Maharashtra Politics Live Update : मेळघाटातील राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन पलटी; पाच जण जागीच ठार, तर सुमारे बारा जण गंभीर जखमी

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजीच्या राज्य आणि देशातील दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Amravati Accidnt : मेळघाटातील राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन पलटी; पाच जण जागीच ठार, तर सुमारे बारा जण गंभीर जखमी

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या राणीगाव, सुसर्दा, शिवाझीरी नारदू या रस्त्याने प्रवास करत असलेली पिकप वाहन रस्त्यावरील खड्ड्यामुळे पन्नास फूट दरीत पलटी झाला. या दुर्घटनेत टेम्पोमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेने धारणी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Sunetra Pawar : लाडकी बहीण योजना कायम सुरू राहण्यासाठी अजितदादांकडून मोठी तरतूद; सुनेत्रा पवार यांचा दावा

विकासाच्या निधीबाबत अजित पवार यांनी कधीही तडजोड केली नाही. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा अजितदादांचा संकल्प होता. त्यावर आता महायुती सरकार काम करेल. लाडकी बहीण योजना बंद होईल, असे आरोप होत असताना अजितदादांनी त्यासाठी तरतूद केली आणि ही योजना कायम सुरू राहील याची काळजी घेतल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

Maharashtra Budget Session : महाराष्ट्राला 98,300 कोटी रुपयांचा कर परतावा मिळणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीमध्ये 20 हजार कोटींची वाढ झाली आहे. तर महाराष्ट्राला 98,300 कोटी रुपयांचा कर परतावा मिळणार आहे. दावोसमध्ये 30 लाख कोटींचे करार करण्यात आले. त्याची काय वस्तुस्थिती आहे याचे सविस्तर विवेंचन या अर्थसंकल्पात करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Devendra Fadnavis : विरोधकांच पत्र, व्याकरणाच्या चुकाच चुका..; देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. या पत्रातील व्याकरणाच्या चुकांवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना चिमटे काढले आहेत. विरोधकांचं एक सहा पानाचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र आम्हाला मिळालं. जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या एवढ्या चुका या पत्रात करण्यात आल्या आहेत. बातम्यामध्ये आलेले पॅरा आहे, तसे यामध्ये टाकण्यात आले आहेत, जराही बदल करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

Devendra Fadnavis : विरोधकांच पत्र, व्याकरणाच्या चुकाच चुका..; देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. या पत्रातील व्याकरणाच्या चुकांवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना चिमटे काढले आहेत. विरोधकांचं एक सहा पानाचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र आम्हाला मिळालं. जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या एवढ्या चुका या पत्रात करण्यात आल्या आहेत. बातम्यामध्ये आलेले पॅरा आहे, तसे यामध्ये टाकण्यात आले आहेत, जराही बदल करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

Eknath Shinde On Farmer : शेतकऱ्यांना 32 हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं

'शेतकऱ्यांना 32 हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे. दिवसा शेतकऱ्यांना वीज देण्याच काम केलं आहे. सर्वसामान्यांसाठीचे हे बजेट असणार आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले. 125 प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे. 90 हजार कोटी रुपयांच्या वैनगंगा पैनगंगासाठी मान्यता दिली आहे,' असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

Eknath Shinde Mumbai : 'उद्योगपतींच्या घराखाली काय काय लावलं जात होतं'

दिल्लीच्या एआय समिटमधे 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिलायन्सने केले आहे. यांना आपण सुरक्षा दिली पाहिजे, नाहीतर मागच्या सरकारमध्ये आपण पाहिले, उद्योगपतींच्या घराखाली काय काय लावलं जात होतं, असं सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे

Devendra Fadnavis On Narhari Zirwal : मुख्यमंत्री फडणवीसांकडून नरहरी झिरवळ यांना क्लीन चिट

अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे. लाचखोरी प्रकरणात मंत्र्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही. पुरावे असल्यास एसीबी कारवाई करते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अन्न आणि औषध प्रशासनातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं होतं. त्यावरून नरहरी झिरवाळ अडचणीत आले आहेत.

Eknath Shinde : विरोधी पक्षनेता मिळणार का? भुजबळसाहेब एकटे सभागृह दणाणून सोडायचे...

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्षनेता हा विषय सभापती आणि विधानसभा अध्यक्षांचा आहे. आम्ही त्यात काय करणार. केवळ रडत बसायचं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. भुजबळ साहेब एकटे होते. मात्र सभागृह दणाणून सोडायचे असेही शिंदे म्हणाले.

खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकरी नेते पाशा पटेल यांना लगावला टोला

नांदेड येथे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकरी नेते पाशा पटेल यांना राजकीय टोलेबाजी करत टोमणा लगावला.

ते म्हणाले पाशा पटेल यांच्याकडे बांबू लागवड मिशन आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना ही जवाबदारी दिली आहे. पण अधूनमधून ते राजकीय बांबूही लावत असतात, असं वक्तव्य चव्हाण यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित नागरिकांनसह मान्यवरामध्ये एकच हशा पिकला.

६ मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार - CM देवेंद्र फडणवीस; अजित दादांच्या सुचनेनुसार काम होणार

आज चहापानावर विरोधकांनी बहीष्कार टाकला. त्यामुळे हे अधिवेशन देखील वादळी होण्याची शक्यता आहेे. अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला माध्यमांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला.

चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात सोमवारपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या चहापानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यासह इतरही नेतेमंडळी उपस्थित होते. चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले, याविषयी लवकरच माहिती समोर येईल.

ladki Bahin Yojna : लाभार्थी महिलांना मिळणार मोठा दिलासा

राज्यातील लाडक्या बहिणींच्या जानेवारी महिन्याच्या वेतनासाठी सरकारने फंड उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खात्यामधून 98.25 कोटी रुपये हे महिला व बालविकास विभागाकडे हस्तंतरीत करण्यात आले आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, लवकरच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Amol Mitkari दादांच्या अपघाताबद्दल अधिवेशनात आवाज उठवणार -अमोल मिटकरी 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अजितदादांवर शोक प्रस्तावावरचं शब्द कानांत शिसं ओतल्यासारखं असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणालेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दादांच्या विमान अपघाताबद्दल आवाज उठविणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणालेत.

Bhaskar Jadhav  मानसन्मान नाही तिथे चहापानाला जाणार नाही : भास्कर जाधव

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्षाचा मानसन्मान राखणं महत्त्वाचं आहे..त्यामुळे मानसन्मान नाही, लोकशाहीचा सन्मान नाही अशा ठिकाणी चहापानाला जाणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. भास्कर जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Satej Patil : अधिवेशनापूर्वी मंत्री नरहरी झिरवळांचा राजीनामा घ्या, सतेज पाटील यांची मागणी

मंत्रालायतील लाचखोरी प्रकरणी अधिवेशनापूर्वी मंत्री नरहरी झिरवळांचा राजीनामा घ्या अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी केली आहे. या लाचखोरीचा कोडवर्ड समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकल्याशिवाय एसीबी मंत्रालयात पाऊल टाकणार नाही असही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

Narhari Zirwal : झिरवाळ अडचणीत येणार?

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यावरून राजकारण तापले असून विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार असल्याचे संकेत आज मिळाले. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत नेत्यांनी एसीबीची ही कारवाई मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय झाली नसावी, असा आरोप केला आहे.

Mahavikas Aghadi : चहापानावर बहिष्कार

महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच्या सरकारी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आत्महत्या, बेपत्ता महिलांचे वाढते प्रमाणे, मंत्रालयातील एसीबीची धाड, पेपरफुटी, कर्जमाफी आदी मुद्द्यांवर आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

राज्यात एकतरी सुजलाम सुफलाम जिल्हा आहे का? ठाकरेंचा सवाल

मुंबईत महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरूवात झाली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी राज्यात एकतरी सुजलाम सुफलाम जिल्हा आहे का? असा सवाल सरकारला केला.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला सुरूवात

मुंबईत महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरूवात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, सतेज पाटील या पत्रकार परिषदेत बोलत आहेत.

महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांना संरक्षण द्या, सुप्रिया सुळेंची मागणी

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना पत्रही लिहून पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणाची पार्श्वभूमी आणि आजवरचा घटनाक्रम लक्षात घेता गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की, कृपया मुंडे कुटुंबीयांना पुरेसे संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Chennai : महाराष्ट्रातील विद्यार्थी चेन्नईत समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचा शोध सुरू

महाराष्ट्रातील काही विद्यार्थी हे इंटर्नशीपसाठी चेन्नईत गेले होते. त्यातील २६ विद्यार्थी शनिवारी समुद्रावर फिरायला गेले होते, या २६ विद्यार्थ्यांपैकी तिघे पाण्यात उतरले होते. त्यात नागपूरच्या मयुरी चौधरीचा मृत्यू झाला असून जय पाटील या विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे. राज केदारी याला मात्र सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी संवाद साधला आहे.

