

बीड तालुक्यातील कुमशी गावात काल ग्रामसभा होती. या दरम्यान तुम्ही ग्रामसभेत यायचे नाही असे म्हणत दगड आणि लाठ्या काठ्यांनी एका एक टोळक्याने तिघांवर प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी असून बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मुंबई डबेवाला असोसिएशनकडून 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत डबे वितरण सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त हा निर्णय घेतल्याचे असोसिएशननं सांगितलं असून लाखो नोकरदारांना आता पर्यायी जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच वाद निर्माण झाले होते. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गोव्यात सहलीवर गेलेल्या दोन सदस्यांवर त्यांनी भाजपाकडून पैसे घेऊन गद्दारी केल्याचा आरोप केला. आरोप झालेले सदस्य संजय निकम यांनी मग दानवे यांच्यावर पलटवार करतांना त्यांनी अध्यक्षपदासाठी 18 कोटींचा व्यवहार केल्याचा आरोप केला. आता या दोघांनी एकमेकांवर केलेले आरोप हे गैरसमजातून केले होते, आता आमच्यातील वाद मिटल्याचे सांगत या नाट्यावर पडदा टाकला.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाने हुलकावणी दिल्यानंतर आता विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. 13 इच्छुकांनी जोरदार फील्डिंग सुरू केली असून त्यामुळे २ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
महिला महाराष्ट्र केसरीची प्रमुख दावेदार असलेली सांगलीची प्रतीक्षा पाटील हिचा कोल्हापूर शहरच्या वेदीका ससाणे हिच्याकडून 5 विरुद्ध शून्यने पराभव झाला असून प्रतीक्षा पाटीलला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर शहरच्या वेदीका ससाणे विरुद्ध अमृता पुजारी यांच्यात लढत होणार आहे.
भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाच टर्म खासदार पदाच्या कार्यकाळातील मोठी उपलब्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना ड्रायपोर्ट संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. हा ड्रायपोर्ट सुरू होण्याआधीच महसूल विभागाने त्याला सील ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
राज्य सरकारच्या कर्जमुक्ती धोरणाची योग्य अंमलबजावणी न झाल्यास सहकारी संस्था आणि बँका डबघाईस येतील आणि शेतकरी कर्जबाजारी होईल, अशी भीती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्ष सांगेल त्या ठिकाणी मी प्रचाराला जाईन. पण सध्या तरी मला केरळ आणि आसाम विधान सभा निवडणुकीत प्रचारासाठी जायला सांगितले आहे, त्या ठिकाणी मी जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपच्या राजस्थान राज्य कार्यकारिणी समितीच्या सदस्या व ज्येष्ठ नेत्या व सरोज प्रजापत यांचे निधन झाले. ते जयपूरच्या रुग्णालयात 3 दिवसांपासून वेंटीलेटरवर होत्या. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ते जयपूरच्या हॉस्पिटलमध्ये गुडघ्याचे ऑपरेशन करण्यासाठी अॅडमिट होत्या. मात्र शरीरातली साखर वाढल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना मंगलम हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. मात्र त्या ठिकाणी त्यांचे निधन झाले. निधनाचे वृत्त समजताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 2019 साली त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.
मुंबई शहर आणि उपनगरातील विविध कार्यालयात जेवणाचे डब्बे पोचविणारे मुंबईचे डब्बेवाले हे उद्यापासून म्हणजेच ३० मार्च ते ४ एप्रिलपर्यंत सुटीवर जाणार आहेत. ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त हे डब्बेवाले वार्षिक सुटी घेत असल्याची माहिती डब्बेवाला असोसिएशनकडून देण्यात आलेली आहे.
इंधन टंचाईमुळे शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याची सुरुवात येत्या चार आणि पाच एप्रिलपासून होणार आहे.
