Maharashtra Politics Live Update: श्रीरामनवमी निमित्तानं पुणे शहराच्या वाहतुकीत बदल, हे प्रमुख रस्ते राहणार बंद

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 25 March 2026 : अशोक खरात प्रकरण, सातारा झेडपी निवडणूक प्रकरणी शिवसेना आक्रमक, उद्धव ठाकरे विधान परिषदेमधून निवृत्त यासह बुधवार 25 मार्च रोजीच्या दिवसभरातील विविध राजकीय, प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Live Update 2
Live Update 2Sarkarnama
Published on
Updated on

श्रीरामनवमी निमित्तानं पुणे शहराच्या वाहतुकीत बदल, हे प्रमुख रस्ते राहणार बंद

राम नवमी गुरुवारी(ता. 26 मार्च) देशभरात उत्साहात साजरी केली जाणार आहे. पुणे शहरातील रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या निमित्तानं आता पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील काही रस्ते बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात बाजीराव रस्ता, लष्कर परिसरासह काही प्रमुख रस्त्यांवर प्रवेशास बंदी असणार असल्याचं म्हटलं आहे.

'भोंदूबाबा अशोक खरातनं 2017 मध्ये पत्रकाराचा खून केला होता...';जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

भोंदूबाबा अशोक खरातने 2017 मध्ये एका पत्रकाराचा खून केला होता,असा खळबळजनक दावा माजी मंत्री अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणात पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. खरातला वाचवण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यानं किती पैसे घेतले, हे मुख्यमंत्र्यांना माहीत असल्याचा नवा बॉम्बही आव्हाडांनी यावेळी टाकला.

मुंबईत 10 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन युगांडाच्या महिलांवर कारवाई

मुंबईत 10 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन युगांडा महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. वाकोला पोलिसांची कालीना परिसरात मोठी कारवाई केली आहे. 10 वर्षांपासून बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या दोन युगांडा महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Nakayondo Rose (37) आणि Kemigisa Proscovia (26) अशी या महिलांची नावे आहेत. फातिमा हाऊस, कालीना, सांताक्रुझ पूर्व येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे वाकोला पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

चौकशीत दोघींचा व्हिसा कालबाह्य झाल्याचे उघड झालं आहे. कोणतीही वैध परवानगी नसताना भारतात वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झालं आहे. महिलांकडून पासपोर्ट व नागरिकत्वाचे कागद जप्त करण्यात आली आहेत.

हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अहवाल परकीय नागरिक नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत आर्थिक व्यवहाराचे व्हिडिओ व्हायरल; अधिकार निलंबित 

- जिल्हा परिषद नागपूरमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे

- नागपूर जिल्हा परिषदेतील आर्थिक व्यवहारासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

- तक्रार प्राप्त होताच जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय...

- व्हिडिओत पैसे घेताना दिसणारे परिचर (शिपाई) गौरव कंगाली आणि लेखा अधिकारी जितेंद्र राऊत यांच्यावर पैशांची मागणी केल्याचा आरोप..

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश सभापती राम शिंदेंकडून मागे

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहातच दिले होते. सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरुन झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. पण आता सभापती राम शिंदे यांच्याकडून हे आदेश मागे घेण्यात आले आहेत.

devndra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केले निवेदन

अजितदादांच्या अपघातप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात निवेदन केले. यावेळी त्यांनी या अपघाताचा तपास सीआयडीकडून सुरु असल्याचे सांगितले. बारामतीत लँड होण्यापूर्वीच अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला होता. विमानात स्फोटक पदार्थाचा अंश नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Ashok Kharat : गुन्ह्यांचे आरोप; पुरावे पोलीस यंत्रणांच्या हाती लागले

Nashik News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अधिक गंभीर वळणावर आहे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, जमिनी हडपणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे पोलीस यंत्रणांच्या हाती लागले आहेत. तसेच, खरातचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याचे काही फोटो आणि पूजा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिर्डीत अशोक खरातच्या नावावर असणारे दोन प्लॉट समोर आल्यानंतर आता काकडी शिवारातील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर पाच एकर प्लॉटची खरेदी केल्याचं देखील समोर आलं आहे.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, सोन पाच हजार तर चांदी 20 हजारांनी वाढले

