

माझी आई मराठी आहे, मात्र देशातील इतर सर्व भाषा माझ्या मावशीसारख्या आहेत. आईचा गौरव करतानाच मावशीचाही पूर्ण सन्मान राखला पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीसह इतर सर्व भाषांचा आदर केला. परंतु त्यांच्या या विधानावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्यावर टीका केली आहे.
पुणे : महापालिकेच्या निविदांमध्ये मूळ कामाच्या नावाखाली वाढीव अथवा नवीन कामे समाविष्ट करून ठरावीक ठेकेदाराला फायदा करून दिला जातो. हा प्रकार बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. निविदेतील कामे, पुरवठा किंवा सेवा यामध्ये वाढ करायची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि तांत्रिक मान्यता घ्यावी लागणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने परिपत्रक काढले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबियांसह मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही यांनीही दर्शन घेतले.
जगभरातील गणेशभक्तांना सार्वजनिक व घरगुती गणपतीचे ऑनलाइन दर्शन घेता यावे यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in हे ‘गणेशोत्सव’ पोर्टल १४ सप्टेंबरपासून खुले झाले आहे. या राज्य महोत्सवातील सर्व उपक्रमांमध्ये गणेश मंडळांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’चा यंदा प्रथमच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यात आला आहे. स्पर्धेचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर असून, जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया, सिंगापूर आदी देशांतूनही या स्पर्धेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित या स्पर्धेसाठी राज्यभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले असून, ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाच्या पावन पर्व सुरु आहे. गणपती बाप्पा विकसित महाराष्ट्राची बुद्धी देण्यासाठी आले आहेत. हे दहा दिवस महाराष्ट्राला मजबुती देणारे दिवस आहेत, या दहा दिवसात अनेक संकल्प तयार होतात. संकल्प पूर्ततेसाठी आपण सर्वांनी एकजुटीने राहिले पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राला, समाजाला, व्यक्तीला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा झटका दिला आहे. आझाद मैदानातील उपोषणाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली आहे. रविवारी आझाद मैदान पोलिसांनी पहिला अर्ज फेटाळल्यानंतर मनोज जरांगे यांच्यावतीने नव्याने उपोषणाची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेत दुसऱ्यांदाही या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
मुंबईतील परेलच्या ऐतिहासिक गणेश गल्लीत 99 व्या वर्षी मुंबईच्या राजाची दिमाखदार प्राणप्रतिष्ठापना विधिवत पार पडली आहे... वेदमंत्रांच्या प्रभावी जयघोषात आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात राजाची ही देखणी मूर्ती भक्तांचं मन मोहवून टाकत आहे... सकाळपासूनच परेल परिसरात हजारो भाविकांनी मुखदर्शनासाठी मोठी गर्दी केली असून, संपूर्ण परिसर भक्तिमय जयघोषाने दुमदुमला आहे...
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यावर भुजबळांनी भाष्य केलं आहे. ‘मुंबईत आधीच गर्दी आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अपुरे पडत आहेत. त्यामुळे आंदोलनाला परवानगी नाकारली असेल. मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला परवानगी नाकारली असावी, असे भुजबळ म्हणाले.
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली असून तो गुन्हा पूर्णपणे खोटा असून तो खारीज करण्यासाठी उच्च न्यायालायात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच बुलढाणा पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील आमदार गायकवाड यांनी केला आहे.
मराठा समाजाच्या महिलांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी कधी यायचं ते दोन दिवस अगोदर सांगितलं जाईल. मला माझा डाव टाकू द्या. मी समाजासाठी थांबणार नाही. रस्त्यावर जे काटे अंथरलेले आहेत ते आधी मला दूर करू द्या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केले आहेत. मराठा समाजाचे रस्त्यावर सांडणारे रक्त मला बघायचे नाही. माझं रक्त सांडलं तरी चालेल. पण मराठा समाजावर अडचणी येऊ नये म्हणून हा निर्णय आपण घेतल्याचे जरांगे पाटील यांनी घेतल्याचे म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला एकटेच जाण्याचा निर्धार केला असून याची घोषणा त्यांनी आज केली. यावेळी त्यांनी मुंबईला जो जाण्याचा मार्ग ठरला आहे, त्याच मार्गाने जाणार असून ठरलेल्या ठिकाणांवर मुक्काम करेनं असे सांगितलं आहे. तर समाजाने आता मुंबईकडे न निघता प्रवासात आशीर्वाद देण्यासाठी यावं असे आवाहन केलं आहे.
