Maharashtra Political Live Update : महायुती सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही, संजय राऊतांचा दावा

Political Breaking Live Headlines Updates : गेल्या 13 महिन्यांपासून गुजरात इथल्या वनतारा या ठिकाणी असलेल्या माधुरी हत्तीनीला अखेर कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं आहे, यासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

जालन्यातील पाचशे ZP शाळांचे भाग्य उजळणार; पंकजा मुंडेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय

जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था, सुविधांचा अभाव यावरून नेहमीच ओरड होत असते. अशातच जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील पाचशे शाळांचा दर्जेदार विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन वर्षांत जालना जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांचा दर्जेदार विकास करण्याचे निर्देश पंकजा मुंडे यांनी मंत्रालयातील आढावा बैठकीत संबंधित विभागाला दिले. 'नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेसह राज्याने जालन्याचा आदर्श घ्यावा, असे काम करा, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.

ठाणे, नवी मुंबईसह मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

गणेशोत्सवानिमित्त एसटी बसगाड्या आणि गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या वाहनांमुळे शुक्रवारी रात्री ठाणे आणि नवी मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या कोंडींचा फटका  प्रवाशांना बसला आहे.

महायुती सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही, संजय राऊतांचा दावा

सध्याची देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता महायुती सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही. हे सरकार २०२९ पूर्वीच जाईल, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. ते नांदेड येथील 'मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा' या जनआंदोलनादरम्यान बोलत होते.

काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं निधन

काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन झालं असून ते राज्य नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष होते. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

शिर्डी साई मंदिराच्या 'सीआयएसएफ' सुरक्षेसाठी दोन महिन्यात निर्णय घ्या; खंडपीठाचे निर्देश!

शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर आणि परिसराच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) सुरक्षा पुरविण्याबाबत संस्थानने पाठविलेल्या पत्रावर ८ आठवड्यांत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सीआयएसएफच्या महासंचालकांना दिले.

अखेर कोल्हापुरकरांची माधुरी स्वगृही परतली

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची माधुरी यातील गेल्या 13 महिन्यांपासून गुजरात इथल्या वनतारा या ठिकाणी होती. न्यायालयीन प्रक्रिया आणि हाय पॉवर कमिटीने दिलेल्या आदेशानंतर माधुरी हत्तीनीला तिच्या स्वगृही आणण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com