युद्धाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे दिसताच सोने चांदी दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल जी एस टी शिवाय १४०५०० हजार रुपयावर असलेले सोन्याचे दर आज पाच हजार रुपयांनी वाढून ते १४५५०० वर पोहोचले. तर चांदीच्या दरात ही वाढ होऊन २२०००० हजार वरून २४०००० वर जाऊन पोहोचले आहे. पुढील काळात युद्ध विराम झाला तर सोन्याचे दर पूर्वी प्रमाणे होण्याची शक्यता आहे. मात्र युद्ध पुन्हा एकदा वाढले तर पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण होण्याचे संकेत सुवर्ण व्यावसायिकांनी दिले आहेत.

महापालिकेत भाजपाच्या सभापतीकडून एमआयएमची 'कोंडी'

औरंगाबाद शहराचे नाव आधी संभाजीनगर आणि आता छत्रपती संभाजीनगर हे अधिकृतपणे झाले आहे. परंतु महानगर पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या एमआयएम आणि त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी सरकारी कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या आपल्या पत्रांमध्ये 'औरंगाबाद' असाच उल्लेख करणे सुरू ठेवले आहे. यावरून आता स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी एमआयएमची कोंडी सुरू केली आहे.

"खरात प्रकरणात मंत्री, अधिकारी जेलमध्ये जातील", काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा खळबळजनक दावा

खरात प्रकरणावर काँग्रेसने सरकरावर हल्लाबोलल केला असून काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी मंत्रिमडळातील तीन विकेट पडतील असा दावा केला आहे. दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खरात प्रकरणात मंत्री, अधिकारी जेलमध्ये जातील असे म्हटले आहे. सरकारने भोंदू खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि 2 डझन अधिकारी जेलमध्ये जातील. तर फडणवीसांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी त्यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र, अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी खरात विरोधात कारवाई सुरु केल्याचा दावा देखील सपकाळ यांनी केला आहे.

सातारा ZP राडा प्रकरण एसपी तुषार जोशींना भोवणार? निलंबनावर शिवसेना ठाम

सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना-अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे बहूमत असतानाही अध्यक्ष भाजपचा झाला. यावेळी अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी झालेल्या राड्याचे पडसाद अधिवेशनात उमटले. तर उप सभापती निलम गोऱ्हे यांनी एसपी तुषार जोशींसह या राड्या प्रकरणी इतर अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. तर मंत्री जयकुमार गोरे यांनी यावर अक्षेप घेतला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत खुलासा केला. पण एसपी तुषार जोशींच्या निलंबनावर शिवसेना ठाम असल्याचे कळत आहे. फडणवीस याबाबत आज सभागृहात काय घोषणा करतात याकडे शिवसेनेचे लक्ष असून निलंबन मागे घेतल्यास शिवसेनेकडून तीव्र नाराजी नोंदवण्याची शक्यता आहे. तर मंत्री किंवा आमदार राजिनामाअस्त्र बाहेर काढणार का याकडे राजकीय वर्तुळासह जनतेचं लक्ष आहे.

बीडमधील मुख्य पोस्ट ऑफिस बॉम्बे उडवून देण्याची धमकी, प्रशासनाची धावपळ

बीडमधील मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याचा मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देताच डॉग स्कॉटसह बॉम्बशोधक पथक पोस्ट ऑफिस कार्यालयात दाखल झाले. या पथकाकडून तपासणी सुरू आहे.

कोल्हापुरला आणखी मिळणार एक खासदार आणि तीन आमदार? 

केंद्र सरकार घेतलेल्या जनगणनेच्या निर्णयामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या नवीन जनगणनेनुसार होण्याची शक्यता आहे. नवीन जनगणनेनुसार विधानसभा आणि लोकसभेच्या जागांमध्ये देखील वाढ होणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेची एक तर विधानसभेच्या तीन जागा वाढणार आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यास संधी मिळणार आहे.

Shakti Act : भारतीय न्याय संहिता विधेयक 2026 बहुमतानं मंजूर, फडणवीसांनी सुचवले महत्त्वाचे बदल...

