Maharashtra Politics Update: अकोल्यात पोलीस निरीक्षकाची भररस्त्यात मारहाण; पत्नीकडून विनयभंगाचा आरोप, तक्रारही दाखल

Breaking Marathi News live Updates 23 April 2026 : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. यासह आज दिनांक 23 एप्रिल रोजीच्या दिवसभरातील सर्व राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

अकोल्यात पोलीस निरीक्षकाची भररस्त्यात मारहाण,पत्नीकडून  विनयभंगाचा आरोप, तक्रारही दाखल 

अकोल्यातील एका पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. या पोलिस निरीक्षकाचं नाव पुनीत कुलट असं आहे.धक्कादायक बाब म्हणजे राजपेठ पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कुलट यांच्यावर पत्नीला रस्त्यावर मारहाण करत विनयभंग केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्यात कुलट यांच्याविरोधात पत्नीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

'मराठी माणसाच्या किंवा मराठी रिक्षाचालकांच्या अंगावर आलात, तर..'; अमित ठाकरेंचा इशारा 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार राज्यात 1 मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाविरोधात 4 मे रोजी 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याच संपावरुन आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मराठी माणसाच्या किंवा मराठी रिक्षाचालकांच्या अंगावर आलात, तर तुम्हाला रस्त्यावर मारणार, अशा असल्याचा इशारा दिला आहे.

'उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तर आमचं काही म्हणणं नाही,पण...; विजय वडेट्टीवार 

महाविकास आघाडीच्या गोटात विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे. मविआच्या वाट्याला आलेली एक जागा उद्धव ठाकरे यांना सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तर आमचं काही म्हणणं नाही. पण त्याबरोबरच पुढील राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी उद्धवसाहेब लढत असतील तर आम्ही त्यांना समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा काँग्रेसला सुटावी अशी मागणीही केली आहे.

फटाके फॅक्टरी दुर्घटना स्थळाला नीलम गोऱ्हे यांची भेट

वाडा तालुक्यातील कोणसई येथील बेकायदेशीर सुरू असलेल्या दारू फॅक्टरीतील स्फोटात झाला होता दोघांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले होते. उत्पादन सुरू असताना फटाक्यात वापरल्या जाणाऱ्या दारूचा स्फोट झाल्याने कारखान्याचा चक्काचूर झाला होता. यानंतर आज या फटाके फॅक्टरी दुर्घटना स्थळाला नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. तसेच वाडा तालुक्यात अनेक अनधिकृत कारखाने सुरू असल्याच सांगत गोऱ्हे यांच्याकडून प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली.

लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे : विकास गोगावले

रायगडच्या लोणेरे येथील तरुणी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नसला तरी आरोपी विरोधात सबळ पुरावे पोलिसांचा हाती लागले आहेत. आरोपी देखील लवकरात लवकर पोलिसांच्या हाती लागेल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विकास गोगावले यांनी व्यक्त केला. आज विकास गोगावले यांनी पीडित तरुणी हिच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवाय गोरेगाव पोलिस ठाण्यात जाऊन तपास यंत्रणांची चौकशी केली. पोलिसांना या प्रकरणात सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती आणि आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.

35 वर्षांच्या कारकिर्दीत एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री पाहिला नाही :  खासदार संदीपान भुमरे

मी माझ्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक मुख्यमंत्री पाहिले, परंतु एकनाथ शिंदे यांच्यासारखा सर्वसामान्यांची जाण असलेला मुख्यमंत्री कधीच पाहिला नाही असे गौरवोद्गार शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांनी काढले.जालन्यात आयोजित शिवसेना पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

कैद्याचा वाल्मीक गँगच्या सुदर्शन व प्रतिक घुले यांनी जबर मारहाण केल्याचा दावा

बीडच्या कारागृहात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह अन्य आरोपी कैदेत आहेत. या कैद्यांना जेल प्रशासनाकडून व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाते, त्यांना जेलमध्ये मोबाईल वापराची मुभा, घरचे जेवण दिले जाते, असे आरोप वारंवार केले गेले. काल जेलमधील एका कैद्याने आपल्या वाल्मीक गँगच्या सुदर्शन व प्रतिक घुले यांनी जबर मारहाण केल्याचा दावा ऑडिओ क्लीपमधून केला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल

दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्कतावरून संताप व्यक्त करत पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावरून आता कोल्हापुरात प्रकाशक आंबी यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

खंडणीसाठी दुकानावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या गावं गुडांना पोलिसांनी शिकविला चांगलाच धडा

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरातील द मोमोज वाला या शॉप मध्ये तीन गाव गुंडांनी खंडणीसाठी कोयत्याने हल्ला करत चार चाकी वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणात खंडणी उकडणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या गावगुंडांना पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सांगवी पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या असून त्यांची पिंपळे सौदागर परिसरामध्ये भर रस्त्यात दधिंड काढून त्यांची नागरिकांमधील दहशत मोडून काढली आहे.