खासदार संदीपान भूमरे यांचे चालक जावेद रसूल शेख आणि मीर महेमूद अली खान यांच्याविरोधात सालारजंग जमिनीच्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील जवाहरनगर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फसवणूक, धमकावणे, अशी कलमं लावण्यात आली आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी लढत राहणार असल्याचे तक्रारदार मुजाहिद्द इक्बाल खान यांनी म्हटले आहे.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून समन्स बजावण्यात आले आहे. शिवनिका संस्थेच्या आजी आजी सदस्यांचे आर्थिक व्यवहार एसआयटीच्या रडावर आले आहेत. त्यातूनच आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे. रुपाली चाकणकरही या संस्थेच्या सदस्या आहेत. त्यामुळे एसआयटीकडून त्यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
अशोक खरात याच्या पोलिस कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाकडून खरातला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे, तो एक एप्रिलपर्यंत कोठडीत असणार आहे. एसआयटीने खरात याची अधिक चौकशी करण्याची गरज आहे, त्यामुळे कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयापुढे केली. त्यानंतर विशेष न्यायालयाने खरातला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँक व्यवहारांचे नियोजन आधीच करा. चेक क्लिअरन्स, रोख व्यवहारांसाठी फक्त दोनच दिवस मिळणार आहे. मात्र ATM, UPI आणि नेट बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत. ३१ मार्च महावीर जयंतीनिमित्त बॅंका बंद, १ एप्रिलला बॅंक क्लोजिंगमुळे सार्वजनिक कामकाज होणार नाही. तर ३ एप्रिलला गुड फ्रायडेटी सुट्टी तर ५ एप्रिलला रविवार असल्याने बॅंक बंद राहणार आहेत.
डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी आपल्या शकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कल्याण डोंबिवलीत महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर हा शिवसेना ठाकरे गटासाठी पहिला मोठा धक्का मानला जात आहे.
संभाजीनगरातील रिक्षा चालकांनी LPG साठी थेट पालकमंत्र्यांकडे धाव घेतलीय. पालकमंत्री संजय शिरसाठांच्या घराबाहेर रिक्षा चालकांनी रिक्षाच्या रांगा लावल्यात. LPG गॅसवर तोडगा काढण्याची मागणी रिक्षा चालकांनी केलीय.
भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेच्या आजी-माजी सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही नाव आहे. एसआयटीकडून त्यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
भोंदूबाब अशोक खरातच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता पुढील तीन दिवसांत त्याच्या बेनामी मालमत्ता शोधून जप्त करण्याची कारवाई एसआयटीकडून केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे खरातचे परदेश दौरे, त्याचा खर्च याची पाळेमुळेही एसआयटीकडून खणून काढण्यास सुरूवात झाल्याचे समजते.
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणीला अद्याप वेळ लागणार आहे. कर्जमाफीसाठी एसओपी तयार केली जात असून धनदांडग्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे. केवळ गरीब शेतकरीच पात्र ठरतील, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. नाशिक येथील न्यायालयाने नराधम खरातला १ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली. खरात सहकार्य करत नसल्याने विलंब होत आहे. त्याच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असल्याने कोठडी वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली होती.
भोंदूबाबा अशोक खरातला आज पुन्हा नाशिकमधील कोर्टात हजर करण्यात आले आहे. त्याला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. तो तपासात सहकार्य करत नसल्याचे वकिलांनी कोर्टात सांगितले.
अकोल्यात गॅस सिलिंडरच्या रांगेत एका वृद्धाला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागला आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला आता महिना पूर्ण होत असताना, जागतिक व्यापाराची मुख्य नस समजल्या जाणाऱ्या 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'वर इराणने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यानंतर महिनाभर हा मार्ग पूर्णपणे ठप्प होता. मात्र, आता इराणने 'निवडक नाकेबंदी' जाहीर करत भारतासह आपल्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेठीमध्ये समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात इंधन जप्त करण्यात आलं आहे. अमेठी जिल्ह्यातील कोतवाली भागातील भरेथा निधीच्या पुरवा गावात ही कारवाई केली. पोलिस आणि प्रशासनाच्या संयुक्त पथकाने छापा घालत सुमारे 1400 लीटर डिझेल-पेट्रोल जप्त केलं. चार निळ्या रंगाचे ड्रम, एक पाण्याची टाकी आणि चार लहान डब्यांमध्ये बेकायदेशीरपणे हे भरून ठेवण्यात आलं होतं.
