

कोल्हापूरातील छत्रपती शाहू मिल सुरू होण्यासाठी आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या कार्यालयात लोकप्रतिनिधींसह आंदोलकांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे आणि हातकणंगलेचे आमदार अशोक माने उपस्थित होते. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाइन हजेरी लावली. दरम्यान आज झालेल्या बैठकीत शाहू मिल शासनाने चालवावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे या नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, प्रियंका चतुर्वेदी यांचं शिवसेनेमध्ये काय योगदान आहे, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरेंची जागा प्रियंका चतुर्वेदीला दिली होती. ठाकरे गटांमध्ये सर्व काही अल्बेल नाही. 40 आमदार तुमच्या नाकाखालून गेले, आम्हाला त्यांचा पक्ष फोडायची गरज नाही, त्यांचा पक्ष हा विषम वादातून फुटेल अशी ठिणगीही वाघमारेंनी यावेळी टाकली.
राज्यात उष्णतेचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. यात विदर्भासह पश्चिम,मध्य,उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा पारा चढल्याचं दिसून आलं. त्यात विदर्भातील अकोला, वर्धा आणि अमरावती शहरात तापमान 41 अंशांवर पोहोचल्याचं दिसून आलं. तर नागपुरसह चंद्रपूर-यवतमाळ येथेही अंश तापमानाची नोंद झाली आहे. पण दुसरीकडे हवामान विभागाकडून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे विदर्भात नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन अन् गॅस तुटवड्याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, देशात इंधनाचा तुटवडा नाही,पण यापुढे जी परिस्थिती निर्माण होईल, त्यासाठी देखील केंद्र आणि राज्य सरकारची स्टॅटजी तयार आहे. त्यामुळे जे इंधन तुटवड्याची किंवा लॉकडाऊची अफवा पसरवतील त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर बोलताना भुजबळ यांनी म्हटले की, ‘हे दुर्दैव आहे, नाशिकमध्ये या गोष्टी घडतात मला याच अत्यंत दुःख वाटत आहे. अजून आपले लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या गोष्टी कधी ना कधी बाहेर येतातच.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून देशातील इंधन व गॅस पुरवठ्याचा आढावा घेतला असून, भारतात कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही जण जाणीवपूर्वक लॉकडाऊन किंवा पुरवठा खंडित होणार अशा अफवा पसरवत असून, अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बीड एसटी महामंडळाचे आगार प्रमुख सतीश तिडके यांनी एका गुत्तेदाराकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडून बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. सतीश तिडके यांची आगार प्रमुख बीड येथून सहाय्यक यंत्र अभियंता येथील कार्यशाळेत बदली करण्यात आली आहे. सतीश तिडके यांच्या जागी निलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालघरच्या बोईसर परिसरातील तारापूर औद्योगिक वसाहतीत गंभीर प्रकार समोर आला आहे. कोलवडे गावाच्या हद्दीत सीईटीपीच्या चेंबर पाइपलाईनला लिकेज होऊन घातक रसायनयुक्त सांडपाणी थेट रस्त्यावर आले आहे. मोठ्या प्रमाणात लिकेज सुरू झाल्याने लाखो लिटर केमिकलयुक्त पाणी परिसरात पसरले असून तीव्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील एम्पायर सोसायटी समोरील BRT बस लेनमध्ये आलिशान मर्सिडीज कार थांबवत चक्क चिमुकल्या मुलासह बर्थडे सेलिब्रेशनचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने वायरल होत आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी मधील SNBP इंटरनॅशल स्कूल चे पालक फी वाढी विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. SNBP स्कूल ने केलेली फी वाढ ही अन्यायकारक असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
कल्याण पूर्वेतील विनायक कॉलनी परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यधुंद तरुणांनी रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेल्या दुचाकीची तोडफोड केली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे कशाप्रकारे एक तरुण हातात भला मोठा दगड घेऊन दुजाकीवर टाकतो आहे. या प्रकरणात संबंधित दुचाकी मालकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने कोळसेवाडी पोलीस पोलीस दुचाकीची तोडफोड करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे परभणीच्या मानवतमध्ये असलेल्या गॅस एजन्सी बाहेर भर उन्हामध्ये नागरिकांनी 1ते 1.5 किलोमिटर लांब रांग लावल्याची पहिला मिळत आहे. गॅस बुक केल्यानंतर गॅस एजन्सीवरून भेटत असल्याने मानवत मधील गॅस ग्राहकांनी रस्तावर भली मोठी रांग लावली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांची आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत दालनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी खलबते झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनाही पालकमंत्र्यांनी काही सूचना केल्या. त्यामुळे झेडपीच्या विषय समितीच्या सभापती निवडीवेळीही भाजपला रोखण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील बाराशे सभासदांच्या पात्रतेबाबत काउंटडाऊन सुरू झाले आहे. येत्या सोमवारपासून दुग्ध निबंधक प्रशासनाकडून या बाराशे सभासदांच्या पडताळणीला सुरुवात होणार आहे.
"रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला हे योग्यच आहे. कारण अशोक खरात प्रकरण अतिशय भयंकर आहे. खरेतर खरातला कायद्याने शिक्षा व्हावी, असे मला वाटत असले तरी, अशा नराधमांना चौकात उभं करून सुया टोचून टोचून मारले पाहिजे," असा संताप भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. एका दिवसासाठी कायदा बदलून या नराधमाला भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
अशोक खरातच्या या हवाला व्यवहारांचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत पोहोचले आहेत. भारतातून दुबईला आणि तिथून पुन्हा भारतात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाण-घेवाण खरातच्या माध्यमातून होत होती. यासाठी त्याने काही खासगी एजंट्स आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर केल्याचे SIT ला मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे. यासाठी बड्या राजकीय नेत्यांनी, वजनदार भक्तांनी आणि काही भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ‘कम्प्युटर बेस्ड टेस्ट’ परीक्षेसाठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेची सक्ती करणारा निर्णय मागे घेतला आहे. 16 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली भरती अधिसूचना रद्द करण्यात आली असून, लवकरच नव्या अधिसूचनेद्वारे भरती प्रक्रिया पुन्हा जाहीर केली जाणार आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या चौथ्या वर्षी आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशांतर्गत इंधन पुरवठा सुरक्षित करण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. रशियाने 1 एप्रिल 2026 पासून पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत किमती स्थिर ठेवणे आणि पुरवठा सुरळीत ठेवणे हे यामागचे मुख्य कारण असल्याचे रशियाने म्हटले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात मोठा राजकीय घडामोडींचा स्फोट झाला असून विविध पक्षांतील तब्बल शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा भव्य प्रवेश आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झाला.
बीएडच्या सीईटी परीक्षेत सलग दुसऱ्या दिवशी परीक्षेचा बोजवारा उडाल्याने परीक्षार्थी संतापले असून, जिल्हाधिकारी कार्यालयात याप्रकारावर आंदोलन केलं. MIDC मधील एमजीएम अकॅडमी मध्ये कालही पेपर झाला नाही. आजही पेपर झाला नाही. यामुळे संतापलेले सर्व परीक्षार्थी या परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले. जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये या सर्व परीक्षार्थींनी आंदोलन केले.
दररोज 7 हजार सिलिंडर वितरण होतात तर, 13 हजारांहून अधिक सिलिंडर साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील 86 पेट्रोल पंपांवर इंधनाचा सुरळीत पुरवठा होता आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. बुकिंग क्षमता वाढली असून, एका मिनिटाला आता 400 पेक्षा अधिक बुकिंग सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात गॅस आणि इंधनाच्या कुठेही तुटवडा दिसून येत नाही आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे गॅसचा तुटवडा भासत असून त्याचा मोठा फटका भिवंडी शहरातील कामगार वर्गाला बसत आहे. भिवंडी हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जात असून येथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग 5 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरवर अवलंबून आहे. मात्र सध्या गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीकडे दररोज केवळ 40 ते 50 सिलिंडर उपलब्ध होत असल्याने “जे लवकर पोहोचतील त्यांनाच सिलिंडर मिळेल” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेष तपासी पथकाकडे फोन फोनद्वारे विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात 100 पेक्षा अधिक तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरात प्रकरणी SIT कडून हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आला आहे. या तक्रारींमध्ये 70 टक्के महिलांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र लेखी तक्रारींसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. एसआयटीचे अधिकारी तक्रारदारास सुरक्षिततेची हमी देत मन वळवण्याचा करत प्रयत्न करत आहेत.
मुंबईतील चारकोप परिसरात गॅस सिलिंडर चोरीची गंभीर घटना उघडकीस आली असून यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डिलिव्हरीसाठी उभ्या असलेल्या टेम्पोमधून तब्बल 27 गॅस सिलिंडर चोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. नागरिक किंवा व्यावसायिकांनीच ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. वाढत्या मागणीमुळे आधीच गॅस मिळण्यात अडचणी येत असताना ही चोरी झाल्याने सामान्य नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवाल्याचा वापर करत होता. त्याच्या पैशांची देवाण-घेवाण दुबईपर्यंत होत असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले? याचा खुलासा नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केला आहे. पोलिसांकडे असलेल्या व्हिडिओतील एकही व्हिडीओ बाहेर आलेला नाही. मात्र, अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयनेच्या माध्यमातून हे व्हिडीओ व्हायरल झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियातून महिलेशी संपर्क साधून आधात्माच्या नावाखाली वैद्यने महिलेवर अत्याचार केला होता.
जेन झी आंदोलना नादरम्यान विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक कऱण्यात आली आहे. माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन्ही नेत्याच्या अटकेबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी आदेश दिला होता. नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत ही मोठी कारवाई करण्यात आली.
पदपथावर लागलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस दंड आकारतात मात्र महापालिकेचा पण दंड आकारला जातो. याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाचीदाखल करण्यात आली होती. त्यावरून पुणे महापालिकेला चार आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे बाजू मांडण्याच्या सूचना यावेळी मुंबई हाय कोर्टाने दिल्या आहेत. विजय सागर यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे
एम. देवेंद्र सिंग (२०११) यांची बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे सहआयुक्त म्हणून बदली
डॉ. मैनक घोष (२०१९), जिल्हा परिषद, धाराशिव, यांची सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालीये
प्रियंवदा म्हाड्डळकर (२०२२) यांची जिल्हा परिषद, धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली
अशोक काकडे (२०१०), जिल्हाधिकारी, सांगली यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), मुंबई म्हणून नियुक्ती
पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पाणीपुरवठ्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग स्तरावर दर महिन्याला बैठक आयोजित करुन जास्तीत जास्त तक्रारी निकाली काढाव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.
भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस कोठडीत आहे. त्यांच्या कुकर्मांचा 'फोरेन्सिक रिपोर्ट' तयार असून तो लवकरच एसआयटीला मिळणार आहे. खराती पोलिस कोठडी रविवारी संपत असून या अहवालामुळे न्यायालयात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.