निवडणूक कामाच्या कारणावरून ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

वसई-विरार शहर महानगरपालिकेत ‘अर्चना सर्व्हिसेस’ अंतर्गत कार्यरत असलेल्या ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवत अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे. या कारवाई विरोधात स्वराज्य श्रमिक कामगार संघटनेने आक्षेप घेत महापौर अजीव पाटील याना निवेदन सादर केले आहे.

परतवाडा मुलींचे लैंगिक शोषण व व्हिडिओ व्हायरल प्रकरणात सोळा वर्षीय मुलीचा जबाब नोंदवला

अमरावतीतील परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण व व्हिडिओ व्हायरल प्रकरणात सोळा वर्षीय मुलीचा न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला. अचलपूर येथे महिला न्यायाधीश नसल्याने अंजणगाव सूर्जी येथील न्यायालयातील महिला न्यायाधीशांकडे या मुलीचा संपूर्ण जबाब काल नोंदवण्यात आला. ज्यात या सोळा वर्षीय मुलीला आरोपी हुजेर खान हा सातत्याने त्रास देत असल्याचे म्हटले आहे. तर हुजेर खान याच्या वरही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेला पुन्हा 4 दिवसांची पोलिस कोठडी

मंत्रतंत्राच्या आधारे दुर्दुध आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना संगमनेर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर आज कोर्टाने पुन्हा चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची तुलना नरकाशी केली; काँग्रेसचा मोदीवर हल्ला, हा तर 140 कोटी जनतेचा अपमान

अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकाच्या मुद्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची तुलना नरक अशी केली आहे. त्यावर भारत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताला नरक म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गप्प का आहेत, त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांशी बोलून आपला निषेध नोंदविला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

काका कोयटे यांना खरात कनेक्शन नडले; राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदाचा राजीनामा

अशोक खरात प्रकरण समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांना भोवले आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा काका कोयटे यांनी राजीनामा दिला आहे. काका कोयटे हे अनेक वर्षांपासून फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. राज्यातील तब्बल १५ हजार पतसंस्था या फेडरेशनच्या सदस्य आहेत. अशोक खरात याच्या समता पतसंस्थेशी त्यांचे कनेक्शन पुढे आल्यानंतर काका कोयटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नवी मुंबईतील अनधिकृत कमानी बुलडोझरच्या साहाय्याने काढू : मंदा म्हात्रे आक्रमक

नवी मुंबईतील अनधिकृत कमानीच्या विरोधात आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, काल आम्ही नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदे यांना भेटलो, त्यांना ह्या अनधिकृत कमानी कधी काढणार आहात, एखादा अपघात झाल्यावरच कमानी काढणार आहात का, अशी विचारणा केली, त्यावर त्यांचे कुठलेच उत्तर आले नाही. पण त्यांना आम्ही काल सांगितले आहे की, दोन दिवसांत तुम्ही कमानी काढल्या नाही तर आम्ही बुलडोझर घेऊन येऊन आम्ही त्या कमानी काढू, असा इशारा आयुक्तांना दिला आहे, असे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे चेहरा; ते विधान परिषदेत जात असतील तर आनंदच आहे : हर्षवर्धन सपकाळ

उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे चेहरा आहेत. ते विधान परिषदेत जात असतील तर आम्हाला आनंद होईल, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनीही महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे.

ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मध्ये रेल्वे नमली; परीक्षेसाठी मराठी भाषेचे माध्यम

मध्य रेल्वे विभागाने १६ मार्चपूर्वी काढलेल्या नोकर भरतीच्या जाहिरातीमध्ये परीक्षेसाठी मराठी भाषेचे माध्यम दिले नव्हते, त्याचा निषेध करत अमित ठाकरे यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. त्यानंतर मध्ये रेल्वे विभागाने त्याची दखल घेत अगोदरची अधिसूचना रद्द केली होती. मध्य रेल्वे विभागाने परीक्षेसाठी आता मराठी भाषेचा समावेश करत नव्याने अधिसूचना काढली आहे.

बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार व्हावे, अशी आमची इच्छा नाही : जय पवार

माझ्या म्हणण्याचा मीडियाने चुकीचा अर्थ घेतला आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करावं, अशी माझी इच्छा आहे. पण २०२९ मध्ये मी उमेदवार व्हावं, अशी लोकांची इच्छा आहे. बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठीही माझे नाव पुढे आले होते. पण त्यावेळीही अजितदादांना मी कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगितले होते. तसेच, २०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार होणार, असे रोहित पवार म्हणाले. पण आमची तशी कोणतीही इच्छा नाही, असे जय पवार यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना सांगितले.