महाराष्ट्र विधानसभेत आज भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक 2026 बहुमतानं मंजूर करण्यात आलं. हे विधेयक मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सभागृहात मांडलं. बलात्कारित महिलांसोबतच ॲसिड हल्ल्यातील पीडितांची ओळख गुप्त ठेवण्याची तरतूद, सोशल मीडियावर महिलांचे अश्लील चित्रण रोखण्यासाठी कठोर नियम, AI वापरून बनावट फोटो/व्हिडिओ तयार करून प्रसारित करण्यावर बंदी, असे बदल सुचवले आहेत.

Global Tender : एलपीजी, इंधन टंचाई, ONGC चा मोठा निर्णय! 20 अब्ज डॉलर्सची जागतिक निविदा

भारताची सर्वात मोठी तेल आणि वायू शोधक कंपनी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने समुद्राच्या खोल पाण्यात उत्खनन करण्यासाठी एक भव्य प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी कंपनीने 20 अब्ज डॉलर्स (सुमारे १.६ लाख कोटी रुपये) मूल्याची जागतिक निविदा प्रसिद्ध केली आहे. भारताचे परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे.

LPG Gas Cylinder : "नरेंदर भी गायब, सिलिंडर भी गायब"; घोषणांनी संसद परिसर दणाणला

देशभरात LPG सिलिंडरसाठी लोक त्रस्त आहेत. गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावायला लोकांना मजबूर व्हावे लागत आहे.

आज काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि INDIA आघाडीच्या खासदारांनी या मुद्द्यावर संसदेच्या परिसरात आंदोलन केले. "नरेंदर भी गायब, सिलिंडर भी गायब," अशा घोषणांनी संसद परिसर दणाणला होता.

Marathi Cinema : मुंबईत केवळ मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारण्यात येणार

मुंबईत केवळ मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मराठी चित्रपटगृहांचे जतन आणि विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील 65 चित्रपटांना अर्थसहाय्य, कोविड काळातील 98 चित्रपटांनाही मदत, एकूण 24 कोटी 10 लाखांचा निधी वितरित आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त Shyamchi Aai चित्रपटाला 79 लाखांची मदत देण्याचं मंत्री शेलार यांनी जाहिर केलं आहे.

Sunil Tatkare and Rupali Chakankar : चाकणकरांसाठी विखेंनाबरोबर घेत तटकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे धाव...

रुपाली चाकणकरांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रुपाली चाकणकरांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. ‌रुपाली चाकणकरांना पक्षातील सर्व पदांवरुन हटवावे की नाही, याबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये दोन गट पडल्याच दिसून येत आहे.

Zakir Naik Return to India : वादग्रस्त झाकीर नाईकचा व्हिडिओ व्हायरल; नरेंद्र मोदींमुळेच...

विवादास्पद इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानी युट्युबर नादिर अलीला दिलेल्या या मुलाखतीत नाईकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आपल्या 'हिजरत' आणि पुनरागमनाबाबत खळबळजनक विधाने केली आहेत. नाईकने म्हटले, "पंतप्रधान मोदींमुळेच आज मला हिंदुस्तानात प्रत्येकजण ओळखतो. पूर्वी केवळ मुस्लिमांनाच माझे विचार माहित होते. पण आता मुस्लिमांपेक्षा बिगर मुस्लिम लोक मला जास्त ओळखतात." इतकेच नव्हे तर, "अल्लाहची हीच प्लॅनिंग आहे, तो इस्लामच्या शत्रूंकडूनही चांगली कामे करून घेतो. मोदींच्या कारवाईमुळेच माझा अधिक प्रचार झाला,"

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी रणनीती ठरली, काँग्रेस अन् ठाकरेंची तटकरे भेट घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहे. सहा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करतील. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची तयारी सुरू असल्याचेही तटकरे यांनी म्हटलं.

Thane District Bank Election : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागले

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. 2026-2031 या कालावधीतील संचालक मंडळावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली असून शहापूर तालुक्यातील 68 सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव गोळा करण्याची लगबग सुरू झाली आहे. एकूणच जिल्ह्यातील सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या बँकेवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी राजकीय चुरस वाढू लागली आहे.

