Maharashtra News Live Update : दादरमध्ये मनसेचे आंदोलन; शर्मिला ठाकरेही सहभागी

Marathi Breaking Live Headlines Updates : यासह राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

दादरमध्ये मनसेचे आंदोलन; शर्मिला ठाकरेही सहभागी

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दादरमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही सहभागी झाल्या आहेत.

गुन्हा दाखल झालेले किंवा नोटीस आलेल्या विद्यार्थ्यांना ठाकरे सेना कायदेशीर मदत करणार

नीट पेपर फुटीप्रकरणी अभिजीत दीपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करताना गुन्हा दाखल झाला असेल किंवा कायदेशीर नोटिस आली असेल तर त्यांनी shiv sena ubt legal@gamil.com या ईमेलवर संपर्क साधावा. त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. राज्यातील सर्व वकिलांनी या विद्यार्थ्यांच्या केसेस मोफत लढवाव्यात. त्यांनी आमच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना साथ द्यावी, असे आवाहन आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.

अरविंद केजरीवाल जंतर मंतरवर दाखल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जंतर मंतरवर दाखल झाले आहेत. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ते सध्या विद्यार्थ्यांना संबोधित करत आहेत.

नरेंद्र मोदींच्या घरासमोर काँग्रेसचे आंदोलन; पंतप्रधानांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थाना समोर काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जून खरगे आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. पण दुसरीकडे पोलिस फोर्सही वाढवला आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधींच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करणारे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आंदोलनस्थळावरून काँग्रेसच्या काही खासदारांना ताब्यात घेतले आहे.

उद्धव ठाकरे उद्या जंतर मंतरवर जाणार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विद्यार्थी आंदोलकांची भेट घेण्यासाठी उद्या दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ठाकरे हे भेट घेणार आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी जंतर मंतरवर जाऊन घेतली अभिजीत दीपकेंसह आंदोलनकर्त्यांची भेट

अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत या लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे.

दिल्लीत पंतप्रधानांच्या घरासमोर राहुल गांधी, प्रियांका गांधींसह काँग्रेस नेत्यांचे तासाभरापासून ठिय्या आंदोलन

विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व बडे नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. हे सर्व नेते गेली तासाभरापासून मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून आहेत.

India-US Trade Dea भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन

भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या प्रस्तावित 'मुक्त व्यापार करारा'ला (India-US Trade Deal) विरोध करण्यासाठी दिल्लीतील किसान घाट येथे देशव्यापी आंदोलन करण्यासाठी निघालेल्या हजारो शेतकऱ्यांवर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी तीव्र दडपशाही सुरू केली आहे. 'देश बचाओ मोर्चा' च्या बॅनरखाली देशातील १५४ हून अधिक शेतकरी संघटना या आंदोलनात सामील झाल्या असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख मा. खा. राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते सरदार व्ही. एम. सिंह यांच्यासह हजारो शेतकऱ्यांना पोलिसांनी राजघाट आणि दिल्लीच्या सीमा भागातून ताब्यात घेतले आहे.

Abhijeet Dipke आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप

अभिजीत दिपकेंच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या.. लाठीचार्ज व्हायला नव्हता पाहिजे, लेकर तिथे आंदोल करण्यासाठी गेले होते. आज एक महिना झाला तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. तिथे कोणतीही घटना झाली नाही आणि यांनी लाठीचार्ज केला. लेकर काय दहशतवादी आहे का ते? 18 -20 वर्षांची मुलं आहेत ती. तुम्ही दहशतवाद्यांना सोडून देतात आणि तुम्ही लेकरांवर लाठीचार्ज करता, सरकारने हे योग्य केलं नाही.

Parliament Adjourned दिल्ली लाठीचार्जवर संसदेत रणकंदन! विरोधक आक्रमक, कामकाज तहकूब

दिल्लीतील आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे पडसाद संसदेत उमटलेत... लोकसभेसह राज्यसभेत विरोधकांनी या मुद्द्यावर बोलण्याची मागणी लावून धरली मात्र यावर बोलण्यास नकार दिल्यानं विरोधक आक्रमक झाले... विरोधकांनी मागणी लावून धरल्यानं सभागृहात गोंधळ झाला... कालसारखं आजही विरोधकांनी NEETच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानं आजही कामकाज तहकूब करण्यात आलंय...

Maharashtra Government : राज्यातील रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा उभारल्या जाणार

राज्यातील रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा उभारल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे एक रुपया भाड्याने कोट्यवधींच्या जमिनी आंदण दिल्या जाणार आहेत. राज्यातील प्रमुख सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या परिसरात धर्मशाळा आणि विश्रामगृहे उभारण्याची जबाबदारी गुजरातमधील सेवादान आरोग्य फाऊंडेशन या संस्थेला देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केला आहे. या निर्णयानुसार संबंधित संस्थेला धर्मशाळा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या सरकारी जमिनी वार्षिक केवळ एक रुपया नाममात्र भाडेपट्ट्यावर तब्बल 49 वर्षांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Solapur News : वृध्द‌ वारकरी दाम्पत्याला जिल्हाधिकाऱ्यांनी घडवले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असल्याच प्रत्यक्ष कृतीमधून सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकीयेन यांनी दाखवले. आषाढी वारीत विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक तासन्‌तास रांगेत उभे राहतात. मात्र सात तासांहून अधिक काळ चालत आलेल्या 80 वर्षाच्या वृद्ध आजी-आजोबांची अवस्था पाहून सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयेन त्यांच्यासाठी पुंडलिक ठरले. त्यांनी या ज्येष्ठ वारकऱ्यांना थेट विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडवून मानवतेचा आदर्श घालून दिला.