Kharat Case Doctors on SIT Radarखरात प्रकरणात गर्भपात गोळ्या पुरवणाऱ्या डॉक्टरांची आता खैर नाही

भोंदू अशोक खरात प्रकरणात नाशिकमधील काही डॉक्टर SITच्या रडारवर असल्याचं समजतंय. नाशिक महापालिकेच्या डॉक्टरनं खरातला मदत केल्याचंही चौकशी समोर आलाय...या डॉक्टरांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. विशेषकरुन गर्भपात गोळ्या पुरवणाऱ्या डॉक्टरांची SITकडून चौकशी होण्याची शक्यता आहे...

सप्तशृंगी गडावरील मंदिरातील 22 किलो चांदी गायब

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारातून खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये सुमारे 22 किलोची तफावत आढळली असून, या 'चांदी अपहार' प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकाजवळ शिवशाही बसला भीषण आग

ठाणे रेल्वे स्थानक जवळ शिवशाही बसला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवानं आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. दरम्यान आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही

बारामतीत दुपारी एकपर्यंत 31 टक्के मतदान

बारामती विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूकसाठी सकाळी सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा टक्का हळूहळू वाढत आहे. सकाळी 11 पर्यंत 20 टक्के मतदान झाले. तर, दुपारी एक वाजेपर्यंत 31 टक्के मतदान झाले

प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केली भूमिका

प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदानाच्या दिवशी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार या सगळ्या माध्यमांमध्ये चर्चा आहे. या पोटनिवडणुकीसाठी मी तटस्थ भूमिका घेतली आहे.

पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी तणाव

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी मआज तदान होत आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या या मतदानात तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे. यामध्येचे आता आम जनत उन्नयन पार्टीचे संस्थापक हुमायू कबीर आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. मुर्शिदाबादमध्ये दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे.

बारामतीत दुपारी 11 पर्यंत 20 टक्के मतदान

बारामती विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूकसाठी सकाळी सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा टक्का हळूहळू वाढत आहे. सकाळी 11 पर्यंत 20 टक्के मतदान झाले.

आमदार गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी

 आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी शिवाजी महाराजांचा अनादर केल्याचे म्हणत आंबी यांन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

पुण्यात परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्या असून पॅट-3 चा मराठी, गणित, इंग्रजीचा पेपर फुटला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणात नाशिक महानगरपालिकेतील एका मोठ्या अधिकाऱ्याने खरातला गर्भपातासाठी मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. नाशिकच्या चार डॉक्टरांनी भोंदू अशोक खरातला गर्भपाताच्या गोळ्या मिळवून देण्यासाठी मदत केल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक मधील डॉक्टर व सोनोग्राफी सेंटर पुन्हा एसआयटीच्या रडारवर आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये मतदानात राडा; मुर्शिदाबादमध्ये हुमायूं कबीर यांच्या विरोधात घोषणाबाजी

बारामती विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक - सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१ टक्के मतदान.

दिलीप काकडे या भोंदू बाबावर गुन्हा दाखल

नाशिकच्या निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथील महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे या भोंदू बाबावर कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आणि भूतबाधा उतरवण्याचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील ३ दिवस अवकाळी पाऊस असणार असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

ममता बॅनर्जी जिंकल्यास बंगालचं स्वतंत्र राष्ट्र बनेल - अग्निमित्रा पॉल

आज पश्चिम बंगालमध्ये मतदान पार पडत आहे. अशातच भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार अग्निमित्रा पॉल यांनी जर ममता जिंकल्या, तर त्या पश्चिम बंगालचं रूपांतर एका स्वतंत्र देशात करतील, असं वक्तव्य केलं आहे.

Rahuri Assembly By Election 2026: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. यासाठी एकूण 374 मतदान केंद्रे आहेत. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. इथे अक्षय कर्डीले विरीद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होत आहे.

Baramati Byelection 2026 : शरद पवारांची तब्येत आता बरी आहे - सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी शरद पवारांच्या तब्येती संदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या, "शरद पवारांची तब्येत आता बरी आहे. त्यांना मतदान करायचं होतं. परंतु एक्सप्रेस वे बंद आहे उन्ह देखील जास्त आहे. हेलिकॉप्टरने येणे शक्य नसल्यामुळे ते आले नाहीत."

बारामती मधून 2029 ला मी उमेदवार असावं असं बारामतीकरांना वाटतं - जय पवार

बारामती मधून 2029 ला मी उमेदवार असावं असं बारामतीकरांना वाटतं ही लोकांची इच्छा असं वक्तव्य जय पवार यांनी केलं आहे. मात्र, माझी अपेक्षा आहे की मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत रहावं, असंही जय पवारांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये आज मतदान

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानासाठी मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत.

खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत जाऊन बजावला मतदानाचा अधिकार

सुनेत्रा पवार उमेदवार असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. यासाठी संपूर्ण पवार कुटुंब मतदानाचा हक्क बजावत आहे. नुकतंच खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत जाऊन बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. तर मतदानाला जाण्यापूर्वी त्यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.

Voting for Baramati by-election today : बारामती पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरूवात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com