

नाशिकच्या कळवण तालूक्यात खड्ड्या मुळे दुचाकी व कार च्या अपघातात एका शाळेतून परतना-या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे तर दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली आहे.कळवण तालूक्यातील वेरुळे येथे हा अपघात घडला असून यात प्रेमराज परसराम गावीत या विद्याथ्याचा मृत्यू झाला आहे.अपघात होताच स्थानिकांनी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दळवट येथून कनाशी कडे जात असतांना रस्त्यावर अनेक मोठे खड्डे असून खड्ड्यांमुळे अपघात झाल्याच आरोप स्थानिकांनी केलाय.
परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी चौदा वर्षानंतर माजी आमदार तथा विद्यमान संचालक रामप्रसाद बोर्डीकर यांची घरवापसी झाली आहे. महायुतीने 21 पैकी 17 जागा जिंकत बाजी मारली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पडद्यामागून केलेल्या हालचालीनंतर रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी सुरेश वरपूडकरांच्या नावाची चर्चा सुरू असताना अचानक बोर्डीकरांनी बाजी कशी मारली? यावर खल सुरू असतानाच मेघना बोर्डीकर यांच्या व्हाॅट्सअप स्टेटसची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकूण 15 जणांना अटक करण्यात आली असून सर्वांना 3 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज सर्व 15 आरोपींना पुढील सुनावनीसाठी भिवंडी न्यायालयात श्रीम.एस एस घोडके यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना 17 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाड तालुक्यातील नरवण येथील रहिवाशी एकनाथ मुकणे यांना स्वतंत्र दिनी दिल्ले येथे संपन्न होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाचे निमंत्रण आले आहे. मुकणे यांनी आदिवासी समाजाच्या अर्थिक आणि समाजिक उत्कर्षासाठी काम केले असून स्वतंत्र दिनी दिल्ली येथे मुकणे यांचा सन्मान होणार आहे. राष्ट्रपती भवन येथून त्यांना निमंत्रण पत्रिका पोस्टाने पाठवण्यात आली. सदरची निमंत्रण पत्रिका महाडच्या पोस्ट विभागाने सन्मान पुर्वक मुकणे यांना आज पोच केली. राष्ट्रपती भवन येथून एकनाथ मुकणे यांना स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आणि सत्कार होणार असल्याच्या वृत्ताने मुकणे यांच्यावर समाजाच्या सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गृहमंत्रिपद भूषवलेल्या नरोत्तम मिश्रा यांनाच भाजप पुन्हा तिकीट देईल, अशी अटकळ होती. पण भाजपनं आशुतोष तिवारी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलं. त्यामुळे नाराज झालेल्या मिश्रा समर्थकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी महामार्ग रोखून धरला. नरोत्तम मिश्रा यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी देऊ केली होती. मशालीच्या चिन्हावर लढण्याची ऑफर त्यांना देण्यात आली होती. त्यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दतियामध्ये येतील, अशी थेट ऑफर मध्य प्रदेश शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील शर्मांनी मिश्रांना दिली होती. पक्षाध्यक्षांशी बोलूनच मिश्रा यांना ऑफर दिल्याचे शर्मांनी माध्यमांना सांगितलं होतं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षाच्या दोन गटांत बाचाबाची झाली. मातोश्रीवर ठाणे आणि कल्याण येथील पदाधिकाऱ्यांमध्ये ही बाचाबाची झाली. पदाधिकाऱ्यांमधील बाचाबाची पाहून उद्धव ठाकरेही चांगलेच संतापले. एक तरुण आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देतोय, तुम्ही आपापसांत काय भांडता? तुमच्या या वागण्याला काय अर्थ आहे का?, असा सवालही त्यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्र देण्यात आले आहे. पक्षाच्या घटनेतील बदलाबाबत कोणतेही दस्तऐवज निवडणूक आयोगाला पोचले नाहीत, ते लवकरात लवकर आयोगाकडे सादर करण्यात यावी, अशी सूचना या पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला करण्यात आली आहे. पक्षाची सध्याची राष्ट्रीय कार्यकरिणी वैध आहे का, असा सवालाही निवडणूक आयोगाने या पत्रातून राष्ट्रवादीला विचारला आहे.
मध्य प्रदेशातील दातिया विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला पराभवाचा धक्का बसला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे धनश्याम सिंह हे ६ हजार १६ मतांनी विजयी झाले असून त्यांनी भाजपचे आशुतोष तिवार यांचा पराभव केला आहे.