Ahilyanagar News : 'मोदी हटाव, देश बचाव', घोषणांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला

दिल्लीच्या जंतरमंतर येथील उपोषणाला अहिल्याननगरमधून पाठिंब्यासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरला आहे. सोनम वांगचुक अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला अहिल्यानगर शहरातील आंबेडकर अनुयायांनी पाठिंबा दर्शवला. भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंबेडकरी संघटनांच्या आंदोलनला सुरुवात केली. 'मोदी हटाव, देश बचाव', घोषणांनी परिसर दुमदुमला होता. लाठी हल्ल्याचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली.

Buldhana News : शेगावात नीट पेपरफुटी प्रकरणावर विद्यार्थ्यांचा आक्रोश; तहसीलवर धडक मोर्चा...

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नीट पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आज आक्रोश मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी नीट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांना न्याय, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.

Kalyan MNS Amdolan : जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज, मनसे आक्रमक; धर्मेंद्र प्रधान यांच्या फोटोला काळे फासून पायदळी तुडवले

दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या छायाचित्राला काळे फासून ते पायदळी तुडवत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Ethanol Fuel : 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टामुळे अन्नसुरक्षेला बाधा नाही

इंधनात 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट अन्नसुरक्षेला बाधा पोहोचवत असल्याचा किंवा जलस्रोतांचा ऱ्हास करत असल्याचा दावा केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत लावला. ही योजना पूर्णपणे ‘टाकाऊतून टिकाऊ’ या तत्त्वावर आधारित असल्याचे सरकारने स्पष्ट केले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, अन्नसुरक्षेचे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच अतिरिक्त कृषी उत्पादनाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो. 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टामुळे अन्नधान्य उपलब्धतेवर किंवा देशाच्या अन्नसुरक्षेवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 18 हजार तक्रारी; ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत आर्थिक अनियमितता

‘जलजीवन मिशन’ या ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत आर्थिक अनियमितता आणि निकृष्ट कामाच्या 18790 तक्रारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे आल्या आहेत. या प्रकरणात 635 विभागीय अधिकारी, 1020 कंत्राटदार आणि 155 त्रयस्थ तपासणी संस्थांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने सोमवारी दिली. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक यांनी विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी ही माहिती दिली.

CJP Protest: जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची अरविंद केजरीवाल यांनी घेतली भेट

दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालयांनी आज राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयाला भेट दिली.

राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ

पेपरफुटी, तरुणांवरील हल्ल्यावरून राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ झाला आहे. या गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

CJPच्या आंदोलनात अभिनेता प्रकाश राज सहभागी

आज दुसऱ्या दिवशी कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे समर्थक जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन करत असून संसदेकडे मोर्चा काढण्याची तयारी करत आहेत. तर या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज सहभागी झाले आहेत.

नवी दिल्ली: एनडीए संसदीय दलाची 'मंगल मिलन' बैठक सुरू

नवी दिल्ली येथील संसद वाचनालय इमारतीतील जी. एम. सी. बालयोगी सभागृहात (G.M.C. Balayogi Auditorium) एनडीए संसदीय दलाची 'मंगल मिलन' बैठक सुरू झाली आहे.

अभिजीत दीपके यांनी मागितली आंदोलकांची माफी

कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी कालच्या आंदोलनादरम्यान ज्यांना मारहाण झाली त्यांची माफी मागितली आहे.

मानखुर्द मेट्रो स्थानकाजवळ बेस्टचा भीषण अपघातात

सोमवारी सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द मेट्रो स्थानकाजवळ एका भरधाव बेस्ट बसने रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका वृद्धाचा मृ्त्यू झाला आहे. तर तर बस चालकासह 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अमरावती मध्यरात्री दुहेरी हत्याकांडाने हादरली

अमरावती जिल्ह्यातील वलगाव मध्यरात्री दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. वलगाव बसस्थानक परिसरात सहा युवा हल्लेखोरांनी दोन युवकांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. जुन्या परंतु किरकोळ कारणातून या हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. पाचही युवा हल्लेखोरांना पकडत पोलिसांनी अटक केली आहे.

जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट

आज जंतर मंतरवर सीजेपीकडून आंदोलन सुरू आहे. आता पुन्हा एकदा पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुरू झाल्याचं पाहायला मिळालं.

CJP च्या आंदोलनादरम्यान 118 दिल्ली पोलीस जखमी

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने काढलेल्या संसद भवनावरील मोर्चाला हिंसक वळण लागलं. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्यानंतर काही आंदोलकांनी देखील प्रतिकार केला यामध्ये दिल्लीतील 118 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे.

CJP Protest: दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरुच

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरुच राहणार आहे. काल संसद भवनावर काढलेल्या मोर्चादरम्यान आंदोलकांवर मोठा लाठीचार्ज करण्यात आला. तरीही आंदोलन मागे न घेता ते आणखी आक्रमकपणे सुरू ठेवण्याचा निर्णय सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांनी घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com