Ashok Kharat Case : तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी खरातच्या संस्थेसाठी मंजूर केला होता निधी

अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. 2018 चा शासन निर्णय (जीआर) समोर आला आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. 31 मार्च 2018 रोजी ईशान्येश्वर मंदिरासाठी जीआर काढण्यात आला होता. या दीड कोटींमधून 25 लाख रुपये तत्काळ मंजूर झाला होता.

आमदार नरेंद्र मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

आमदार नरेंद्र मेहता यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मेहतांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने स्वीकारण्यात आल्याचा दावा नयना वसानी यांनी केला होता मात्र हा दावा त्या सिद्ध करू न शकल्याचा उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

Ashok Kharat Scam Exposed : भोंदूबाबा अशोक खराता दहावी नापास

जो अशोक खरात नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत होता. तो खरात चक्क दहावी नापास असल्याचं समोर आलं गणित विषयात नापास झाला होता तरीही तो अंकशास्त्र म्हणून मिरवत असल्याचं आता उघड झालं आहे. सिन्नर तालुक्यातील कहांडळावडीमध्ये खरात वावी येथील माध्यमिक शाळेत खरात शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेनुसार खरातला 35.88% मिळाले होते. तर मराठीत, 39 इंग्रजी 37 गणितामध्ये 28 विज्ञान, 62 समाजशास्त्र 38 आणि हिंदीमध्ये 47 गुण मिळाले होते. आकडेवारीनुसार खरात गणितात नापास असल्याचं स्पष्ट झालं आहे.

खरातच्या मंदिरासाठी युती सरकारच्या काळात दीड कोटीचा निधी

अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी युती सरकारच्या काळातील 2018 सालचा जीआर समोर आला आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता.

पुलंनंतर मी उद्धव ठाकरे यांना 'कोट्या'धीश म्हणेन - देवेंद्र फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरेंच्या निरोपाच्या भाषणात बोलताना, "पु.ल. देशपांडे यांची ओळख 'कोट्या'धीश अशी होती. पुलंनंतर मी उद्धव ठाकरे यांना 'कोट्या'धीश म्हणेन," असं म्हणत ठाकरे या सभागृहात पुन्हा आले तर अधिक कोट्या ऐकायला मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

विदर्भातील वनांना वाढीव निधी 

महाराष्ट्राच्या एकूण वनसंपदेपैकी ६०% वने विदर्भात आहेत, वन्य प्राणीही विदर्भात सर्वाधिक आहेत. मात्र, वन विभागाकडून निधीचे वितरण करत असताना विदर्भावर अन्याय होत असल्याची बाब आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळात मांडली. तसेच, निधीच्या वितरणात काही भ्रष्ट प्रवृत्तींचा हस्तक्षेप असल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनीविदर्भाला वाढीव निधी देण्याबाबत आश्वस्त केले आहे

अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तानची मध्यस्थी

अमेरिका-इराण युद्धाच्या झळा जगभर जाणवत आहे. या युद्धामुळे जगावर ऊर्जा संकट कोसळले आहे. हे युद्धा कधी थांबणार याची चर्चा सुरू असताना ब्रिटीनमधील 'द फायनान्शियल टाइम्स' वृत्तापत्राने पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करत असल्याचे वृत्त दिले आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची सोशल मीडियावरील पोस्ट शेअर करत तसे संकेत दिले आहेत.

फिलीपीन्समध्ये ऊर्जा आणीबाणी

अमेरिका आणि इराण युद्धाच्या झळा आता जगभर बसू लागल्या आहेत. त्याचा पहिला फटका फिलीपीन्स देशाला बसला असून देशासमोर मोठे ऊर्जा संकट उभे राहिले आहे. फिलीपीन्सचे राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस यांनी मंगळवारी देशात ऊर्जा आणीबाणीची घोषणा केली.

सोनिया गांधींची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची मंगळवारी रात्री अचानक तब्येत बिघडली. त्यांना रात्री 11.15 च्या सुमारास रुग्णालयात दाखल केले. आज डाॅक्टर सोनिया गांधी यांच्या प्रकृती विषयी विस्तृत माहिती देण्याची शक्यता आहे. दरम्यान, इनफेक्शनमुळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com