना आवडत नाही आणि लोक त्याकडे लक्षही देत नाहीत, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

Ajit Pawar Death : व्हीएसआर कंपनीसोबत महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याचाही संबंध; त्यांनी मैत्री निभावी : रोहित पवार

व्हीएसआर कंपनीसोबत तेलगू देशम पार्टीच्या बड्या नेत्याच्या कुटुंबातील सदस्यांचे आर्थिक व्यवहार असतील, तर या पक्षाचे केंद्रीय मंत्री राममोहन नायडू हे थोडीच अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूची पारदर्शकपणे चौकशी करणार आहेत. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्रातीलही मोठ्या नेत्याचा व्हीएसआर कंपनीसोबत संबंध आहेत. गुजरात, आंधप्रदेश, मध्यप्रदेश येथील नेत्यांचाही त्यात समावेश आहे. एवढे मोठे लोक व्हीएसआर कंपनीच्या पाठीशी असतील तर विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी याप्रकरणी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रातील नेत्यांची नावे मी नंतर सांगतो, त्यांना जो काही संदेश द्यायचा आहे, तो दिलेला आहे. त्यांना एवढचं सांगतो की, अजितदादा तुमचे मित्र होते, त्यामुळे त्यांनी मैत्री निभावणं जास्त महत्वाचं आहे, असे रोहित पवार यांनी आवाहन केले.

Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्‌ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच अजितदादांना न्याय देऊ शकतात : रोहित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. व्हीएसआर कंपनीच्या पाठीशी काही पॉवरफुल लोक असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच अजितदादांना न्याय देऊ शकतात. त्या दोघांना याबाबत पत्र लिहिणार आहे, असेही आमदार पवार यांनी स्पष्ट केले.

Santosh Deshmukh : संतोष देशमुख खूनप्रकरणातील फरारी आरोपी कृष्णा आंधळे तीन वेळा गावी येऊन गेला

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी फरार असलेला कृष्णा आंधळे हा तीन वेळा गावी येऊन गेला, असा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींची भिवंडी कोर्टात हजेरी; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भिवंडी कोर्टात हजेरी लावली आहे. या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नवे जामीनदार असणार आहेत. भिवंडी कोर्टात जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले.

Sambhajinagar : पोलिसांसमोरच कॉपी मराठीच्या पेपरला कॉपी

छत्रपती संभाजीनगरमध्ये दहावीच्या मराठीच्या पेपरला पोलिसांसमोरच कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर चढून कॉपी पुरवली जात असल्याचं दिसून आले.

शिवसेनेचे नेते,  दादा भुसे आणि शेतकऱ्यांनी ठाकरेसेनेचे खासदार यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकला होता. हा खटला मागे घेण्यात आला आहे.  संजय राऊत यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. 

आरएसएस प्रकरणातील सुनावणी संपली. राहुल गांधी भिवंडी कोर्टातून निघाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार आहेत

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी नागरी हवाई मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

अब्रु नुकसानीचा दावा  प्रकरणाची सुनावणी, दादा भुसे, संजय राऊत   पोहचले कोर्टात

नागपूर : बारावी परीक्षेचे दोन पेपर फुटले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे, याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Rohit Pawar:  रोहित पवार  आज काय नवीन खुलासा करणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. रोहित पवार काय नवीन खुलासा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवारांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर रोहित पवारांनी सातत्याने नवनवीन मुद्दे मांडत या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.

मोदी 'ब्लॅकमेल' होत आहेत - प्रकाश आंबेडकर

मुंबईत ज विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली. 'एपस्टीन फाईल्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव समोर आल्याचा आरोप आणि त्यातून निर्माण झालेली देशाची सुरक्षा व सार्वभौमत्वापुढील आव्हाने, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मोदी 'ब्लॅकमेल' होऊन हे करार करत आहेत, गंभीर आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

विरोधी पक्षनेत्यांविना अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार

राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार(ता.23) पासून सुरू होणार आहे. 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. मात्र, विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांविना हे अधिवेशन पार पडणार आहे.

काँग्रेस आमदाराला बिश्नोई गँगची खंडणीसाठी धमकी

कोला पश्चिम मतदारसंघातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून तब्बल १० कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनाही धमकी मिळाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुरक्षीततेच्या दृष्टीने एवढ्या महत्वपूर्ण घटना घडूनही अकोला पोलिसांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले.

पराभूत 'स्वीकृत' नगरसेवक नाही, काँग्रेसचा निर्णय

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत ज्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेऊ नका, असा निर्णय प्रदेश काँग्रेस कमेटीने घेतला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संघर्षामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्ता गमावावी लागली होती.

Sanjay Raut : संजय राऊत नाशिक दौऱ्यावर, मालेगाव कोर्टात हजर राहणार

खासदार संजय राऊत उद्या नाशिकचा दौरा करणार आहे. मालेगाव कोर्टातील सुनावणीला ते उपस्थित राहतील अशी माहिती आहे. मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांविरोधात अवमान याचिका कोर्टात दाखल केली होती. याप्रकरणी मालेगाव कोर्टात सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com