अस्तित्वाच्या लढाईत गणरायाच्या कृपेने न्यायालय उद्धव ठाकरेंना न्याय देईल. सत्याचा न्याय बाप्पा करेल असे साकडे माजी खासदार विनायक राऊत यांनी गणपती बाप्पाच्या चरणी घातले आहे. विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील तळगाव येथील निवासस्थानी 11 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. विनायक राऊत यांनी आज गणपती बाप्पाचे विधीवत पुजा करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आलेल्या संकटातून बाहेर काढण्याचे गाऱ्हाणे बाप्पाच्या चरणी घातले.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभर मराठा समाजाची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच मुंबई पोलिसांनी त्यांना परवानगी दिलेली नाही. तर मागच्या आंदोलानात जे झाले त्यावरून हा निर्णय घेतल्याचे म्हटलं आहे. यानंतर आता जरांगे पाटील यांनी आपली भूमिका आता स्पष्ट केली असून आपण एकटेच मुंबईला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मराठ्यांनी आपली ताकद पुढच्या सूचनेपर्यंत साठवून ठेवावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.
पश्चिम बंगाल काँग्रेसचे सरचिटणीस आशुतोष चॅटर्जी पोलिसांसमोर हजर झाले. दुर्गापूजेदरम्यान मांसाहार करण्याबाबत ‘बागेश्वर धाम’चे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या विधानाचा निषेध करताना त्यांचा फोटो जाळल्याच्या आरोपावरून चॅटर्जी यांना समन्स बजावण्यात आले होते. शास्त्री यांनी बंगाली लोक, बंगालची संस्कृती आणि दुर्गापूजेतील खाद्यसंस्कृतीबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आठ सप्टेंबर रोजी दक्षिण कोलकाता येथील भवानीपूर पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करण्यात आली होती.
पश्चिम बंगालमधील 252 मदरसे बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून, इतर 100 मदरशांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यभर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अनेक मदरशांकडे आवश्यक मान्यता आणि मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा उगारत बीड जिल्हा प्रशासनाने किशोर बाबुराव जाधव (वय ३९) या सराईत मद्य तस्कराविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषध द्रव्यविषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्तींच्या प्रतिबंधक स्थानबद्धतेसंबंधी अधिनियमांतर्गत (एमपीडीए) कारवाई केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासह नदीजोड प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या परिणामकारक नियोजनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा समन्यायी पाणीवाटप संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारपासून (ता. 15) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने लातूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी सरकारकडे विशेष ‘मदत पॅकेज’ची मागणी केली आहे. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील अनेक भागांतील सोयाबीन, टोमॅटो आणि अन्य खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे.
‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ पदवी अभ्यासक्रमाच्या राज्याच्या कोट्यांतर्गत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या दुसऱ्या यादीत दोन्ही अभ्यासक्रमांच्या 11 हजार 196 जागांपैकी 10 हजार 938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली, तर 258 जागा रिक्त आहेत. ‘एमबीबीएस’च्या दुसऱ्या यादीत एकूण आठ हजार 579 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 8442 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
ठाणे जिल्ह्यात 34.18 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी अमली पदार्थांचा प्रमुख तस्कर अमजद युसूफ पठाण आणि त्याच्या चार साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मकोका) तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. पठाणविरुद्ध तीन राज्यांत 20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 किलो 960 ग्रॅम गांजा, ज्याची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे, आणि वाहन व मोबाईल असा एकूण 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बुलडाण्यामध्ये स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव होत असल्याची माहिती आहे. तीन आठवडे स्वाइन फ्लूचा रुग्ण विविध डॉक्टरांकडे उपचार घेत फिरल्याने आजार पसरण्याचा धोका वाढला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खासगी डॉक्टरांकडून इपिडेमिक ऍक्ट 1897 चं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक निघणार पारंपारिक पद्धतीने. सकाळी आठ वाजता मुख्य मंडप येथून मिरवणूक सुरू होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मयुरेश्वर रथातून मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता निघणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज लालबाग राजाचं दर्शन घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.