
नागपुरातील बारावी पेपरफुटी प्रकरणात आता सर्वात मोठी घडामोड समोर येतेय.... मुख्य आरोपी शासकीय यंत्रणेतील असण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय... 'साम टीव्ही'ने वर्तवलेले भाकीत खरं ठरले असून, खासगी ट्युशन क्लासेसशी संबंधित तिसऱ्या शिक्षकाला बेड्या ठोकल्यात... आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय... पोलीस आता सहाव्या आरोपीच्या मागावर असून, लवकरच या रॅकेटचा खरा 'मासा' गळाला लागण्याची शक्यता आहे...
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा.
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2026
आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल… pic.twitter.com/ClUI3rJrwm
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात राज्यसभेच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्यात येणार आहे. ते आपल्या दौऱ्यात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. अजितदादांच्या अपघात प्रकरणी ते राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत दावा केला जात आहे की, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हातात एक कोटीच्या किंमतीचे घड्याळ आहे. मात्र. त्यावर तावडे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, सोशल मीडियावरील पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही.
पुणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर प्रशासनाने १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीची पुनर्रचना केली असून, यामध्ये भाजप १४ तर काँग्रेसकडे एक क्षेत्रीय कार्यालय असणार आहे. तर भाजपच्या खेळीमुळे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ नगरसेवक असूनही एकही कार्यालय ताब्यात ठेवता आलेला नाही. या राजकीय डावपेचात क्षेत्रीय कार्यालय लांब पडणार असल्याने नागरिकांचे पाच वर्ष हाल होणार आहेत.
इंदापूर तालुक्यातील डाळच नंबर दोन येथे सोलापूर-पुणे महामार्गावर कारचा अपघात झाला. त्यामध्ये सोलापूरमधील सांगोल्यातील ३ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आदिती अमर हातेकर (वय 25 वर्षे), सखुबाई ईश्वर गेजगे (वय 60 वर्षे) व जय अमर हातेकर (वय 2 वर्षे), असे मृतांची नावे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.