Maharashtra Political Live updates : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचा जानेवारीचा हप्ता वर्ग करण्यास सुरवात

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु आज शेगाव दौऱ्यावर आहेत. यासह आज २५ फेब्रुवारीच्या दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचा जानेवारीचा हप्ता वर्ग करण्यास सुरवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागानं सोमवारपासून जानेवारीच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळं दिलासा मिळाला आहे. सोमवारी रात्रीपासून महिलांच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज येत आहेत.

शाळा मागील दोन वर्षांत राज्यातील २५५ बंद पडल्या ही अतिशय गंभीर आणि खेदजनक बाब - सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढत असल्याने मराठी शाळा बंद पडत असल्याची स्थिती असल्याचे शासनाने सभागृहात कबूल केल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्सवरून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'राज्यातील तब्बल २५५ शाळा मागील दोन वर्षांत बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रातच मराठी भाषेच्या शाळांची ही स्थिती होणे अतिशय गंभीर आणि खेदजनक आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर दुसरीकडे शिक्षणाच्या परिघातून मराठी भाषा हळूहळू दूर होतेय असे चित्र दिसते. अभिजात भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणारा निधी मराठी भाषेतून शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वापरता येऊ शकतो. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन मराठीतून शिक्षण अधिकाधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी काम करावे. मराठी भाषेची पताका फडकवत ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.'

मुंबईत रेल्वे पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराचा मृत्यू

मुंबईत रेल्वे पोलीस भरती दरम्यान धावण्याच्या चाचणीत एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 30 वर्षीय अक्षय मिसाळ असं या उमेदवाराचं नाव आहे. सोमवारी सकाळी घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस मैदानावर सोळाशे मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला एका रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आज नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होणार

नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी सकाळी 11 वाजता निवडणूक होणार आहे. भाजपकडून मच्छिंद्र सानप हे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादीकडून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बिबट्यांचा बंदोबस्त करा..., शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींना पाठवली पत्र

Shirdi News: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीव प्राणी कायद्यात बदल करण्याची मागणी करणारी सुमारे वीस हजार पत्रे पाठवली आहेत. ही पत्रे बैलगाडीतून राहुरी पोस्ट कार्यालयात जमा केली आहेत.

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु आज शेगाव दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आज शेगाव दौऱ्यावर असून त्या श्री संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेणार आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिरात विशेष आरतीही करण्यात येणार आहे. इतिहासात प्रथमच राष्ट्रपती शेगावात येणार आहेत. द्रोपदी मुर्मूंसोबत राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शेगावला जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com