

सांगली जिल्हा परिषदची अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी होतं आहे. अशातच भाजपला सत्तेबाहेर ठेवत महायुतीतील घटक पक्ष महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे एकत्र येत महायुतीतील राष्ट्रावादी व शिवसेनामधील काही सदस्य फोडल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडीत जवळपास महाविकास जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करेल हे जवळपास निश्चित समजले जाते . मात्र दुसरीकडे भाजपने जिल्हा परिषदेवर अध्यक्ष महायुतीचाच होणार असा दावा केला आहे. शिवसेना आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ पोलीस कॅम्पस सुरू असलेली पोलीस भरतीमध्ये मुलांनी आज मोठा गोंधळ घातला. पोलीस भरतीमध्ये आलेला मुलांना ई-मेल ना आल्यामुळे रस्त्यावर उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस भरतीसाठी आज शेवटचे दिवस आहे अशामध्ये मुलांना सकाळपासून मैदानी चाचणीसाठी आतमध्ये न घेतल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.
मरोळ पोलीस कॅम्पचा मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मुख्य रस्ता बंद आहे. त्यामुळे मुलं रस्त्यावर उतरल्यामुळे आजूबाजूचे सोसायट्यांचे गेट सुद्धा बंद झाले आहे. मरोळ पोलीस कॅम्पचा आजूबाजूचा राहणाऱ्या लोकांना या गोंधळामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांचा नियोजन अभावी हा गोंधळ झाला असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी नेते म्हणून ओळख असलेले माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या पुढील राजकीय प्रवासासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवड केली आहे. गेल्या काही दिवसापासून धोंडगे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. एकनाथ शिंदे यांची मुंबईत जाऊन काही दिवसांपूर्वी भेट घेत त्यांनी चर्चाही केली होती. अखेर येत्या 19 मार्च रोजी नांदेडमध्ये आयोजित शेतकरी अधिवेशनातून धोंडगे यांच्यासह त्यांचे हजारो समर्थक शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना 20 फेब्रुवारी रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर न्यायालयाने मुंडे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. 48 तासापेक्षा अधिक काळ न्यायालयीन कोठडीत घालवले असतील तर शासकीय नियमानूसार संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले जाते. या आधारे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी व्यंकटेश मुंडे यांना 23 दिवसानंतर निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ला करुन आरोपी फरार झाला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शाळेत घडली आहे.
राज्यातील ३ लाख ३ हजार शासकीय कार्यालयाची वीज जोडणी १ एप्रिल २०१६ पासून प्री-पेड केली जाणार आहे. राज्य सरकारने तसे आदेश नुकतेच जारी केले आहेत. शासकीय वीज भरणा करणारी एकच यंत्रणा केली जाणार आहे. यामुळे अनेक त्रुटी दूर होतील, असा दावा केला जात आहे.
परभणी जिल्हा परिषदेत पुढील पाच वर्ष एकत्र काम करण्याचा निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी जाहीर केला. मुंबईत झालेल्या चर्चेनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे भाजपच्या वाट्याला जाणार आहे. तर उपाध्यक्ष पद दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. तर शिंदेच्या शिवसेनेला महत्त्वाचे सभापती पद दिले जाणार आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीची नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आज सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं सर्वच २९४ जागांवरील उमेदवरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन महत्वाच्या मतदारसंघांवर ममतांनी विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. यांपैकी एका मतदारसंघातून खुद्द ममता बॅनर्जी निवडणूक लढवणार आहेत.
मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने दिलासादायक बातमी दिली आहे. २०२६ सालासाठी अंदाजे २५०० घरांची सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून, या सोडतीची अधिकृत जाहिरात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. मे महिन्यात या घरांची अंतिम सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांची संख्या अधिक आहे. विक्रोळीतील कन्नमवारनगर येथे मध्यम गटातील1221, सायन-प्रतीक्षानगरमध्ये मध्यम गटातील 352 घरांचा या सोडतीत समावेश असेल. याशिवाय बोरिवली आणि अन्य भागांतील काही घरांचाही यात समावेश आहे.
नाशिक शहरात गॅस सिलेंडरच्या संशयास्पद साठ्याचा मोठा प्रकार उघडकीस आलाय. त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात विनापरवाना सिलेंडरनं भरलेला ट्रक जप्त केला. पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. कारवाईदरम्यान एचपी गॅसचे 500 हून अधिक सिलेंडर रस्त्यावर साठवून ठेवलेले आढळून आले. त्यामुळे गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याप्रकरणी सातपूर पोलिसात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
लोकसभेत अध्यक्षांच्या आसनावर कागद फाडून फेकल्याच्या घटनेवर निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षातील आठ खासदारांचे निलंबन अखेर रद्द करण्यात आलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात झालेल्या चर्चेनंतर ‘सीजफायर’ झाल्याने संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला, जो ध्वनिमताने मंजूर झाला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी तत्काळ प्रभावाने निलंबन समाप्त झाल्याची घोषणा केली.