बिहार विधानसभेच्या बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मतमोजणीच्या ३१ व्या फेरीअखेर प्रशांत किशोर हे १८९५३ मतांनी आघाडीवर असून त्यांनी आतापर्यंत ६३२०३ मते घेतली आहेत. भाजपचे नीरज कुमार यांना ४४ हजार २५० मते मिळाली आहेत. राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा हा मतदारसंघ असून त्याच मतदारसंघात भाजप पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
माझ्या शिक्षणाबाबत तक्रार करण्यात आली आहे. माझे शिक्षण परदेशात झाले आहे, त्याचा खर्च मी कसा केला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. माझ्याकडे शिष्यवृत्तीचे (Scholarship) पत्र आणि शैक्षणिक कर्जाची (Education Loan) सर्व कागदपत्रे आहेत. ती दाखवण्यास मी तयार आहे. पंतप्रधानांनीही त्यांची पदवी आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत. त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक केली, तर मीदेखील माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करेन. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना लक्ष्य केले जाते. ईडी आणि सीबीआयचा वापर करून दबाव आणला जातो, ईडी किंवा सीबीआय पाठवत असाल, तर त्यासोबत तुमची पदवीही पाठवा, असे चॅलेंज कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारला दिले आहे.
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडले की त्याला राजकीय रंग देऊन विरोधक ठरवले जाते, असे सांगत शिवसेनेचे शहराध्यक्ष वाळेकर यांनी अंबरनाथ पश्चिमेतील हाउसिंग बोर्डाच्या १९२ कुटुंबांच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या १५ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून आतापर्यंत २० रहिवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांनी आमदार बालाजी किणीकर यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेसनं E20 च्या मुद्यावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर आंदोलनाचा इशारा दिला होता. यापार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यानंतर आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना उत्तर देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी गडकरींच्या घराजवळ एकवटणार असल्याचं सांगितलं जात आहे. आम्ही काँग्रेसच्या देवडिया भवन समोर आंदोलन करून आलो. आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी गडकरींच्या घरापर्यंत येऊन दाखवावं. त्यांना भाजपच्या पद्धतीने उत्तर देऊ असा इशारा भाजप नगरसेवक बंडू राऊत आणि भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष सचिन करारे दिला आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूरच्या श्री संत बाळूमामा देवस्थानात तब्बल ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रे तयार करणे, दस्तऐवजांमध्ये फेरफार, विश्वासघात आणि फसवणुकीचे गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आले आहेत. तत्कालीन निरीक्षण अधिकारी, सचिव आणि इतर संबंधितांविरोधात भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. टीईटी आणि नेट परीक्षांतील दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंनी पक्षातून बाहेर पडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले. विदर्भातील 11 जिल्ह्यांत मंडल यात्रा सुरू होत असून, ओबीसी जातनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, महाज्योतीसाठी 1000 कोटी निधी, बॅकलॉग भरती आणि लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीची मागणी त्यांनी केली. सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली.
भिवंडीतील कामवारी नदीची पाणीपातळी अचानक वाढल्याने नदीकाठी उभी असलेली रिकामी ट्रॅव्हलर व्हॅन पुराच्या प्रवाहात वाहून गेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मुसळधार पाऊस आणि धरणातून झालेल्या पाणीविसर्गामुळे नदीला पूर आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात पोलिस व्हॅनचा अपघात झाल्याने एकामागोमाग सात वाहनांना धडक बसली. या घटनेत कार आणि अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे CCTV फुटेज समोर आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. या प्रकरणाबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी महेश केदार यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. जामीन अर्जावर सविस्तर युक्तिवाद मांडण्यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितला. त्यानुसार न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.
नाशिक शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी "कर पूर्ण भरतो, मग खड्डे मोफत का?" अशा आशयाचे फलक झळकवत प्रशासनाच्या कारभारावर टीका करण्यात आली. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
TDRF जवानाचा जीव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी घेतला आहे. विकास लहू गोरे, असे मयत जवानाचे नाव असून नुकतीच भिवंडी येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत, त्यांनी जिवाजी बाजी लावून मदत कार्य केले होते. शहापूर तालुक्यातील बामणे गावातील विकास लहू गोरे हा जवान सकाळी आपल्या घरातून कामावर जाण्यासाठी बुलेटने निघाला असता शहापूर शहरातील भांरगी नदीच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यात बुलेटचे पुढील चाक अडकल्याने अपघात झाला. या अपघातात विकास मोरे बाजूला असलेल्या संरक्षण कठ्यावर आपटले. गंभीर जखमी झालेले विकास मोरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मी म्हणालो होतो, मी दोषी असेल, तर मला फासावर लटकावा, या विधानाची आठवण करून देत आजचा दिवस आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया ब्रिज भूषण शरण सिंह यांनी दिली.