गणवेशात असताना पोलिसांना सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी

महाराष्ट्र पोलीस दलात ५१ हजार कर्मचाऱ्यांना गणवेशात असताना सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणे तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिलेत. तर इथून पुढे  गणवेशात असताना पोलिसांना सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Bombay IIT : आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत आढळली जीवंत काडतुसं; बिहारमधील तरुणाला अटक

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत जीवंत काडतुसे सापडली आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पवईमधील हॉस्टेलमध्ये बॅगा तपासणीदरम्यान ही प्रकार उघडकीस आला आहे. ही बॅग आणि त्यातील काडतुसं ही सर्वोत्तम चौधरी याची असल्याचे संबंधित विद्यार्थ्याने सांगितले. चौधरी हा बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी आहे, तो १२ फेब्रुवारी रोजी कॅम्पसमध्ये आला होता. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी पुन्हा कॅम्पसमध्ये आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने ही काडतुसं बिहारमधून विकत आणल्याची कबुली दिली आहे.

Rohit Pawar : रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या; कार्यकर्त्यांचं पोलिसांना निवेदन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार हे सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. केंद्रीय मंत्र्यांपासून व्हीएसआर कंपनी आणि अनेक नेत्यांना ते अंगावर घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मला भीती वाटत नाही. पण माझ्या घरच्यांना भीती वाटते, असे खुद्द रोहित पवार यांनीही बोलून दाखवले आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही ती भीती बोलून दाखवली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी खर्डा पोलिस ठाण्यात दिले आहे.

आता आई-वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करता येणार नाही : विवाह नोंदणी कायद्यात बदलाचा प्रस्ताव

गुजरातमधील भाजप सरकार विवाह नोंदणी कायद्यात दुरुस्ती करणार आहे. लग्न करण्यासाठी आता आई-वडिलांची परवानगी बंधनकारक असणार आहे. लव्ह जिहादचं कारण देत गुजरात सरकारने हे पाऊल उचलले आहे. गुजरातमधील काही संघटनांकडून विवाह कायद्यात दुरुस्तीची मागणी होत होती, त्या पार्श्वभूमीवर ही गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नुकताच हा प्रस्ताव विधानसभेत सादर केला आहे.

Shivsena UBT : चंद्रपुरातील नगरसेवकांच्या भूमिकेबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार : संजय राऊत

भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका नाही. तशा प्रकारच्या सूचना चंद्रपूर महापालिकेतील नगरसेवकांना देण्यात आल्या होत्या. त्या नगरसेवकांनी पक्षशिस्तीचे उल्लंघन केलं असेल तर आम्ही आता हळूहळू सगळ्या कामातून मोकळे झालो आहोत, त्यामुळे चंद्रपुरातील नगरसेवकांच्या भूमिकेबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

Mumbai : मुंबई महापालिकेचा २५ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २५ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर शिंदे हे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करतील आणि तो गगराणी हे सभागृहात मांडतील. दरम्यान, ८ मार्च २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या खर्चाचा हिशेब द्या. कोणाला किती निधी दिला, याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर ऋतू तावडे यांच्याकडे केली आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच

मुंबई महानगरपालिकेत रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदांसाठी शिंदेसेनेत आता जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

शरद पवारांना पुन्हा रुग्णालयात दाखल करणार

शरद पवार यांना आज पुन्हा पुण्यातील रूबी हॉल क्लिनीक रुग्णालयात करणार दाखल करण्यात येणार आहे. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अजितदादांचा अपघाताच संशय, बारामतीमधील लोणी भापकर गाव बंद राहणार

अजित पवार यांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय बारामती तालुक्यातील लोणी भापकर ग्रामस्थांना आहे. या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी हे गाव आज बंद राहणार आहे. यासंदर्भात लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहले आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून दिवंगत महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण

वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून दिवंगत महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. मुंडे यांचा अल्पवयीन मुलगा हा क्लासवरून घरी येत असताना त्याला अडवून मारहाण करण्यात आली..मारहाण करणारा बालाजी आघाव हा वाल्मिक कराडचा समर्थक आहे.याप्रकरणी परळी पोलिसांमध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com