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग प्रकार केल्यानंतर, भाजपला एका जागेऐवजी दोन जागा जिंकता आल्या. ओडिशामध्ये झालेल्या क्रॉस व्होटिंगच्या प्रकरणात काँग्रेसने तीन आमदारासह एका नेत्यावर कारवाई केली आहे. तीन आमदारांना निलंबित करण्यात आले असून, एका नेत्याची हकालपट्टी केली आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याच्या प्रकरणात आमदार सोफिया फिरदौस, आमदार रमेश जेना आणि आमदार दाशरथी गमांग यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर कटक शहराध्यक्ष अध्यक्ष गिरिबाला बेहरा यांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आज एका जाहीर सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, "माझ्यावर हल्ला होऊ शकतो आणि जर असं झालं, तर पंतप्रधानांपासून भाजपच्या सर्व नेत्यांपर्यंत सर्वजण याला जबाबदार असतील." यावेळी त्यांनी भाजपा खासदार दिलीप घोष यांच्या एका विधानाचा उल्लेख केला. ही सर्व प्रक्षोभक विधानं असून, भविष्यात अशा विधानांमुळेच आपल्यावर हल्ला होऊ शकतो, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत मुंबईतील खार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार काळे यांना लाच घेताना रंगेहात अटक केली. या घटनेमुळे मुंबईच्या पोलिस वर्तुळात खळबळ उडाली. एका प्रॉपर्टी प्रकरणात चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी तुषार काळे याने 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी संबंधिताकडे केली होती. त्यानुसार, ठरवल्याप्रमाणे तुषार काळे यास दीड लाख रुपयांचा पहिला हफ्ता देत असताना ACB ने रंगेहात अटक केली.
ठाणे पालिकेतील रखडलेल्या नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 1 हजार 773 पदांच्या जागांसाठी तब्बल 75 हजार अर्ज आले असून या भरती प्रक्रियेला पुढच्या महिन्यापासून पुन्हा सुरवात होणार आहे. ठाणे महापालिकेतील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील 1 हजार 773 पदांसाठी ऑगस्ट 2025 मध्ये एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पदे ही आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागासाठी असून यामध्ये इतर पदांचादेखील समावेश आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवास सुविधेसह, अधिकारी-पर्यवेक्षकांच्या बदल्यांबाबत मोठे निर्देश देण्यात आले आहेत.
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धाने आता भीषण वळण घेतले आहे. 28 फेब्रुवारीला इराणच्या सत्ताकेंद्रावर झालेल्या भीषण मिसाइल हल्ल्यात इराणचे नवे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनेई हे मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या हल्ल्यात त्यांचे वडील आणि माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्यांचा अंत झाला आहे. तेहरानमधील सुप्रीम लीडरच्या निवासस्थानावर 'ब्लू स्पॅरो' मिसाइलने हल्ला करण्यात आला. ज्यावेळी हे मिसाइल थेट खामेनेई यांच्या घरावर पडले, त्याच्या काही मिनिटे आधीच मोज्तबा खामेनेई घराबाहेर बगीच्यात फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. या काही पावलांच्या अंतरामुळेच त्यांचा जीव वाचला. मात्र, घराचा ढिगारा अंगावर पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.
गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम आता धार्मिक उत्सवांवरही पाहायला मिळत असून महाप्रसादासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्याने भुसावळ इथल्या हिंगलाज देवीच्या मंदिरात प्रगट सोहळा हा महाप्रसादाविना करावा लागला. हिंगलाज देवी ही भावसार समाजाची कुलदैवत मानली जाते. मात्र हिंगलाज देवीचे मूळ स्थान हे बलुचिस्तानमध्ये असल्याने स्थानिक मंदिरांमध्येच भावसार समाज मोठ्या उत्साहात प्रगट दिवस हा साजरा करतात.
गेल्या काही काळापासून सक्रीय राजकारणापासून दूर असलेले भाजपचे माजी खासदार वरुण गांधी यांनी आज कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, वरुण गांधी यांचा ‘राजकीय वनवास’ अखेर संपणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात 10वीची बोर्ड परीक्षा सुरू असून पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस येत आहेत. यावरून खळबळ उडाली असतानाच आता सोलापुरातील सांगोल्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे 10 वीच्या भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरीला गेली आहे. स्ट्राँग रुमचं लॉक तोडून 50 प्रश्नपत्रिकांचं बंडलच चोरून नेले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून उद्या (ता.18) 10वी भूगोलचा पेपर होणार आहे. त्याआधीच पेपर फुटल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.