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात मुसळधार पाऊस आणि सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक कच्ची तसेच दगडी घरे धोकादायक बनली आहेत. अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून, आईच्या कुशीत झोपलेल्या आठ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रतनवाडी परीसरातील अशोक झडे यांची आठ महिन्याची मुलगी सोनाली हिचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. तर आई अमृता झडे जखमी झाली आहे. अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे 5500 बसेसच्या माध्यमातून 9 लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित प्रवास घडविला. विशेष म्हणजे, यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला 41 कोटी 18 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे 5 कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
दरवर्षी गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राणा दाम्पत्याकडून भव्य दहीहंडीचे आयोजन करून तरुणाईला आकर्षित करण्याचा मोठा प्रयत्न केला जातो. मात्र यावर्षी भाजप स्वतः अमरावतीत दहीहंडी साजरी करणार असल्याची माहिती खासदार अनिल बोंडे यांनी दिली. दहीहंडी कुठे आणि कशी घ्यायची हे महापौर आणि आमदार प्रवीण पोटे यांनी ठरवावे, असे निर्देश खासदार बोंडे यांनी दिले आहे.
रायगडचा पालकमंत्री कुणाला करायचं हा सर्वस्वी अधिकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आहे. हे तिन्ही नेते एकत्र बसून याबाबत लवकर निर्णय घेतील. रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल. तसेच नाशिक पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची मागणी करणे योग्य आहे. पण सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतात. सर्व पक्षांना समन्वयातून निर्णय घ्यावा लागतो, असे भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
महामार्ग सर्वत्रच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव ते झोडगे दरम्यान असेच मोठे खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने अपघात होत आहेत. आणि त्यात अनेक जण जखमी होत आहेत. नॅशनल हायवे प्रशासनाने तातडीने रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
बीडच्या माजलगावात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना सध्याचे राजकारण हे जातीपातीचे, धर्माचे सुरू असून, अशा गलिच्छ राजकारणात माझ्यासारख्याने राहावं की न राहावं, असं मोठं वक्तव्य केले आहे. आज जरी जातीपातीत वाद असले तरी आपल्याकडे मात्र महापुरुषांचे विचार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी मी पहिल्यांदा केली, असेही धनंजय जाधव यांनी सांगितले.
गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपीची भररस्त्यात धिंड काढणे, त्याला मारहाण करून उठाबशा काढायला लावणे आणि नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडल्याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम, शिवाजी विभुते, रविकांत नंदनवार, महेश नलावडे या उच्च अधिकाऱ्यांसह अमोल गायकवाड, अमोल वायाळ, भीमराव कांबळे, दत्तात्रय शिंदे, कादिर शेख आणि सूरज अंबासे या कर्मचाऱ्यांना प्रतिवादी केले असून नोटीस जारी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेने पास केलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा’ विधेयकाला राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी मंजुरी दिली आहे. बेकायदा आणि सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्याच्या हेतूने हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यानुसार बेकायदा धर्मांतराद्वारे झालेल्या विवाहातून दाम्पत्याच्या अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा जो धर्म होता, तोच धर्म लागू होणार आहे.
पुणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा मिळावा, अशी मागणी महापौर मंजुषा नागपुरे यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन अतिरिक्त २५ टीएमसी पाणीकोटा मंजूर करावा, जेणेकरून पुढील अनेक दशकांसाठी पुणेकरांची पाणी सुरक्षितता सुनिश्चित होईल, महापौर यांनी मागणी केला.
गेल्या काही दिवसापासून पुण्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने, भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100 टक्के भरले आहे. धरण 100 टक्के भरल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात सुरुवात झाली. सध्या या 45 स्वयंचलित दरवाजांमधून 3 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल करण्यात येणार..विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा दे्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्चित खडकुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. पक्षात पद देण्यास विलंब करण्यात आला तसेच एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने बैठकीतून हाकलून लावल्यामुळे नाराज होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, भाजपकडूनही “आमची कासवाची चाल आहे, पण विजय आमचाच होणार,” असे म्हणत शिंदे गटाला प्रत्युत्तर देण्यात आले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी कामगार पक्ष हा काँग्रेसचा मैत्री पक्ष असल्याचे सांगताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. महायुतीत ‘टोळी युद्ध’ सुरू असून पक्ष फोडून मित्रपक्षांना मजबूत करण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.रेशीमबागेतून तयार झालेले, पाताळयंत्री स्वभावाचे’; फडणवीसांवर सपकाळांनी बोचरी टीका केली.
बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. येथे प्रशांत किशोर भाजपच्या विरोधात मैदानात होते. तर मध्य प्रदेशच्या दायिता मतदारसंघात देखील पोटनिवडणूक झाली. येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. या निवडणुकीमुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.