परभणीच्या सेलू शहरातील रहेमान नगर येथील कत्तलखान्यावर गौवंश हत्या प्रकरणी पोलिसाकडे आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई केली आणि गोमांस ही जप्त केले या रागात पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली असुन या प्रकाराने सेलू शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या दगडफेकीत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही पोलिस स्थानक परिसरात दोन्ही कडील जमाव मोठ्या प्रमाणात जमला होता पोलिसांनी या जमावाला पांगवले आहे शिवाय पोलिसांचा आतिरिक्त फौजफाटा सेलूत मागविण्यात आला आहे.सेलू शहरात शांतता राखावी कुणीही कायदा हातात घेवू नये अन्यथा कारवाई केली जाणार असा इशारा ही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पक्षफोडीचे वेगवेगळे आरोप होत असताना रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवर, दिवंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्टींचे फोटो बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचार सभांच्या बॅनरवर देखील केवळ खासदार सुनील तटकरे यांच्या व्यतिरिक्त कोणाचेही फोटो छापण्यात आले नव्हते. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघांतील इंदापुर इथं नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्टी बेपत्ता होत असल्याने राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
अमेरिकेत इराणच्या युद्धनीतीविरोधात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलनं उभी राहत आहेत. Donald Trump यांच्या धोरणांचा निषेध करत देशभरात ‘No Kings protests’ या नावाने निदर्शनं करण्यात आली. न्यूयॉर्कमधील Times Square तसेच मॅनहॅटन परिसरात मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्यात येत आहेत.
नाशिकच्या मालेगाव कॅम्पमधील हिम्मतनगर इथून कीटकनाशकांचा आठ लाख 78 हजारांचा बेकायदा साठा कॅम्प पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिस निरीक्षक पंकज निकम यांनी कर्मचाऱ्यांनी छापा घातल्यावर हा कीटकनाशकांचा साठा आढळला. पोलिसांनी सर्व साठा जप्त करून कॅम्प पोलिस ठाण्यात आणला.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या आयुष्याची कुंडली आता नाशिक पोलिसांनी मांडली आहे. त्याच्या कहांडळवाडीतील बालपणापासून ते ईशान्येश्वर मंदिराच्या उभारणीपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. लहानपणापासून बिलंदर स्वभाव असलेला अशोक खरात, गावातील शेतकऱ्यांच्या कोंबड्या-अंडी चोरण्याच्या तक्रारी होत्या. 1983-84च्या सुमारास कोंबडी चोरीच्या प्रकरणात रंगेहात पकडला गेला. त्यानंतर अनेक वर्षे बेपत्ता. काही काळ हाँगकाँगमध्येही वास्तव्याची चर्चा आहे.
पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने महत्त्वाचं लष्करी पाऊल उचललं आहे. United States Marine Corps चे सुमारे 3500 मरीन कमांडो आखाती प्रदेशात तैनात करण्यात आले आहेत. हे सैनिक USS Tripoli या अत्याधुनिक युद्धनौकेवरून संबंधित भागात दाखल झाले असून, ते 31st Marine Expeditionary Unit चा भाग आहेत. जपानमधील लष्करी तळावरून या युनिटची हालचाल करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या एका अत्यंत क्रूर हल्ल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गंगापूर–लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात 32 वर्षीय सीताराम आसाराम आळंजकर या युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सीताराम गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या गुप्तांगावर वार केल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक खरातला ११ वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. खरातचा पोलीस कोठडीतीची मदुत संपल्याने त्याला कोर्टातहजर केले जाणार आहे. खरातची मालमत्ता पोलिसांच्या रडावर. भोंदूगिरी करून मिळवल्याच्या संशय. SIT आणखी पोलिस कोठडीची मागणी करणार.
कॅन/ड्रममधून डिझेल न देण्याच्या निर्णयाने शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेता सोलापूर जिल्हा प्रशासनाने 20 मार्च 2026 रोजीचा आदेश रद्द केला आहे. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सोलापूर जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. तसेच इतर जिल्हा प्रशासनांनी देखील अशाच प्रकारे सकारात्मक निर्णय घ्यावेत,अशी विनंती केली.
भोंदूबाबा अशोक खरात याची कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज पुन्हा त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात करण्यात येणार आहे. आतापर्यंत अशोक खरातवर लैंगिक छळ आणि फसवणुकीचे १० गुन्हे आहेत. त १० पैकी ८ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे तर २ गुन्हे
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारतगॅस या गॅस एजन्सीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा व वितरण तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मार्फत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे. मात्र, दि. २६ मार्च २०२६ रोजी सिलेंडर वितरण करताना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप केल्याचे आढळले. तसेच अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने जादा दराने सिलेंडर विक्री केल्याचेही निदर्शनास आले आहे.
राज्यात पुढचा आठवडाभर अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी घबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.