धुळे जिल्ह्यामध्ये अवैधपणे घरगुती गॅसचा व्यावसायिक कामासाठी वापर करणाऱ्या विरोधामध्ये पुरवठा विभागातर्फे आक्रमक भूमिका घेतली जात असून, आता पुरवठा विभाग यासंदर्भात ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे, कारण धुळ्यामध्ये मागील दोन दिवसांमध्ये जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पुरवठा विभागातर्फे छापेमारी करण्यात आली आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी घरगुती गॅसचा वापर हा व्यवसायिक कामासाठी केला जात असल्याचे आढळून आले, असे जवळपास 31 गॅस सिलेंडरची जप्तीची कारवाई पुरवठा विभागातर्फे करण्यात आली आहे,
बीडच्या गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे जुन्या वादातून दोन गटात काही दिवसांपूर्वी लाकडी दांडे आणि दगडाने हाणामारी झाली होती. या मारहाणीत वृद्ध व्यक्तीसह महिला देखील जखमी झाल्या त्यांच्यावर गेवराई येथील शासकीय रुग्णाला तो उपचार करण्यात आले आहेत. या घटनेनंतर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता त्याची काही व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात दोन्ही बाजूचा फिर्यादीवरून एका गटातील आठ तर एका गटातील नऊ अशा एकूण 17 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी आणि 2025 चा खरीप पीक विमा तात्काळ मंजूर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत गोदावरी नदीच्या पात्रात उतरून शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेत तब्बल 90 टक्के शेतकरी वंचित राहणार राहणार असल्याचा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलनास केला आहे.
बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या हंगामी अनिवासी वसतीगृहात जास्त विद्यार्थी दाखवून करोडो रुपये उचलण्यात आले आहेत. विद्यार्थी संख्या दुप्पट, तिप्पट वाढवून निधी उचलला गेला तर एका ठिकाणी वसतीगृह नसताना निधी उचलल्याची सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मस्के यांनी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमेरिका आणि इस्त्रायल–इराण यांच्यातील संघर्षाचा भडका उडाल्यानंतर याचे चटके आता महाराष्ट्रात बसू लागले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात गॅस सिलेंडरचे वितरण विस्कळीत झाले असून ग्राहक आणि गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होताना दिसत आहेत. दरम्यान कोकणातील रत्नागिरी शहरात रत्नागिरी गॅस एजन्सीने कर्मचाऱ्यांवर सिलेंडर चुकीच्या पद्धतीने वितरण केल्याचा आरोप केल्याने वादाचा भडका उडाला आहे. येथे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून सकाळी 8.30 वाजल्यापासून 14 कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. कंपनी मॅनेजमेंटने व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण करताना कर्मचाऱ्यांनी 5 सिलेंडर चुकीच्या पद्धतीने वितरण केल्याचा आरोप करत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. तर आम्ही पावतीनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान आता हा वाद रत्नागिरी पोलीस स्टेशनपर्यंत गेला असून सर्व कर्मचारी रत्नागिरी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसले आहेत.
नाशिकमध्ये 500 गॅस सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला असून गॅस माफियांचा डाव सातपूर पोलीस आणि पुरवठा विभागानं कारवाई करत उधळला. निवासी भागात एचपी कंपनीतून आलेला 500 हून अधिक सिलेंडरचा ट्रक नागरिकांच्या निदर्शनास आला. 500 हून अधिक सिलेंडरचा गोदामात न नेता काळ्या बाजारात डाव असल्याचा संशय नागरिकांना आला होता. याची माहिती सातपूर पोलीस आणि पुरवठा विभागाला देण्यात आली. ज्यानंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कारवाई करत ट्रक, रिक्षांसह चालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेतलंय. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिरूर परिसरात नवीन पर्यायी महामार्ग उभारण्याची योजना आखली आहे. यामुळे सध्या होत असलेली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाची माहिती शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली असून, प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी शिंगणापूर जिल्हा परिषद सदस्य रसिका पाटील आणि तर उपाध्यक्ष पदासाठी असळज जिल्हा परिषदेचे सदस्य संभाजी पाटणकर यांची उमेदवारी. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनंती आल्यास बिनविरोध निवड होईल काँग्रेस नेत्यांची भूमिका
कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिल्पा शशिकांत खोत यांचे नाव निश्चित झाले आहे. काल दिवसभर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. शोभाताई फराकटे आणि शैलेजा पाटील यांची नावे चर्चेत होती. अखेर खोत यांची निवड करण्यात आली असून मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपद कागलमध्येच ठेवण्यात यश मिळवले.
पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाची निवड आज होणार आहे. दुपारी दोन नंतर जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर ३० मार्चला विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड होईल.
Pune Collector : सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक
घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.